(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Video : शिंदेंच्या आमदाराच्या सुरक्षा रक्षकाची एकाला रॉडने बेदम मारहाण, ठाकरे गटाकडून व्हिडीओ व्हायरल
UBT Shivsena on Mahendra Thorve : शिंदेच्या शिवसेनेच्या आमदाराकडून एका व्यक्तीला मारहाण करण्याच आल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे.
UBT Shivsena on Mahendra Thorve : एकनाथ शिंदे यांच्या शिवेसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या सुरक्षा रक्षकांने एका व्यक्तीला रॉडने मारहाण केल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आलाय. या घटनेचा व्हिडीओ ठाकरेंच्या शिवेसेनेने ट्वीटरवर पोस्ट केलाय. त्यामुळे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. महेंद्र थोरवे आमदार आहेत, त्यांच्या बॉडीगार्डने ही मारहाण केल्याचा आरोप केला जातोय. भर रस्त्यामध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय.
मिंधे राजवट फक्त गुंडांसाठीच! pic.twitter.com/zZEjesvLrY
— ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) September 11, 2024
"मिंधे राजवट फक्त गुंडांसाठीच!", ठाकरे गटाचा आरोप
नेरळमधील हा व्हिडीओ असल्याचे सांगितले जात आहे. "मिंधे राजवट फक्त गुंडांसाठीच!", असा आशय लिहित ठाकरे गटाने सोशल मीडियावर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. एका कारमध्ये एक व्यक्ती बसलाय. त्याच्यासोबत बाचाबाची झाल्यानंतर ही मारहाण झाल्याचे सांगण्यात येत आहे. हातात दंडुका घेऊन त्या व्यक्तीला मारहाण केली जात आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ठाकरे गटाकडून उपस्थित केला जातोय. शिवा असं महेंद्र थोरवेंच्या बॉडीगार्डचं नाव आहे, त्याच्याकडून ही मारहाण केली जात असल्याचे ठाकरे गटाकडून सांगण्यात आले आहे.
आमदार महेंद्र थोरवेंनी आरोप फेटाळले
हे कार्यकर्त्यांमध्ये आपआपसात झालेले मतभेद आहेत. त्याच्याशी माझा संबंध नाही. मारहाण करणारा व्यक्ती माझा बॉडीगार्ड नाही. ते असंच सांगत असतात. ज्याला मारहाण झाली आणि ज्याने मारहाण केली ते दोघेही आमच्याच पक्षाचे आहेत. आपआपसांत त्यांचे मतभेद झालेत. नेमकं काय झालंय याबाबत मला कल्पना नाही. मी दर्शन घेण्यासाठी आलो होतो, आता गेल्यानंतर त्याबाबतची माहिती घेईल. आम्हाला सत्तेची मस्ती वगैरे नाही. आम्ही आमचं काम करत आहोत. ठाकरे गट त्याच भांडवल करत आहात. संबंधित व्यक्तीवर योग्य ती कारवाई केली जाईल.
अंबादास दानवे काय म्हणाले ?
सत्तेची माज आणि माज आहे. त्याशिवाय कोण असं करत नाही. पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार झालेला आहे, असं ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे म्हणाले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
दादा, तुमचं वागणं बदललंय, कुणाच्या दबावाखाली भावनिक कार्ड खेळताय? तुमच्यासाठी पवारसाहेबांना धोका दिला, आम्ही काय मिळवलं? अजित पवारांच्या कार्यकर्त्याचे पत्र व्हायरल