एक्स्प्लोर

Anant Garje Affair crime: अनंत गर्जेंशी अनैतिक संबंध असणारी ती महिला खरी गुन्हेगार, तिला मोकाट सोडू नका, गौरी पालवेंच्या मृत्यूनंतर रुपाली ठोंबरेंची महत्त्वाची मागणी

Anant Garje Wife Dr Gauri Palve ends life : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी सोशल मीडियावरुन अनंत गर्जे प्रकरणी संताप व्यक्त केला आहे.

पुणे : भाजपचे नेते आणि मंत्री पंकजा मुंडे यांचा पीए अनंत गर्जेची पत्नी डॉ गौरी पालवे-गर्जे (Dr Gauri Palve Death case) हिने शनिवारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती अनंत गर्जे याच्यावर गुन्हा दाखल करुन रविवारी मध्यरात्री अटक करण्यात आली आहे. गर्जेचे मूळ गाव मोहोज देवढे (ता. पाथर्डी) येथे त्याच्या घरासमोरच डॉ. गौरी पालवेंच्या (Dr Gauri Palve Death case) पार्थिवावर नातेवाईकांनी अंत्यसंस्कार केले. यावेळी गौरी पालवेंच्या वडिलांचा आक्रोश पाहून सर्वजण हळहळले, या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी सोशल मीडियावरुन अनंत गर्जे प्रकरणी संताप व्यक्त केला आहे. त्याचबरोबर अनंत गर्जेचे ज्या महिलेसोबत संबंध होते, ती देखील मोकोट राहता कामा नये, असंही त्यांनी म्हटलं आहे.(Dr Gauri Palve Death case)

Anant Garje & Gauri Palve: डॉ. गौरी यांच्या वडिलांचा आक्रोश पाहिला 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी सोशल मीडियावरुन पोस्ट लिहून या प्रकरणी भाष्य केलं आहे, "अशा घटना अत्यंत दुर्दैवीच असतात. डॉ गौरी यांच्या वडिलांचा आक्रोश पाहिला. श्रीमंताला पोरी देऊ नका असे म्हणत ओक्साबोक्शी रडत होते, एक बाप हतबल होता. पण घरातील माणसाने आत्महत्या केल्यावर हे कळण्यापेक्षा, आधीच घरातील लोकांनी संवाद, समन्वय असणे फार फार महत्त्वाचे आहे. मुळामध्ये मुलींना सक्षम बनून त्यांची मानसिक स्थिती ही माहेरचे किंवा सासरचे दोघांकडे एक समंजसपणाचे वागणे हे फार महत्त्वाचे आहे. डॉक्टर जरी असली तरी त्या सिच्युएशनला या नवरा बायकोच्या भांडणांमध्ये नवऱ्याचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर यावरुन झालेले वाद हे फार महत्त्वाचे आहेत.नवऱ्यावर, सासूवर तसेच नणंद यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. त्याचप्रमाणे जिच्या सोबत एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होतं, त्या महिलेला सुद्धा गुन्ह्यात आरोपी करणे गरजेचे महत्वाचे आहे" असे रुपाली पाटील ठोंबरे यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे.

एक घर एक महिला उभे करू शकते तसेच ती महिला जर एखाद्याचे घर संपवण्याचे कारण बनू शकते अशा बेकायदेशीर संबंध कृत्य करणाऱ्या, अनैतिक संबंध ठेवणाऱ्या महिलांवर सुद्धा गुन्हा दाखल केलाच पाहिजे, त्याशिवाय कुटुंब वाचणार नाहीत,कुटुंब सुरक्षित राहणार नाहीत.आणि अनैतिक संबंध करण्याचे धाडस करणार नाही.यामुळे कुटुंब वाचतील.पत्नी तिच्या नवऱ्याचे अनैतिकसंबंध आहेत म्हणून  आत्महत्या करते तेव्हा नवऱ्यावर त्याच्या घरातील लोकांवर गुन्हा दाखल होतो पण खरी जी गुन्हेगार आहे अनैतिक संबंध ठेवणारी महिला मोकाट राहता कामा नये.बाकी यावर सविस्तर बोललेच. महत्वाचे म्हणजे अजून एक जाता जाता कितीही संकट ,भांडण झाले तरी आत्महत्या पर्याय नाही.त्यामुळे आत्महत्या कोणीही करूच नये, असंही पुढे रुपाली पाटील ठोंबरे यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे.

Anant Garje & Gauri Palve: तणावपूर्ण वातावरणात सासऱ्यांनी पार पाडला अंत्यविधी

काल (सोमवारी दि.२४) सकाळी गौरी यांचा मृतदेह मोहोज देवढे येथे आणण्यात आला. यावेळी माहेरकडील लोकांनी सासरच्या घरासमोरच अंत्यसंस्कार करण्याची भूमिका घेतली. यावेळी सासरच्यांनी त्यास विरोध केला. त्यामुळे दोन्ही बाजूंनी मोठा वाद निर्माण झाला. घटनास्थळी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करून लोकांना शांत केले. सर्वांची समजूत घातली.पोलिसांनी परिस्थिती हाताळून सुरळीत केली. अखेर घरापासून काही अंतरावर गौरीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तिच्या वडीलांनी आक्रोश केला.

