एक्स्प्लोर

Eknath Shinde & Ravindra Dhangekar: एकनाथ शिंदेंची धंगेकरांना फायनल वॉर्निंग? म्हणाले, 'त्यांना माझ्याकडून निरोप गेलाय'

Eknath Shinde & Ravindra Dhangekar: जैन बोर्डिंग हाऊस प्रकरणात मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप करणे रवींद्र धंगेकरांना महागात पडणार का? एकनाथ शिंदेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या

Eknath Shinde & Ravindra Dhangekar: गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या (Jain Boarding house) जमीन विक्री व्यवहारावरुन भाजप खासदार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्यावर फटाक्याच्या माळ लावल्याप्रमाणे एकामागोमाग एक आरोपांची राळ उडवून देणारे शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्यावर पक्षाकडून कारवाई होणार असल्याच्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर शनिवारी शिवसेनेचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एक अत्यंत महत्त्वाचे आणि सूचक वक्तव्य केले. कोणत्याही कार्यकर्त्यामुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा पडता कामा नये. मी रवींद्र धंगेकर यांना काय पाठवायचा तो निरोप पाठवला आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले. ते शनिवारी दिल्लीत पंतप्रधान मोदी यांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Pune News)

यावेळी एकनाथ शिंदे यांना पुण्यात रवींद्र धंगेकर यांच्याकडून भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांच्यावर सुरु असलेल्या आरोपांविषयी विचारणा करण्यात आली. त्यावर एकनाथ शिंदे यांनी म्हटले की,   माझ्याकडून रवींद्र धंगेकरांना माझ्याकडून निरोप गेला आहे. महायुतीमध्ये कुठेही मतभेद होता कामा नये. महायुतीमध्ये कुठेही मिठाचा खडा पडता कामा नये, याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. मी पुण्यात गेलो होतो तेव्हाही भाष्य केलं होतं, आजही करतो आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने महायुती जपली पाहिजे. महायुतीमध्ये कुठे बेबनाव होईल, असे कृत्य वक्तव्य करु नये, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

यावर तुम्ही रवींद्र धंगेकर यांच्यावर कारवाई करणार का, असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला. त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले की, रवींद्र धंगेकर यांच्याकडे पक्षाचा काय तो निरोप जायचा होता तो गेला आहे.  धंगेकरांचं वक्तव्य आहे जे आहे, त्याबाबत मी त्यांच्याशी बोलेन. ते मला भेटतीलही, असे  एकनाथ शिंदे  यांनी सांगितले.

Eknath Shinde meets PM Modi: पंतप्रधान मोदी आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीत काय घडलं?

एकनाथ शिंदे यांनी दिवाळीनिमित्त पंतप्रधान मोदी यांची भेट घेतल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी मोदींना संत तुकारामांची मूर्ती भेट म्हणून दिली. पंतप्रधान मोदी यांच्याशी  राज्यात सुरू असलेल्या विकास कामांबाबत चर्चा झाली. त्यांनी काही प्रकल्पांबाबत विचारपूस केली. तसेच मोदीजींनी महायुतीच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामाचं कौतूक केलं. असंच काम यापुढेही सुरू ठेवा अशी सूचनाही त्यांनी केली . मुंबईत पॉड टॅक्सी सुरू करण्याबाबत प्रधानमंत्री आग्रही आहेत. त्याबाबतची माहिती उपमुख्यमंत्री महोदयांनी दिली . या प्रकल्पाला चालना देण्याबाबत चर्चा झाली. महाराष्ट्रातल्या पूरग्रस्त भागाबाबत मोदीजींनी आस्थेने चौकशी केली. उपमुख्यमंत्री महोदयांनी या भागातल्या परिस्थितीबाबत अवगत केलं . केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही मोदीजींनी दिल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

आणखी वाचा

मुरलीधर मोहोळ मीडियासमोर खोटं बोलले? रवींद्र धंगेकरांनी थेट पुरावे दिले, म्हणाले 'त्यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा... '

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top 10 Headlines :  ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
Sangli Municipal Corporation Election: सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
रोहित पवार आजपासूनच घड्याळाच्या प्रचारात; अजित पवारांसोबत पुण्यातून भाजपवर हल्लाबोल करणार?
रोहित पवार आजपासूनच घड्याळाच्या प्रचारात; अजित पवारांसोबत पुण्यातून भाजपवर हल्लाबोल करणार?
मुंबई पुण्याप्रमाणे नाशिकला देखील इमारतींच्या पुनर्विकासासाठी सारखे नियम लागू करणार, एकनाथ शिंदे यांचा शब्द
नाशिकमधील 8 हजार इमारतींच्या पुनर्विकासाला मिळणार गती, एकनाथ शिंदे यांचा विकासकांशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Jayant Patil Sangli : भाजप नेते अन् Ajit Pawar यांच्या राष्ट्रवादीत वाद, जयंत पाटील काय म्हणाले?
Amit Thackeray Majha Katta : दोन्ही भाऊ एकत्र, BMC कशी जिंकणार?; राज 'पुत्र' अमित ठाकरे 'माझा कट्टा'वर
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top 10 Headlines :  ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
Sangli Municipal Corporation Election: सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
रोहित पवार आजपासूनच घड्याळाच्या प्रचारात; अजित पवारांसोबत पुण्यातून भाजपवर हल्लाबोल करणार?
रोहित पवार आजपासूनच घड्याळाच्या प्रचारात; अजित पवारांसोबत पुण्यातून भाजपवर हल्लाबोल करणार?
मुंबई पुण्याप्रमाणे नाशिकला देखील इमारतींच्या पुनर्विकासासाठी सारखे नियम लागू करणार, एकनाथ शिंदे यांचा शब्द
नाशिकमधील 8 हजार इमारतींच्या पुनर्विकासाला मिळणार गती, एकनाथ शिंदे यांचा विकासकांशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद 
ED Raid on I-PAC: पश्चिम बंगालमध्ये राजकीय सल्लागार कंपनी 'आय-पीएसी'वर ईडीची धाड, महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली
पश्चिम बंगालमध्ये राजकीय सल्लागार कंपनी 'आय-पीएसी'वर ईडीची धाड, महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली
शरद पवार सिंह, अजित दादा वाघ, आम्ही लांडग्यांकडे लक्ष देत नाही; राष्ट्रवादीचा भाजपवर पलटवार
शरद पवार सिंह, अजित दादा वाघ, आम्ही लांडग्यांकडे लक्ष देत नाही; राष्ट्रवादीचा भाजपवर पलटवार
Gold Silver Rate : दुसऱ्या दिवशी चांदीचे दर गडगडले, 12225 रुपयांची घसरण, सोनं देखील स्वस्त, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
दुसऱ्या दिवशी चांदीचे दर गडगडले, 12225 रुपयांची घसरण, सोनं देखील स्वस्त, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
US Russia Sanctions Bill: तर भारतावर 50 वरून थेट 500 टक्के टॅक्स? डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाविरुद्ध कठोर निर्बंध लादणाऱ्या विधेयकाला मंजुरी
तर भारतावर 50 वरून थेट 500 टक्के टॅक्स? डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाविरुद्ध कठोर निर्बंध लादणाऱ्या विधेयकाला मंजुरी
Embed widget