एक्स्प्लोर

Eknath Shinde : पोलिसांबद्दलच्या वक्तव्यासाठी स्वत: एकनाथ शिंदेंकडून दिलगिरी; भर सभेत आमदार संजय गायकवाडांचे टोचले कान

भावनेच्या भरात बोलताना संजय गायकवाड हे वाहून जातात. पण आपण जबाबदार शिवसैनिक आहोत, हे त्यांनी लक्षात ठेवावं, असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भर सभेत शिवसेना संजय गायकवाड यांचे कान टोचले आहे.

बुलढाणा: भावनेच्या भरात बोलताना संजय गायकवाड हे वाहून जातात. पण आपण जबाबदार शिवसैनिक आहोत, हे त्यांनी लक्षात ठेवावं, असे म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भर सभेत शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad)  यांचे कान टोचले आहे. संजय गायकवाड यांनी काल (शनिवारी) पोलिसांवर टीका करताना आक्षेपार्ह भाषा वापरली होती. त्यानंतर संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, पोलिसांबद्दलच्या आक्षेपार्ह वक्तव्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावरती नाराजी व्यक्त केली होती. सोबतच त्यांची तक्रार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे करणार असल्याचेही म्हणाले होते. त्यावरून संजय गायकवाडांनी दिलगिरीही व्यक्त केली. अशातच आज एकनाथ शिंदे यांनी आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांना पुन्हा एकदा समज देत आपण जबाबदार शिवसैनिक असल्याची आठवण करून दिली आहे. ते बुलढाणा येथील आभार सभेत बोलत होते.

पोलिसांबद्दल केलेल्या वक्तव्यासाठी मी सुद्धा दिलगिरी व्यक्त करतो -एकनाथ शिंदे

संजय गायकवाड यांनी पोलिसांबद्दल केलेलं विधान आणि त्या मागचा उद्देश हा पूर्ण पोलीस दलाच्या बाबतीत नव्हता. मात्र त्यांनी बोलताना खबरदारी बाळगली पाहजे. शिवाय त्यांनी आता दिलगिरी व्यक्त केली आहेत. संजयराव तुमच्या काही पोलिसांबाबत तक्रारी असतील तर माझ्याकडे किंवा मुख्यमंत्र्‍यांकडे करा, परंतु तुम्ही केलेल्या वक्तव्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन होता कामा नये. त्यांचा आदर केला पाहिजे. वर्दीचा आदर सर्व शिवसैनिकांनी राखला पाहिजे. मी स्वता: संजय गायकवाड यांना फोन करून नाराजी व्यक्त केली. मलाही वाईट वाटलं असून संजय गायकवाड यांनी पोलिसांबद्दल केलेल्या वक्तव्यासाठी स्वता: मी सुद्धा दिलगिरी व्यक्त करतो असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटले आहे. 

 हा शेवटचा आतंकवादी हल्ला असेल-एकनाथ शिंदे 

काश्मीरच्या पहलगाम येथील हल्ला दुर्दैवी होता. त्या ठिकाणी जाणे हे माझं कर्तव्य होतं. मात्र त्यातही विरोधक राजकारण करतात. हा देशावर हल्ला आहे.देशाच्या आत्म्यावर हल्ला आहे. मात्र पंतप्रधान मोदीजी सक्षम आहेत. खून का बदला खून से ही आपली सर्वांची भावना आहे. आता ही आरपारची लढाई असेल. हा शेवटचा आतंकवादी हल्ला असेल. आता घुसके मारने वाला भारत आहे. सगळे भारतीय आज पंतप्रधानांच्या पाठीशी उभे आहेत. देशातील सर्व पक्ष अतिरेकी हल्ल्यानंतर मदतीला गेले. मात्र उबाठा गेले नाहीत, हे यांचं देशप्रेम? असा सवाल करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर हल्लाबोल केला आहे. 

