एक्स्प्लोर

Goa CM Pramod Sawant : अचानक छातीत दुखू लागल्याने रूग्णालयात केलं दाखल; एक ब्लॉक अन्...., गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर पुण्यात यशस्वी शस्त्रक्रिया

Goa CM Pramod Sawant : गुरुवारी दुपारी अचानक छातीत त्रास जाणवू लागल्याने डॉ. सावंत यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.

पुणे: गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Goa CM Pramod Sawant) यांना काल (गुरुवारी, ता १९) दुपारी छातीत दुखू लागल्याने पुण्यातील प्रसिद्ध रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर हृदयाची यशस्वी शस्त्रक्रिया (अँजिओप्लास्टी) करण्यात आली असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.(Goa CM Pramod Sawant)

गुरुवारी दुपारी अचानक छातीत त्रास जाणवू लागल्याने डॉ. सावंत (Goa CM Pramod Sawant) यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तेथे तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने त्यांची प्राथमिक तपासणी करून अँजिओग्राफी केली. त्यामध्ये एक ब्लॉक आढळल्याने तातडीने अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला. विख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉ. समिन शर्मा यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली.

रुग्णालयाची अधिकृत माहिती

रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, शस्त्रक्रियेनंतर मुख्यमंत्री सावंत (Goa CM Pramod Sawant) यांना सध्या अतिदक्षता विभागात (ICU) निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती आता सुधारत असून पुढील काही तासांत त्यांच्या प्रकृतीबाबत सविस्तर मेडिकल रिपोर्ट समोर येतील. 

मुख्यमंत्रीपदाची ७ वर्षे पूर्ण

विशेष बाब म्हणजे, काल १९ मार्च रोजीच डॉ. प्रमोद सावंत (Goa CM Pramod Sawant) यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाचा ७ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. १९ मार्च २०१९ रोजी मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर त्यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्यानंतर २०२२ च्या निवडणुकीनंतरही त्यांनी दुसऱ्यांदा राज्याची धुरा सांभाळली. आपल्या कार्यकाळाच्या सातव्या वर्धापनदिनीच त्यांना या शारीरिक व्याधीचा सामना करावा लागला.

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, अमित शाहनंतर सुनील तटकरेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट 
दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, अमित शाहनंतर सुनील तटकरेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट 
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आईने दागिने विकले, वडिलांनी सावकाराकडून कर्ज घेतले; श्रीकांत शिंदेंचं संसदेत भावनिक भाषण
आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आईने दागिने विकले, वडिलांनी सावकाराकडून कर्ज घेतले; श्रीकांत शिंदेंचं संसदेत भावनिक भाषण
Nitin Gadkari: नितीन गडकरींचे डीपफेक व्हिडिओ; मेटा, गुगलविरुद्ध न्यायालयात, हायकोर्टात 5 ऑगस्टला होणार सुनावणी
नितीन गडकरींचे डीपफेक व्हिडिओ; मेटा, गुगलविरुद्ध न्यायालयात, हायकोर्टात 5 ऑगस्टला होणार सुनावणी

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chief Minister Wealth : देशातील सर्वात मोठा श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
सर्वात मोठा श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
Embed widget