मोठी बातमी : शिंदे गटाच्या आमदारांची हाणामारी, दादा भुसे-महेंद्र थोरवेंची धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
Eknath Shinde MLA Fight : ऐन निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमधील नेत्यांमधील धुसफूस समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय दादा भुसे आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यामध्ये बाचाबाची झाली.
Eknath Shinde MLA Fight : ऐन निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमधील नेत्यांमधील धुसफूस समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय दादा भुसे आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यामध्ये बाचाबाची झाली. विधिमंडळाच्या लॉबीमध्येच सत्ताधारी आमदार भिडले आहेत. भरत गोगावले आणि शंभुराज देसाई यांच्या मध्यस्थीनंतर हा वाद मिटल्याचं बोलले जातेय. दादा भुसे आणि महेंद्र थोरवे यांच्यातील वाद कोणत्या कारणामुळे झाला हे समजलं नाही. पण मिळालेल्या माहितीनुसार, महेंद्र थोरवे यांनी मतदारसंघातील कामासंदर्भात दादा भुसे यांच्याकडे विचारणा केली. त्यावरुन दादा भुसे यांना ही गोष्ट खटकली. त्यावरुन दोघांमध्ये बाचाबाची आणि धक्काबुक्की झाली.
वादाचं कारण काय ? नेमकं घडलं काय?
अर्थसंकल्पीय अधिवेशानाचा आज अखेरचा दिवस आहे. पण याच दिवशी सत्ताधारी आमदारांमध्ये धक्काबुक्की आणि बाचाबाची झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहामध्ये आले होते, त्यावेळी शिवसेना प्रवक्ते भरत गोगावले आणि इतर शिंदे गटातले आमदार त्यांच्यासोबत होते. पण त्याचवेळी दोन सत्ताधारी नेत्यांमध्ये धक्काबुक्की झाली. महेंद्र थोरवे यांनी दादा भुसे यांच्याकडे काम सांगितलं होतं. ते काम दादा भुसे यांच्याकडून झालं नाही. यासंदर्भात महेंद्र थोरवे यांनी दादा भुसे यांच्याकडे विचारणा केली. त्यामुळे दादा भुसे यांना राग अनावर झाला. महेंद्र थोरवे यांनी विचारलेला प्रश्न राग आणणारं आहे, असे दादा भुसे यांना वाटलं. त्यामुळे दादा भुसे यांना राग आला. दोघांमध्ये पहिल्यांदा बाचाबाची झाली, त्याचं रुपांतर धक्काबुक्कीमध्ये झालं. त्यावेळी उपस्थिती असणारे शंभुराजे देसाई आणि भरत गोगावले यांनी हा वाद मिटवला. पण दादा भुसे आणि महेंद्र थोरवे दोघेही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते. महेंद्र थोरवे यांच्यामते हे काम लवकर व्हायला पाहिजे होते.
आमदारांमध्ये अशा पद्धतीची धक्काबुक्की होणं आणि तेही एकाच पक्षातल्या आमदारांमध्ये होणं, हे खरंतर महायुची सरकारमधली अशी एक पहिलीच आणि एक मोठी घटना आहे. या घटनेच्या अनुषंगानं जर आपण पाहायला गेलं, तर मागच्या अनेक दिवसांपासून ज्या पद्धतीनं वेगवेगळे वाद, या सर्व आमदारांमध्ये होताना पाहायला मिळत आहेत, त्यावरुन पक्षांतर्गत कलह तर नाही ना, असा देखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे. मात्र ही जी वादावादी आहे, ती लॉबीमध्ये पार पडली आणि त्यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असणारे भरत गोगावले आणि मंत्री शंभूराजे देसाई यांनी मध्यस्थी करत महेंद्र थोरवे आणि दादा भुसे यांना थांबण्याचा प्रयत्न केला.
आणखी वाचा :