'दिल्लीत सीबीआयच्या छाप्यामुळे गुजरातमध्ये आपचे मतदार 4 टक्क्यांनी वाढले,' केजरीवालांचा दावा
Gujarat Election 2022: केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानावर छापे टाकल्यानंतर गुजरातमध्ये आम आदमी पक्षाच्या (AAP) मतांची टक्केवारी चार टक्क्यांनी वाढल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विधानसभेत सांगितले.
कट्टर ईमानदार AAP
— AAP (@AamAadmiParty) September 1, 2022
🔹ईमानदार, असली Degree
🔹भारतवाद, India को No 1 बनाना
🔹School-Hospital बनाना
🔹महिलाओं का सम्मान
कट्टर बेईमान BJP
🔸भ्रष्टाचारी, Fake डिग्री
🔸दोस्तवाद, दोस्त को No 1 बनाना
🔸दोस्तों के Tax माफ़,MLA ख़रीदना,ज़हरीली शराब बेचना
🔸Rapists के साथ
-@ArvindKejriwal pic.twitter.com/wxRWyWgh2S
आप पक्षात शिक्षित आणि आयआयटी पदवीधारक
भारतीय जनता पक्षाची (BJP) खिल्ली उडवत केजरीवाल म्हणाले की, भाजप नेत्यांनी आप आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्या एकाही आमदाराने त्यांची ऑफर स्वीकारली नाही. केजरीवाल म्हणाले, "पूर्णपणे भ्रष्ट पक्षात शिक्षित लोकांची कमतरता आहे. तर कट्टर प्रामाणिक (आपमध्ये) पक्षात सुशिक्षित, आयआयटी पदवीधारक आहेत.
केजरीवाल म्हणाले की, ते आमदारांना विकत घेण्यासाठी 20-50 कोटी खर्च करत आहेत. मला शाळा आणि रुग्णालये बांधायची असतील तर मी काही चुकीचे करत आहे का? दरम्यान, दिल्लीतील भाजपचे ऑपरेशन लोटस अयशस्वी झाल्याचे सांगण्यासाठी आप सरकारने सोमवारी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव आणला. आम आदमी पक्षाने हा विश्वासदर्शक ठराव 58 मतांनी जिंकला.