विरोधकांना बांबू लावत नाही तर बांबू लागवडीसाठी अनुदान देतो  

दरम्यान, यापूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री सहायता निधी फक्त तीन कोटी रुपये दिले, मी जीव वाचवण्यासाठी 400 कोटी रुपये वाटले. लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही. पाच वर्षाचा वचन नामा जो दिलाय तो टप्प्याटप्प्याने पूर्ण करणारच. आम्ही प्रिंटिंग मिस्टेकवाले नाहीत. हे आमचं सरकार दिलेला शब्द पाळणारे आहे. आम्ही सुरू केलेल्या योजनांमुळेच यावेळी आम्हाला क्रांतिकारी विजय मिळाला. आम्ही विरोधकांना बांबू लावत नाही तर बांबू लागवडीसाठी अनुदान देतो. योजनांसाठी पैसे कधीही कमी पडू देणार नाही, एवढा शब्द आपणास देतो, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

हे ही वाचा 

 

 बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत , M.J. ( mass com ) नंतर गेल्या तीन वर्षापासून एबीपी माझा साठी कार्यरत.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Budget 2026: शेतकऱ्यांसाठी केलेली कर्जमाफी तकलादू, सरकारने पुन्हा विश्वासघात केलाय; मुख्यमंत्र्यांच्या कर्जमाफीच्या घोषणेवर राजू शेट्टींचा हल्लाबोल
शेतकऱ्यांसाठी केलेली कर्जमाफी तकलादू, सरकारने पुन्हा विश्वासघात केलाय; मुख्यमंत्र्यांच्या कर्जमाफीच्या घोषणेवर राजू शेट्टींचा हल्लाबोल
Maharashtra Budget 2026: रामकाल पथ विकास प्रकल्प ते ओझर विमानतळाचा विस्तार, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिककरांना अर्थसंकल्पातून काय मिळालं? जाणून घ्या
रामकाल पथ विकास प्रकल्प ते ओझर विमानतळाचा विस्तार, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिककरांना अर्थसंकल्पातून काय मिळालं? जाणून घ्या
Uddhav Thackeray And Eknath Shinde Vidhabhavan Video: उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना खांदा लागता लागता राहिला, विधानभवनात काय घडलं?
ठाकरे आणि शिंदे आमनेसामने; एकमेकांना खांदा लागता लागता राहिला, विधानभवनात काय घडलं?, VIDEO
Maharashtra Budget 2026: लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

व्हिडीओ

Uddhav Thackeray Eknath Shinde Vidhabhavan :उद्धव ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने;विधानभवनात काय घडलं?
Devendra Fadnavis Budget 2026 : 2 लाखांपर्यंत कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी, मोठी घोषणा
Sanjay Raut PC : मोदींनी इस्रायल-इराणचं युद्ध थांबवावं, युद्धाचे परिणाम भारताला भोगावे लागणार - राऊत
Gold Silver Rate Update : अमेरिका इजरायल आणि इराणमधील युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण
Amol Mitkari On Ajit Pawar : अजितदादांशिवाय अर्थसंकल्प ही कल्पनाच असह्य, मिटकरींच्या डोळ्यात अश्रू

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Budget 2026: शेतकऱ्यांसाठी केलेली कर्जमाफी तकलादू, सरकारने पुन्हा विश्वासघात केलाय; मुख्यमंत्र्यांच्या कर्जमाफीच्या घोषणेवर राजू शेट्टींचा हल्लाबोल
शेतकऱ्यांसाठी केलेली कर्जमाफी तकलादू, सरकारने पुन्हा विश्वासघात केलाय; मुख्यमंत्र्यांच्या कर्जमाफीच्या घोषणेवर राजू शेट्टींचा हल्लाबोल
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Maharashtra Budget 2026: लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
मोठी बातमी: जेसीबीच्या बाजूला जेवायला बसले, कामगारांना ट्रकने उडवलं, छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्गावर दोघांचा जागीच मृत्यू, 3 जखमी
मोठी बातमी: जेसीबीच्या बाजूला जेवायला बसले, कामगारांना ट्रकने उडवलं, छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्गावर दोघांचा जागीच मृत्यू, 3 जखमी
Maharashtra Budget 2026: देवेंद्र फडणवीसांच्या अर्थसंकल्पातील सर्वात मोठी घोषणा, शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर, कोणाला लाभ मिळणार?
देवेंद्र फडणवीसांच्या अर्थसंकल्पातील सर्वात मोठी घोषणा, शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर, कोणाला लाभ मिळणार?
Embed widget