विषय वळवण्यासाठी नको त्या चर्चा घडवल्या जात आहेत, अजित पवार यांची भाजपवर टीका
Ajit Pawar: मेट्रोच्या उद्घाटन सोहळ्याला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देण्यात आले नाही. यामुळे भाजपने या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला
Ajit Pawar: मेट्रोच्या उद्घाटन सोहळ्याला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना निमंत्रण देण्यात आले नाही. यामुळे भाजपने या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. यावरूनच नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपवर टीका केली आहे. ते म्हणाले आहेत की, ''समाजकारणात राजकारणात काम करत असताना नकोत्या गोष्टीची चर्चा करून विषय वळवण्याचा प्रयत्न केला जातो. केंद्र सरकार असो की राज्य सरकार, ही सतत चालणारी प्रक्रिया आहे.'' आज मुंबई मेट्रो 7 आणि मेट्रो 2A चा उद्घाटन सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते पार पडला. यानंतर झालेल्या कार्यक्रमात ते असं म्हणाले आहेत.
अजित पवार म्हणाले की, ''मला आठवत आम्ही ही विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, पुर्थ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकारमध्ये काम केलं आहे. त्याही काळामध्ये मुंबई आणि इतर परिसरात अनेक वेगवेगळी प्रकल्प चालायची. शेवटी तो प्रकल्प कधी पूर्ण होतो. त्यामध्ये कोण लक्ष घालतं. कोणाचं योगदान आहे. एमएमआरडीचे आयुक्त बोलत असताना त्यांनी सागितलं, कशा प्रकारे मुख्यमंत्र्यांनी याचा आढावा सातत्याने घेतला. एकनाथ शिंद यांनी कसं लक्ष घातलं. आदित्य ठाकरे यांनी कसं लक्ष घातलं.''
अजित पवार म्हणाले, ''शेवटी कुठलाही प्रकल्प हा असाच उभा राहता नाही. त्यासाठी कोणीतरी झोकून देऊन काम करावं लागत. त्यानंतर प्रकल्प उभे राहतात आणि त्याचा उपयोग सर्वसामान्य नागरिकांना होतो.'' यावेळी बोलताना त्यांनी मुंबईकरांचे अभिनंद करत हे मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांना दिलेले गिफ्ट असल्याचं सांगितलं आहे. या दोन्ही मार्गांवरील मेट्रो सुरू झाल्याने मुंबईकरांचा वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार असल्याचं देखील अजित पवार यावेळी म्हणाले आहेत.
संबधित बातम्या:
CM Uddhav Thackeray : संघर्षाची वेळ आणू नका; मुख्यमंत्री उद्धव यांचा भाजपला इशारा
Mumbai Metro: राज्य सरकारच मुंबईकरांना गिफ्ट! मुख्यमंत्र्यांकडून मेट्रोला हिरवा झेंडा