सुषमा अंधारे यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव, प्रवीण दरेकर आक्रमक, नेमकं कारण काय?
Praveen Darekar : भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी सभागृहात आक्रमक भूमिका घेत, सुषमा अंधारे यांच्यावर हक्कभंग आणावा असा प्रस्ताव मांडला
नागपूर : ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्यावर हक्कभंग आणावा असे म्हणत भाजप नेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. विधानसभेचे आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना बोलण्याची संधी उपसभापती निलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी दिली नसल्याचा आरोप सुषमा अंधारेंनी केला आहे. धंगेकर विधान परिषदेचे सदस्य नसताना माहिती न घेता आरोप करणे चुकीचे आहे. त्यांच्यावर हक्कभंग आणण्याचा प्रस्ताव प्रविण दरेकर यांनी मांडला आहे.
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी विधानसभेचे आमदार रविंद्र धंगेकर यांना बोलण्याची संधी उपसभापती निलम गोऱ्हे यांनी दिली नसल्याचा आरोप करत व्हिडिओ व्हायरल केला होता. दरम्यानम यावरूनच भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी आक्रमक भूमिका घेत धंगेकर विधान परिषदेचे सदस्य नसतांना त्यांना बोलू न देण्याचा विषयच येत नसल्याचे मत मांडले. तसेच, माहिती न घेता आरोप करणे चुकीचे असून, सुषमा अंधारे यांच्यावर हक्कभंग आणण्याचा प्रस्ताव दरेकर यांनी विधान परिषदेत मांडला. विशेष म्हणजे यावर अनेक आमदारांनी देखील आपली भूमिका सभागृहात मांडली.
आमदारांच्या प्रतिक्रिया...
दरम्यान, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर हक्कभंग आणावा असे म्हणत भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी घेतलेल्या भुमिकेवर अनेक राजकीय प्रतिक्रिया देखील येत आहे. यावर आमदार शशिकांत शिंदे म्हणाले की, सभागृहाबाहेर बोलल्याचा संबंध सभागृहाशी नाही. अशा प्रकारे हक्कभंग मांडणे, हा नियम बनू शकतो. तर, याबाबत नियम बनविण्याची गरज आहे. त्यासाठी समिती नेमली पाहिजे असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले. तसेच, सुषमा अंधारे याचे असे बोलणे चूकीचे असल्याचं मी मान्य करतो असे सचिन अहिर म्हणाले.
निलम गोऱ्हे यांची प्रतिक्रिया...
दरम्यान, या सर्व प्रकरणावर स्वतः उपसभापती निलम गोऱ्हे यांची प्रतिक्रिया देखील आली आहे. "धंगेकर इकडे सदस्य नसताना मी कसे बोलू दिले नाही. याचे कोडे उलगडलेले नाही. सुषमा अंधारे यांनी दिलगिरी व्यक्त करायला हवी. 8 दिवसांत दिलगिरीचे पत्र न आल्यास प्रविण दरेकरांना मी हक्कभंग मांडण्यास परवानगी देईन, असे निलम गोऱ्हे म्हणाल्यात.
प्रवीण दरेकर आक्रमक...
नीलम गोऱ्हे यांच्यावर सुषमा अंधारे यांनी केलेल्या आरोपामुळे भाजप आमदार प्रवीण दरेकर चांगलेच आक्रमक झाले. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, सुषमा अंधारे अशाप्रकारे कसं बेजबाबदारपणे बोलू शकतात. त्या नेहमीच बोलतात मात्र, मात्र सभागृहाच्या सभापतींच्या विरोधात बोलत असतील तर आम्ही हे सहन करणार नाही. सुषमा अंधारे माहिती न घेता सभापतींचे अवमान करणार असतील तर हे खपवून घेतलं जाणार नाही. माझी या सभागृहात मागणी आहे की, सुषमा अंधारे यांच्यावर हक्कभंग आणला पाहिजे, असे दरेकर म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या:
आठ दिवसांत दिलगिरी व्यक्त करा, अन्यथा...नीलम गोऱ्हेंचा 'त्या' वक्तव्यावरुन सुषमा अंधारेंना इशारा