एक्स्प्लोर

Dharashiv Voter List: धाराशिवमध्ये खळबळजनक प्रकार, एकाच घरात हिंदू, मुस्लिमसह विविध जातीचे 37 मतदार; शिंदे गटाच्या माजी नगरसेवकावर गंभीर आरोप

Dharashiv Voter List: धाराशिवच्या परंडा नगरपरिषदेत एकाच घराच्या पत्त्यावर 37 मतदारांची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे मतदार वेगवेगळ्या जाती-धर्माचे आहेत.

Dharashiv Voter List: धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यातील परांडा नगरपरिषदेत (Paranda Nagar Parishad) बोगस मतदार (Bogus Voter) नोंदणीचा एक गंभीर आणि खळबळजनक प्रकार समोर आला आहे. एका घराच्या पत्त्यावर तब्बल 37 वेगवेगळ्या जाती-धर्माच्या मतदारांची नोंदणी करण्यात आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. यामुळे स्थानिक राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

Dharashiv Voter List: काय आहे प्रकार?

परांडा नगरपरिषद क्षेत्रातील एका घराच्या पत्त्यावर हिंदू, मुस्लिम, दलित, माळी, ब्राह्मण अशा विविध जाती-धर्मांच्या 37 व्यक्तींची मतदार म्हणून नोंदणी करण्यात आली आहे. इतकंच नव्हे, तर यामध्ये उत्तर प्रदेशातून आलेल्या पाच मजुरांचाही समावेश असल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, ज्या घराचा हा पत्ता वापरण्यात आला आहे, ते घर शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाचे असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अरबाज पठाण यांनी केलाय.  

Dharashiv Voter List: तक्रार दाखल, चौकशीची मागणी

या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता, स्थानिक नगरपरिषद प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. आता या प्रकरणात काय कारवाई होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

Dharashiv Voter List: मतदार याद्या तपासण्याचे आदेश

गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील मतदार यादीतील अनियमितता आणि घोळांबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही यावर आवाज उठवला होता. त्यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये बोगस नोंदणी आणि निवडणूक प्रक्रिया प्रभावित करण्याचा आरोप केला होता. महाविकास आघाडी आणि मनसेकडून देखील याविरोधात निवडणूक आयोगाकडे निवेदने देण्यात आली आहेत. काही भागांमध्ये एका कुटुंबाच्या नावावर शेकडो मतदारांची नोंद दाखवण्यात आली होती, याचे पुरावेही आयोगापुढे सादर करण्यात आले होते. यावर निवडणूक आयोगातील अधिकारी निरुत्तर झाल्याचेही दिसून आले होते. या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त चोक्कलिंगम यांनी जिल्हाधिकाऱ्यांना मतदारयादींच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. एकाच मतदारसंघामध्ये या महिलेचे दोन ठिकाणी नावे कशी आली, याबाबत चौकशी केली जाईल. यामध्ये जे अधिकारी दोषी आढळतील, त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

आणखी वाचा

Washim News: आई-वडिलांनी मृत समजलं, पण बिहारचा जयपाल वाशिममध्ये तीन महिन्यांनी जिवंत सापडला; मुलाचा चेहरा दिसताच कुटुंबीयांच्या डोळ्यांत आनंदाश्रू, नेमकं काय घडलं?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
Embed widget