Goa Congress : गोव्यात काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्र्यांची पक्षाला सोडचिट्ठी
रवी नायक यांच्या राजीनाम्यानंतर आता 40 सदस्य संख्या असलेल्या गोवा विधानसभेत 37 आमदार राहिले आहेत. तर कॉंग्रेसचे संख्याबळ आता तीनवर खाली घसरले आहे.
गोवा : गोव्यात कॉंग्रेसला (congress)मोठा धक्का बसला आहे. माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते रवी नायक(ravi naik) यांनी मंगळवारी आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. रवी नायक पोंडा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. नायक यांनी आज गोवा विधानसभा अध्यक्ष राजेश पाटनेकर यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला आहे.
नायक यांच्या राजीनाम्यानंतर आता 40 सदस्य संख्या असलेल्या गोवा विधानसभेत 37 आमदार राहिले आहेत. तर कॉंग्रेसचे संख्याबळ आता तीनवर खाली घसरली आहे. याआधी दोन आमदारांनी आपला राजीनामा दिला आहे. माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते लुइजिन्हो फेलेरो यांनी सप्टेंबर महिन्यात आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसमध्ये सहभागी झाले. फेलेरो यांनी आगामी विधासभा निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. सप्टेंबर महिन्यात पक्षाला सोडचिट्ठी दिल्यानंतर फेलेरो यांनी थेट सोनिया गांधींना पत्र लिहिलं होतं. यात त्यांनी गोव्यात काँग्रेसचे सर्वाधिक आमदार असूनही काँग्रेसचं सरकार स्थापन होऊ शकलं नाही याला काँग्रेस नेते दिग्विजय सिंह जबाबदार असल्याचा गंभीर आरोप केला होता. यामुळे काँग्रेसमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती. आपल्या पत्रात फेलेरो यांनी गोवा काँग्रेसच्या अनेक बाबींवर आपली मतं मांडत काँग्रसचा अंतर्गत कलह समोर आणला होता.
साडेचार वर्षात काँग्रेसची संख्या १८ आमदारांवरुन 3 वर
मागील साडेचार वर्षात काँग्रेसची संख्या १८ आमदारांवरुन 3 वर आली आहे. १३ आमदारांनी काँग्रेसला सोडचिट्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर लुइजिन्हो फेलेरो यांनी तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
आगामी वर्षात होणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसला हा खूप मोठा धक्का मानला जात आहे. रवी नायक यांनी आपल्या आमदार पदाचा राजीनामा दिलानंतर ते आता भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील अशी शक्यता वर्वविली जात आहे.
रवी नायक यांनी राजीनामा दिल्यानंतर प्रतिक्रीया देताना राज्य कॉंग्रेसचे प्रमुख गिरीश चोडनकर म्हणाले की, कॉंग्रेस पक्षाने त्यांना यापूर्वीच बाजूला सारले होते. शिवाय आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारीही देण्यात येणार नव्हती.
संबंधित बातम्या
निवडणूक गप्पा | राजकारणातील न ऐकलेले किस्से, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे आणि कॉंग्रेस नेते उल्हास पवार यांच्याशी चर्चा | ABP MAJHA
Nagpur Chotu Bhoyar : नागपुरचे काँग्रेस उमेदवार छोटू भोयर यांचा भाजपवर ABP MAJHA