एक्स्प्लोर

Chhagan Bhujbal : पहाटेचा शपथविधी, अजितदादांची मिटिंगला दांडी अन्...शरद पवार रागाने निघून गेले; पहाटेच्या शपथविधीची छगन भुजबळांनी सांगितली रंजक कहाणी!

Chhagan Bhujbal on Dhananjay Munde : पहाटेच्या शपथविधीच्या वेळी मी अजितदादांना सांगत होतो की, तुम्ही भाजपसोबत जाऊ नका, हे षडयंत्र आहे, असे खळबळजनक वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलं, त्यानंतर आज भुजबळांनी त्यावेळचा एक किस्सा सांगितला आहे.

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिर्डीमध्ये शिबीर पार पडले. या शिबिरामध्ये बोलताना पक्षाचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी 2019 साली झालेल्या पहाटेच्या शपथविधीबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. पहाटेच्या शपथविधीच्या वेळी मी अजितदादांना (Ajit Pawar) सांगत होतो की, तुम्ही भाजपसोबत जाऊ नका, हे षडयंत्र आहे, असे खळबळजनक वक्तव्य मुंडेंनी केलं, त्यावरती अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. मात्र, आज पक्षाचे नेते आणि आमदार छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) 2019 च्या पहाटेच्या शपथविधीची रंजक कहाणी माध्यमांशी बोलताना सांगितली आहे.

छगन भुजबळांनी सांगितली रंजक कहाणी!

माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले, धनंजय मुंडे (Dhananjay Munde)  यांचे भाषण झालं, त्यावेळी मी नव्हतो. मात्र, माध्यमांच्या द्वारे मी त्यांचा भाषण ऐकलं. मुंडे म्हणाले, ते षडयंत्र होतं. मग हे षडयंत्र कोणी रचलं? एकतर उद्धव ठाकरे षडयंत्र रचू शकत नाहीत. काँग्रेस देखील असं षडयंत्र रचू शकत नाही. मग राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांनी हे षडयंत्र रचलं की भाजपच्या नेत्यांनी रचलं? याची काहीच माहिती नाही. मला एवढं मात्र आठवतं, त्यावेळेला मीटिंग सुरू होत्या. काँग्रेस, ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांच्या बैठका सुरू असताना काँग्रेसचे नेते खरगे आणि शरद पवार यांच्यामध्ये थोडासा वाद झाला आणि शरद पवार रागाने निघून गेले. 

त्याच्यानंतर काही प्रमुख मंडळीची मिटिंग सुरू होत्या. आमच्या राष्ट्रवादीची आठ वाजता एका ठिकाणी मीटिंग बोलवली गेली. परंतु, त्या मिटींगला अजित दादा हजर नव्हते. ते कुठेतरी अडकले होते. दुसऱ्या दिवशी ज्यावेळी सकाळी टीव्ही लावल्या,आठ नऊ वाजता तेव्हा लक्षात आलं की, अजितदादांचा शपथविधी झालेला आहे. मी शरद पवार यांच्याकडे गेलो. तोपर्यंत उद्धव ठाकरे यांना फोन केलेला होता आणि सांगितलं होतं, आपण मजबुतीने उभा राहिला पाहिजे आणि हा जो काही प्रयत्न झालेला आहे, ते होणार नाही याची आपण काळजी घेण्यासाठी कामाला लागू या. आम्ही सर्वजण तेव्हा विचारात होतो, आम्हाला याबाबतची काहीच कल्पना नव्हती की, असं होईल. अचानकच ते सगळं झालं होतं. त्यावेळी आम्ही सुद्धा इकडे तिकडे गेलेले आमदार यांना गोळा करायला सुरुवात केली. हे मला माहिती आहे, पुढे त्यानुसार मी प्रत्यक्ष अजित पवार यांच्या घरी गेलो. त्यांना सांगितलं तुम्ही असं करू नका परंतु दुसऱ्या दिवशी कोर्टाचा निकाल आला. त्या निकालाच्या नंतर देखील आम्ही त्यांना सांगितलं निकालानंतर तुमची पुढची वाटचाल फार कठीण झालेला आहे. तुम्ही हे सगळं सोडून द्या आणि पुन्हा एकदा शरद पवार यांच्याकडे परत या, असं छगन भुजबळ यांनी अजित पवारांनी सांगितलं होतं.

