(Source: ECI/ABP News/ABP Majha)
काल हातकणंगले, रात्री दिल्ली, पहाटे पाटण तिथून कोकणात; आत्तापर्यंत मी एक मिनिट देखील झोपलेलो नाही : एकनाथ शिंदे
Eknath Shinde, मुंबई : मी शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री केवळ बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्यामुळे झालो. मुख्यमंत्र्यांची खुर्ची ही काटेरी खुर्ची आहे. काल हातकणंगले होतो. त्यानंतर रात्री दिल्लीला गेलो. पहाटे पाटण सात वाजता कार्यक्रमात हजर होतो.
Eknath Shinde, मुंबई : "मी शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री केवळ बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्यामुळे झालो. मुख्यमंत्र्यांची खुर्ची ही काटेरी खुर्ची आहे. काल हातकणंगले होतो. त्यानंतर रात्री दिल्लीला गेलो. पहाटे पाटण सात वाजता कार्यक्रमात हजर होतो. त्यानंतर तेथून कोकणात गेलो. त्यामुळे मी या दोन दिवसांत आत्तापर्यंत मी एक मिनिट देखील झोपलेलो नाही", असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेस (Eknath Shinde) म्हणाले. शिवसेना महिला सेनेचे 'शिवदुर्गा महिला संमेलन' मुंबईतली (Mumbai) सायन येथे पार पडले. यावेळी ते बोलत होते.
महिला समाजात क्रांती घडवून आणू शकतात
एकनाथ शिंदे म्हणाले, काल महाशिवरात्री आणि जागतिक महिलादिन होता त्या कार्यक्रमाला 80 ते 85 हजार महिला उपस्थित होत्या. आज देखील मोठी गर्दी आहे. समाजाला आकार देण्याचं काम महिला करतात. समाजात क्रांती देखील महिला घडवून आणू शकतात. एकावेळी अनेक भूमिका पार पाडत असतात. शिवसेनेची महिला आघाडी म्हणजे रणरागिणी आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतो
महिला सुरक्षा अभियान आम्ही राबवत आहोत. यासाठी 100 कोटी रूपयांची तरतूद आम्ही करत आहोत. मुंबई आणि ठाण्याच्या कमिशनरला सांगितलं आहे. लेक लाडकी लखपती योजना, 50 टक्क्यात एसटी प्रवास महिलांसाठी केला. छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम करत आहोत. महाविकास आघाडीचं सरकार होतं अडीच वर्ष त्यावेळीं सगळं निराशेचं वातावरण होतं. सण उत्सवांवर बंदी होती.प्रकल्प बंद पडले होते आम्ही सर्व सुरु केलं. चैतन्याचा वातावरण निर्माण केलं, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.
ट्रॅक्टरपासून रिक्षापर्यंत आपण बरच काही महिलांना देण्याचा प्रयत्न केला
सरकारचे निर्णय लोकांपर्यंत कसे पोहोचतील यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत असं आवाहन शिंदे यांनी यावेळी बोलताना केले. शासन आपल्या दारी हा कार्यक्रम योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुरु केला. ट्रॅक्टरपासून रिक्षापर्यंत आपण बरच काही महिलांना देण्याचा प्रयत्न केला आहे. शासन आपल्या दारी या कार्यक्रमातून 4 कोटी लाभार्थ्यांनी फायदा घेतला आहे, असंही शिंदे यांनी नमूद केलं. महिला कुठेच कमी नाहीत. महिला सर्वक्षेत्रात आघाडीवर आहेत. देशाच्या राष्ट्रपतीपदी देखील महिला आहेत. मोदीजी म्हणतात गॅरिंटी तसंच महिलांची देखील कर्ज फेडण्याची गॅरंटी असते, असेही शिंदे यावेळी म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या