(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gopichand Padalkar : शरद पवार आणि रोहित पवारांची अवस्था फरड्या सापासारखी : गोपीचंद पडळकर
Gopichand Padalkar : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर जहरी टीका केलीये.
Gopichand Padalkar, सांगली : शरद पवार आणि रोहित पवारांची अवस्था फरडया सापा सारखी झाली आहे,अशी घणाघाती टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. तसेच जाती जातीत भांडण लावून शरद पवार जे स्वप्न बघत आहेत, ते स्वप्न उद्ध्वस्त करा, असे आवाहन देखील गोपीचंद पडळकर यांनी केले आहे. सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातल्या आरेवाडी येथे आयोजित बहुजनांच्या दसरा मेळाव्यामध्ये पडळकर बोलत होते.
40 वर्षे सत्ता होती, तुम्ही काय लोटत होता का ?
इंदापूरमध्ये जाऊन शरद पवारांनी सत्ता द्या चेहरा मी बदलतो,असे विधान केले. मग 40 वर्षे सत्ता होती,तुम्ही काय लोटत होता का ? तुम्ही 4 वेळा मुख्यमंत्री, आता त्यांच्या नातवाला उपमुख्यमंत्री पदाचे स्वप्नं पडलेत. यामुळे आजोबा आणि नातूची अवस्था फरड्या ( सापा ) सारखे झाली आहे,जो मेंढ्या राखायला गेल्यावर आपल्याला दिसतो ,जो छोटासा असतो पण ताटतो, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. राज्य सरकारकडून धनगर आरक्षणाच्या बाबतीत काढण्यात आलेले शुद्धीपत्रकावर बोलताना पडळकर म्हणाले,राज्य सरकारने शुद्धीपत्रक काढले, सिद्ध करून घेतले,महसूल व वन विभागाने काढला, ज्यामध्ये 36 नंबर आहे, तिथे धनगड वाचावे असे स्पष्ट केलं. त्यामुळे धनगर राज्याबाहेरचं आहेत, ते सिद्ध झाले.
जय मल्हार!
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) October 10, 2024
बहुजन समाजाच्या न्यायाच्या लढ्यासाठी मी नेहमी तुमच्यासोबत आहे. #जयमल्हार #बहुजनसमाज #न्यायासाठीलढा #GopichandPadalkar #maharashtra pic.twitter.com/9MPU1FqOeA
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना विचारले
आपण देवेंद्र फडणवीस यांना रात्री फोन करून ही बाब निदर्शनास आणून दिली, पण ते शुद्धीकरण पत्रक कुणी काढले आहे. ते देवेंद्र फडणवीस यांना माहिती नाही, त्यामुळे त्यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना विचारले. त्यांनी पण ते काढले नसल्याचे स्पष्ट केलं. फडणवीस यांनी रात्री 1 वाजता आदेश दिला. त्यामुळे आज सकाळी आपल्याला जसे पाहिजे तसे ड्राफ्ट करून शुद्धीकरण पत्रक आदेश रद्द केल्याचं पत्र काढण्यात आले, असंही पडळकर यांनी नमूद केलं.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या आदेशानुसार राज्याचे महसूलमंत्री मा.श्री. राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी शुद्धिपत्रक रद्द केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!#देवेंद्रफडणवीस #राधाकृष्णविखेपाटील #शुद्धिपत्रकरद्द #तात्काळनिर्णय #महाराष्ट्रविकास… pic.twitter.com/9fVh0B7klW
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) October 10, 2024
इतर महत्त्वाच्या बातम्या