त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसची जी मीटिंग झाली, त्याच्यामध्ये सर्व आमदार हजर होते. त्यावेळी मी ठराव मांडला. अजित पवार चुकले असतील ठीक आहे. परंतु त्यांना परत आपल्या पक्षांमध्ये घेतलं पाहिजे आणि त्यानंतर अजित पवार यांना मीटिंगमध्ये आणण्यात आलं. त्यानंतर त्यांचं सगळ्यांनी स्वागत केलं. इतकंच नव्हे तर उपमुख्यमंत्री कोणाला करायचं तर या वेळेला सुद्धा सांगितलं होतं अजित पवार यांना उपमुख्यमंत्री करा. हे मी सांगितलं. त्यावेळी काहींना वाटत होतं अजित दादा नाहीतर आपण उपमुख्यमंत्री व्हावे, त्यांना थोडासं वाईट वाटलं, त्यांना माझा राग सुद्धा आला होता, परंतु त्यावेळी मला ते योग्य वाटलं म्हणून मी केलं. काल धनंजय मुंडें यांनी जे काही सांगितलं, त्याचा रोख कोणाकडे होता याची मला काही कल्पना नाही, ते त्यांनाच विचारा असंही पुढे छगन भुजबळ यांनी म्हटल आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Accident : नाशिकमध्ये कंटेनरनं ओव्हरटेक करताना रिक्षाला उडवलं; चार वर्षीय चिमुकलीसह तिघांचा मृत्यू
नाशिकमध्ये कंटेनरनं ओव्हरटेक करताना रिक्षाला उडवलं; चार वर्षीय चिमुकलीसह तिघांचा मृत्यू
US Exit From WHO : डोनाल्ड ट्रम्प ऑन अॅक्शन मोड; अमेरिका WHO मधून बाहेर पडणार, निर्णयानं जगभरात खळबळ
डोनाल्ड ट्रम्प ऑन अॅक्शन मोड; अमेरिका WHO मधून बाहेर पडणार, निर्णयानं जगभरात खळबळ
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा अवघ्या 24 तासांमध्ये सर्जिकल स्ट्राईक! लाखो भारतीयांचा स्वप्नांचा चक्काचूर, आजवरच्या 'शाॅर्टकट'वर एका झटक्यात आसूड ओढला
डोनाल्ड ट्रम्प यांचा अवघ्या 24 तासांमध्ये सर्जिकल स्ट्राईक! लाखो भारतीयांचा स्वप्नांचा चक्काचूर, आजवरच्या 'शाॅर्टकट'वर एका झटक्यात आसूड ओढला
Crop Insurance : एक रुपयात पीक विमा योजनेतील गैरप्रकार निदर्शनास , योजनेचा अंतिम निर्णय कुठं अन् कोण घेणार? कृषीमंत्री म्हणाले...
एक रुपयात पीक विमा योजनेतील गैरप्रकार निदर्शनास, दोघांवर कारवाई, कृषीमंत्री म्हणाले अंतिम निर्णय...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : ...तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पाठिंबा देऊ, संजय राऊतांचं मोठं वक्तव्यABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 21 January 2024Jayant Patil on Akshay Shinde | शाळा मालकाला वाचवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, जयंत पाटलांची टीकाVijay Wadettiwar on Devendra Fadnavis|गडचिरोलीला 2 नाहीतर 3 पालकमंत्री द्या,वडेट्टीवारांची खोचक टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Accident : नाशिकमध्ये कंटेनरनं ओव्हरटेक करताना रिक्षाला उडवलं; चार वर्षीय चिमुकलीसह तिघांचा मृत्यू
नाशिकमध्ये कंटेनरनं ओव्हरटेक करताना रिक्षाला उडवलं; चार वर्षीय चिमुकलीसह तिघांचा मृत्यू
US Exit From WHO : डोनाल्ड ट्रम्प ऑन अॅक्शन मोड; अमेरिका WHO मधून बाहेर पडणार, निर्णयानं जगभरात खळबळ
डोनाल्ड ट्रम्प ऑन अॅक्शन मोड; अमेरिका WHO मधून बाहेर पडणार, निर्णयानं जगभरात खळबळ
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा अवघ्या 24 तासांमध्ये सर्जिकल स्ट्राईक! लाखो भारतीयांचा स्वप्नांचा चक्काचूर, आजवरच्या 'शाॅर्टकट'वर एका झटक्यात आसूड ओढला
डोनाल्ड ट्रम्प यांचा अवघ्या 24 तासांमध्ये सर्जिकल स्ट्राईक! लाखो भारतीयांचा स्वप्नांचा चक्काचूर, आजवरच्या 'शाॅर्टकट'वर एका झटक्यात आसूड ओढला
Crop Insurance : एक रुपयात पीक विमा योजनेतील गैरप्रकार निदर्शनास , योजनेचा अंतिम निर्णय कुठं अन् कोण घेणार? कृषीमंत्री म्हणाले...
एक रुपयात पीक विमा योजनेतील गैरप्रकार निदर्शनास, दोघांवर कारवाई, कृषीमंत्री म्हणाले अंतिम निर्णय...
Sanjay Raut : पालकमंत्रिपदाची दंगल आर्थिक व्यवहारासाठी, संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले, नाशिक अन् रायगडमध्ये...
पालकमंत्रिपदाची दंगल आर्थिक व्यवहारासाठी, संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले, नाशिक अन् रायगडमध्ये...
Beed: बीडच्या आष्टी तालुक्यात धक्कादायक प्रकार, HIV झाल्याच्या अफवेने कुटुंबाला वाळीत टाकलं
बीडच्या आष्टी तालुक्यात धक्कादायक प्रकार, HIV झाल्याच्या अफवेने कुटुंबाला वाळीत टाकलं
Who is Neeraj Chopra wife Himani Mor : सासऱ्यानं गावात स्टेडियम बांधलं, एकाच घरात तीन खेळ, मेव्हणा नागपुरात; नीरज चोप्राची बायको हिमानी आहे तरी कोण?
सासऱ्यानं गावात स्टेडियम बांधलं, एकाच घरात तीन खेळ, मेव्हणा नागपुरात; नीरज चोप्राची बायको हिमानी आहे तरी कोण?
Donald Trump : अध्यक्ष होताच डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणीत वाढ, गुन्हा दाखल, एलन मस्क देखील संकटात
डोनाल्ड ट्रम्प यांना अध्यक्ष होताच पहिला धक्का, गुन्हा दाखल; एलन मस्क देखील संकटात
Embed widget