Anant Garje & Gauri Palve:  श्रीमंताच्या नादी लागू नका, भपक्यावर जाऊ नका...

गौरीच्या अंत्यसंस्काराला वडील धाय मोकलून रडले, पोलिसांना म्हणाले, 'तुम्हाला मुली असतील तर मला न्याय द्या'. 'तुम्हाला मुली असतील, तर त्या गरिबाला द्या. श्रीमंतांच्या नादी लागू नका, त्यांच्या भपक्यावर जाऊ नका...' असं म्हणत गौरीच्या वडिलांनी पोलिसांसमोरच न्यायासाठी हंबरडा फोडला. 

रविवारी रात्री 1 वाजता वरळी पोलिसांनी अनंत गर्जे याला अटक केली होती. अनंत गर्जे याच्यासह त्याचा भाऊ आणि बहिणीवर डॉ. गौरी पालवे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनंत गर्जे यांना आज न्यायालयात हजर केले जाणार असून त्यांची रवानगी पोलीस कोठडीत होऊ शकते.अनंत गर्जे यांच्या वरळीतील घराची झाडाझडती घेण्यात आली आहे.

Anant Garje & Gauri Palve: गर्जेंच्या प्रेमसंबंधांविषयी गौरीच्या कुटुंबीयांना अगोदरच माहिती होतं

मंत्री पंकजा मुंडे यांचा पीए अनंत गर्जेच्या प्रेमसंबंधाबाबत लग्नापूर्वीच डॉ. गौरी पालवेच्या कुटुंबीयांना सांगण्यात आले होते, असा दावा त्याच्या वकिलाने पोलिस कोठडीला विरोध करताना न्यायालयात केला आहे. अशोक पालवे यांनी जबाबात उल्लेख केलेली मूळ कागदपत्रे लातूर येथील रुग्णालयात आहेत. ती ताब्यात घेऊन गौरी पालवेंचे वडील अशोक पालवे यांनी केलेल्या आरोपांची शहानिशा करावी लागेल. अनंत गर्जेसह त्याच्या भावंडांवर देखील आरोप आहेत. त्यांचाही शोध सुरू असून त्यांची चौकशी करणे बाकी असल्याचे सांगत सरकारी वकिलांनी गर्जेच्या कोठडीची मागणी केली.

