एक्स्प्लोर

Eknath Shinde : 'शिवतीर्थावर काँग्रेसची सभा होतेय हा शिवसैनिकांसाठी काळा दिवस', मुख्यमंत्र्यांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र

Eknath Shinde : ज्या शिवतीर्थावर बाळासाहेबांचे विचार ऐकण्यासाठी शिवसैनिक यायचे, त्याच ठिकाणी काँग्रेसची सभा होत आहे. हा शिवसैनिकांसाठी काळा दिवस असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

Eknath Shinde on Uddhav Thackeray :  काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो न्याय यात्रा (Bharat Jodo Nyay Yatra) मुंबईत (Mumbai) धडकली आहे. या यात्रेचा आज शिवाजी पार्कवर (Shivaji Park) भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप होणार असून इंडिया आघाडीच्या (India Alliance) जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) निशाणा साधला आहे. 

लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर इंडिया आघाडीची पहिलीच सभा मुंबईत होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) प्रचाराचा नारळ इंडिया आघाडीकडून मुंबईत वाढवण्यात येणार आहे. राहुल गांधींच्या सभेला शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) प्रमुख नेत्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. 

शिवसैनिकांसाठी हा काळा दिवस - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आज ज्या शिवतीर्थावर बाळासाहेब यांचे (Balasaheb Thackeray) विचार ऐकण्यासाठी शिवसैनिक यायचे त्याच ठिकाणी काँग्रेसची सभा होत आहे. त्या ठिकाणी काही लोकं भाषण करतील, हा शिवसैनिकांसाठी काळा दिवस आहे. ज्या राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केला. त्यांच्या मांडीला मांडी लावून काही जणं बसलेत. त्या सर्वांनी आधी राहुल गांधींना सावकरांच्या स्मारकाजवळ नतमस्तक करायला हवं होतं, अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. 

बावनकुळेंची व्हिडिओ शेअर करत ठाकरेंवर टीका

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी बाळासाहेब ठाकरेंचा एक व्हिडीओ शेअर करत उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, त्यापेक्षा माझे दुकान बंद करेन, अशा आशयाचा बाळासाहेब ठाकरेंचा जुना व्हिडिओ बावनकुळेंकडून ट्विट करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे शिवतीर्थावर जाऊन राहुल गांधींसमोर शरणागत होणार का? बाळासाहेबांच्या स्मारकाला राहुल गांधी (Rahul Gandhi) अभिवादन करतील का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Lok Sabha Election 2024 Maharashtra District wise voting dates : लोकसभा निवडणुकीला तुमच्या जिल्ह्यात मतदान कधी? सर्व मतदारसंघाचा आढावा एकाच ठिकाणी!

Ajit Pawar : 'आता बरंच पाणी वाहून गेलंय', अजित पवारांना दाखवला 'खुपते तिथे गुप्ते'मधील सुप्रिया सुळेंचा भावूक व्हिडिओ, दादांच्या उत्तराने वेधलं साऱ्यांच लक्ष

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahakumbh Mela 2025 | महाकुंभ मेळाव्यात आज पहिलं अमृत स्थान Special ReportWalmik karad Macoca | वाल्मीक कराडवर मकोका, मुलासाठी आईची तळमळ, परळीत ठिय्या Special ReportRajkiya Shole Sharad pawar vs Amit Shah|अमित शाहांच्या टीकेला शरद पवारांचं तिखट उत्तर Special ReportRajkiya Shole on Walmik Karad | वाल्मीक कराडवर मकोका, आससापोटी गुन्हे वाढवत असल्याचा पत्नीचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Embed widget