एक्स्प्लोर

निंबाळकरांना तिकिट, मोहिते पाटलांची नाराजी, कार्यकर्त्यांचा राडा, गिरीश महाजनांची गाडी अडवली!

Madha Lok Sabha Election 2024 : रणजितसिंह नाईक-निंबाळकरांना पुन्हा एकदा तिकिट देण्यात आलं.  त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील हे नाराज झाले. ते माढ्यातून लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक होते.

Madha Lok Sabha Election 2024 girish mahajan : भाजपकडून माढ्यात विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकरांना पुन्हा एकदा तिकिट देण्यात आलं.  त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील हे नाराज झाले. ते माढ्यातून लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक होते. मोहिते पाटील यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपचे संकटमोचक आकलूजमध्ये दाखल झाले, पण त्यांना कार्यकर्त्यांच्या रोषाला आणि संतापाला सामोरं जावं लागलं. शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. त्यांनी मोहिते पाटील यांच्याबाजूने घोषणा दिल्या, त्याशिवाय निंबाळकरांना पाडा.. दादा तुतारी हातात घ्या, आशाही घोषणा केल्या. त्यामुळे माढ्यात आता भाजपपुढे अडचणी वाढल्या आहेत का? असा सवाल उपस्थित होत आहे. 

मोहिते पाटलांची नाराजी दूर करण्यासाठी मंत्री गिरीश महाजन अकलूजमध्ये त्यांच्या निवास्थानी आले. त्यावेळी कार्यकर्त्यांनी प्रंचड राडा घातला. कुणीच ऐकायला तयार नव्हतं. त्यावेळी मोहिते पाटील यांनी सर्व कार्यकर्त्यांना शांत केले. त्याशिवाय कार्यकर्त्यांचा रोष पाहून महाजन यांना निवस्थानी नेलं. शेकडो कार्यकर्त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांची गाडी आढवली होती. त्यावेळी घोषणाबाजीही केली. महाजन यांचा रस्ता कार्यकर्त्यांनी आडवला होता. धैर्यशील मोहिते पाटील यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली. त्यानंतर गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांनी संबोधित केले. त्यावेळी त्यांनी अजून आपल्याकडे बराच वेळ असल्याचं सांगितलं.

मोहिते पाटलांची नाराजी दूर करण्यासाठी आले, कार्यकर्त्यांचा प्रचंड संताप - 

मंत्री महाजन यांनी मोहिते पाटील यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. बंद दाराआड बैठक सुरू असताना मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते दाखल झाले होते.  गिरीश महाजन बाहेर येताच खूप कार्यकर्त्यांनी जोरजोरात घोषणाबाजी केली. त्यामुळे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी त्यांना पुन्हा घरात नेले. पण कार्यकर्त्यांचा रोष काही थांबला नाही. 

माढ्यात कार्यकर्ते नाराज, भाजपला फटका बसणार का ?

जवळपास दोन तास राडा सुरु होता. यावेळी कार्यकर्त्यांनी माढा आणि निंबाळकरांना पाडा अशी जोरदार घोषणाबाजी केली. त्याशिवाय  शरद पवार यांची तुतारी हाती घेण्याची मागणीही मोहिते पाटील यांच्याकडे केली. मोहिते पाटील यांची नाराजी , राग परवडणारा नाही, अजून बराच वेळ आहे, ही परिस्थिती पक्षश्रेष्ठींच्या कानावर घालणार  आहे. वरिष्ठ निर्णय घेतील, आपल्याकडे बराच वेळ आहे, असं म्हणत गिरीश महाजन यांनी हात जोडून आणि गाडीवर उभारून कार्यकर्त्यांना शांत करण्याचा  प्रयत्न केला. 

भाजपमधील नाराज गट एकत्र

निंबाळकर यांच्या उमेदवारीवरून नाराज असणारे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते यांचा गट तसेच विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर यांची लंच डिप्लोमसी अकलूज येथे आज झाली.  विशेष म्हणजे यावेळी इंडिया आघाडीकडे माढा मतदारसंघ मागणारे शेकापचे नेते जयंत पाटील, बाबासाहेब आणि अनिकेत देशमुख हे देखील मोहिते पाटील यांनी बोलावलेल्या बैठकीला उपस्थित होते. त्यामुळे स्नेह भोजनाच्या कार्यक्रमातून माढा मतदारसंघातील भाजपा उमेदवार विरोधी रणनीती ठरली असल्याची चर्चा आहे. सुमारे 3 तास झालेल्या या चर्चेत रणजितसिंह निंबाळकर यांच्यावर नाराज असणारा आणि माढा मतदार संघात किमया करणारे नेते एकत्र होते. पण या बैठकीनंतर भाजपचे संकटमोचक तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सांगावा घेऊन मोहिते पाटील यांच्या भेटीला अकलूजमध्ये आले आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
Walmik Karad : गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली!
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Case Court Hearing Update:वाल्मिक कराडला 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी,कोर्टाचा निर्णयSpecial Report Navyआयएनएस सुरत, नीलगिरी, वाघशीरचं कमिशनिंग; PM Modi यांच्या उपस्थितीत कमिशनिंग सोहळाBeed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणाWalmik Karad Case Beed Court : वाल्मिक कराडच्या रिमांडची सुनावणी आता बीड जिल्हा न्यायालयात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
Walmik Karad : गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली!
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
Ajit Pawar : अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
Santosh Deshmukh : संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ तारीख सादर केली
संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ, तारीख सादर केली
Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
Embed widget