अनंत गर्जेचे वकील अॅड. मंगेश देशमुख यांनी कोठडीला विरोध करत, दाखल गुन्ह्यातून डॉ. गौरी यांना आरोपीने आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे स्पष्ट होत नसल्याचे म्हटले. घटना घडली तेव्हा डॉ. गौरी घरी एकट्याच होत्या. त्यांनी घर आतून बंद केले होते. शिवाय प्रेमसंबंधांबाबत आरोपीने लग्नापूर्वीच डॉ. गौरी यांच्या कुटुंबीयांना कल्पना दिली, असा युक्तिवाद केला. मात्र, न्यायालयाने गर्जेला २७पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोण तिघींसोबत, कोण म्हणतोय ती 1 हजार डाॅलर मागत आहे! एपस्टीनच्या अय्याशीच्या अड्ड्यातून नव्या 68 फोटोंनी जगभरात धुमाकूळ! बिल गेट्स सुद्धा नको त्या अवस्थेत
कोण तिघींसोबत, कोण म्हणतोय ती 1 हजार डाॅलर मागत आहे! एपस्टीनच्या अय्याशीच्या अड्ड्यातून नव्या 68 फोटोंनी जगभरात धुमाकूळ! बिल गेट्स सुद्धा नको त्या अवस्थेत
Pune Shivsena: रविंद्र धंगेकरांच्या मागणीला एकनाथ शिंदेंनी केराची टोपली दाखवली? पुण्यात शिवसेना 35-40 जागांवर लढण्यास तयार, रात्री महत्त्वाची बैठक
रविंद्र धंगेकरांच्या मागणीला एकनाथ शिंदेंनी केराची टोपली दाखवली? पुण्यात शिवसेना 35-40 जागांवर लढण्यास तयार, रात्री महत्त्वाची बैठक
Omraje Nimbalkar: एवढा उन्माद येतो कुठून? तुळजापुरातही बीड प्रमाणे 'आका' संस्कृती आणायचीय का? गोळीबार प्रकरणानंतर ओमराजे निंबाळकरांचा संतप्त सवाल
तुळजापुरातही बीड प्रमाणे 'आका' संस्कृती आणायचीय का? सरपंच देशमुखांच्या हत्याप्रमाणेच हत्या करायची होती का? गोळीबार प्रकरणानंतर ओमराजे निंबाळकरांचा संतप्त सवाल
'धुरंधर'मध्ये रणवीरला टक्कर देणारा 'हँडसम हंक', रातोंरात कित्येक मुलींचा क्रश बनला, आता म्हणतोय, 'मला पाकिस्तानातूनही...'
'धुरंधर'मध्ये रणवीरला टक्कर देणारा 'हँडसम हंक', रातोंरात कित्येक मुलींचा क्रश बनला, आता म्हणतोय, 'मला पाकिस्तानातूनही...'
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
Ajit Pawar : अजित पवार चक्रव्यूहात, कोकाटे, मुंडे, पार्थ पवार नंचर आता ड्रग्ज प्रकरणाची डोकेदुखी
Maharashtra LIVE Superfast News : बातम्यांचा वेगवान आढावा : 18 DEC 2025 : ABP Majha
Manikrao Kokate Arrest Update : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
Ajit Pawar On Manikrao Kokate : अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोण तिघींसोबत, कोण म्हणतोय ती 1 हजार डाॅलर मागत आहे! एपस्टीनच्या अय्याशीच्या अड्ड्यातून नव्या 68 फोटोंनी जगभरात धुमाकूळ! बिल गेट्स सुद्धा नको त्या अवस्थेत
कोण तिघींसोबत, कोण म्हणतोय ती 1 हजार डाॅलर मागत आहे! एपस्टीनच्या अय्याशीच्या अड्ड्यातून नव्या 68 फोटोंनी जगभरात धुमाकूळ! बिल गेट्स सुद्धा नको त्या अवस्थेत
Pune Shivsena: रविंद्र धंगेकरांच्या मागणीला एकनाथ शिंदेंनी केराची टोपली दाखवली? पुण्यात शिवसेना 35-40 जागांवर लढण्यास तयार, रात्री महत्त्वाची बैठक
रविंद्र धंगेकरांच्या मागणीला एकनाथ शिंदेंनी केराची टोपली दाखवली? पुण्यात शिवसेना 35-40 जागांवर लढण्यास तयार, रात्री महत्त्वाची बैठक
Omraje Nimbalkar: एवढा उन्माद येतो कुठून? तुळजापुरातही बीड प्रमाणे 'आका' संस्कृती आणायचीय का? गोळीबार प्रकरणानंतर ओमराजे निंबाळकरांचा संतप्त सवाल
तुळजापुरातही बीड प्रमाणे 'आका' संस्कृती आणायचीय का? सरपंच देशमुखांच्या हत्याप्रमाणेच हत्या करायची होती का? गोळीबार प्रकरणानंतर ओमराजे निंबाळकरांचा संतप्त सवाल
'धुरंधर'मध्ये रणवीरला टक्कर देणारा 'हँडसम हंक', रातोंरात कित्येक मुलींचा क्रश बनला, आता म्हणतोय, 'मला पाकिस्तानातूनही...'
'धुरंधर'मध्ये रणवीरला टक्कर देणारा 'हँडसम हंक', रातोंरात कित्येक मुलींचा क्रश बनला, आता म्हणतोय, 'मला पाकिस्तानातूनही...'
Parli Crime : परळीतील औष्णिक विद्युत केंद्रात चोरट्यांचा धुमाकूळ; चक्क दुचाकीसह ऑटो घेऊन आत शिरले; विद्युत केंद्राच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
परळीतील औष्णिक विद्युत केंद्रात चोरट्यांचा धुमाकूळ; चक्क दुचाकीसह ऑटो घेऊन आत शिरले; विद्युत केंद्राच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
Dhurandhar Record In Pakistan: देशविरोधी सिनेमा असूनही पाकिस्तानात 'धुरंधर'चं तुफान; बंदीमुळे रिलीज झाला नाही, तर पायरेटेड कॉपी डाऊनलोड करण्याचा वाढला ट्रेंड
देशविरोधी सिनेमा असूनही पाकिस्तानात 'धुरंधर'चं तुफान; 20 वर्षांतली सर्वाधिक पाहिली गेलेली 'पायरेटेड बॉलिवूड फिल्म'
Maharashtra Live Updates: विठ्ठल रुक्मिणी मूर्ती पूर्णपणे सुरक्षित, पुरातत्व विभागाचा अहवाल शासनाकडे पाठवला
Maharashtra Live Updates: विठ्ठल रुक्मिणी मूर्ती पूर्णपणे सुरक्षित, पुरातत्व विभागाचा अहवाल शासनाकडे पाठवला
Manikrao Kokate: नाशिक पोलिसांनी लीलावती रुग्णालयात पाऊल ठेवताच माणिकराव कोकाटेंची प्रकृती आणखी बिघडली? अँजिओग्राफी होण्याची शक्यता
नाशिक पोलिसांनी लीलावती रुग्णालयात पाऊल ठेवताच माणिकराव कोकाटेंची प्रकृती आणखी बिघडली? अँजिओग्राफी होण्याची शक्यता
Embed widget