एक्स्प्लोर

विजय शिवतारेंच्या भूमिकेमुळे महायुतीत तणाव, समज देऊनही सातत्यानं पक्षविरोधी भूमिका, शिस्तभंगाची कारवाई होणार?

Baramati Lok Sabha Constituency: विजय शिवतारे बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. पण विजय शिवतारेंच्या याच भूमिकेमुळे आता त्यांच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता आहे.

Vijay Shivtare vs Ajit Pawar : बारामती : लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election 2024) घोषणे आधीपासूनच चर्चेत असलेला बारामती लोकसभा मतदारसंघाकडे (Baramati Lok Sabha Constituency) आता शिवसेना (Shiv Sena) नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांच्यामुळे विशेष चर्चेत आला आहे. 2019 मध्ये ज्या अजित पवारांनी आव्हान देत विजय शिवतारे यांचा दारूण पराभव केला होता. आता त्याच अजित पवारांविरोधात विजय शिवतारेंनी शड्डू ठोकला आहे. विजय शिवतारे बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. पण विजय शिवतारेंच्या याच भूमिकेमुळे आता त्यांच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता आहे. विजय शिवतारेंच्या भूमिकेमुळे महायुतीत तणाव निर्माण झाला असून राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये प्रचंड नाराजी असल्याची माहिती समोर येत आहे. अशातच आता शिवतारेंवर शिवसेनेकडून शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

लोकसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वीपासूनच बारामती मतदारसंघ (Baramati Lok Sabha Constituency) चर्चेत होता, तो नणंद-भावजय अशा लढतीच्या चर्चांमुळे. सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यात बारामतीची लढत रंगणार अशा चर्चांनी राजकीय वर्तुळात जोर धरला आणि अवघ्या राज्याच्या नजरा बारामतीवर (Baramati News) खिळल्या. मात्र, यामध्ये विजय शिवतारेंनी एन्ट्री घेतली आणि बारामतीचं पुरतं चित्रचं पालटलं. मी बारामतीतून निवडणूक लढणारच, असा चंगच विजय शिवतारेंनी बांधला आहे. मात्र, आता त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळेच त्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. शिवसेनेकडून शिवतारेंवर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी असे आदेश दिल्याची माहिती मिळत आहे. 

बारामतीत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी द्यायची, असा निर्णय महायुतीनं एकमतानं घेतला आहे. म्हणजेच, शिवसेनेनं महायुतीतला घटक पक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे. अशा परिस्थितीत विजय शिवतारे जर अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असतील तर तो सरळ सरळ शिस्तभंग ठरतो. त्यामुळेच शिवतारेंवर शिस्तभंगाची कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्याची माहिती मिळत आहे. 

विजय शिवतारेंच्या बंडाविरोधात अजित पवार गट आक्रमक 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर, आता अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनंही जशास तसं उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. विजय शिवतारे यांना मुख्यमंत्र्यांनी समजावलं आहे. मात्र तरीही त्यांनी बंडखोरी केली तर त्याचे परिणाम राज्यभर उमटतील. शिंदे गटाच्या एकाही उमेदवाराचा प्रचार अजित पवारांची राष्ट्रवादी करणार नाही, अशी भूमिका पिंपरी चिंचवडचे आमदार अण्णा बनसोडे यांनी घेतली आहे.  

पाहा व्हिडीओ : Vijay Shivtare : विजय शिवतारेंवर शिस्तभंगाची कारवाई  होणार, महायुतीतलं वातावरण गढूळ?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Ravindra Waykar on EVM : ईव्हीएमसोबत छेडछाड केल्याचा प्रश्नच येत नाही, रवींद्र वायकरांची प्रतिक्रियाABP Majha Headlines : 04 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सRavindra Waykar : मंगेश पडिलकरजवळचा फोन निवडणूक अधिकाऱ्याचा? ड्रायव्हर बोलवण्यासाठी फोन वापरल्याचा दावाMaharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 04 PM

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Embed widget