एक्स्प्लोर

Dhananjay Munde: सहा हजार मतांनी आमची इज्जत गेली, खोलवर घाव, जखम अजून भरलेली नाही: धनंजय मुंडे

Beed News: बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांचा बजरंग सोनवणे यांनी पराभव केला होता. पंकजा मुंडे यांचा हा पराभव महाराष्ट्रातील सर्वात धक्कादायक निकाल ठरला होता. धनंजय मुंडेंनी बीडच्या पराभवाबाबत खंत बोलून दाखवली.

बीड: लोकसभा निवडणुकीत 6000 मतांनी आमची इज्जत गेली. ही खूप खोलवर झालेली जखम आहे. ही जखम अद्याप भरलेली नाही, असे वक्तव्य अजितदादा गटाचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केले. ते सोमवारी बीड (Beed News) विधानसभा मतदारसंघात बाबा सिद्दिकी यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या अल्पसंख्याक मेळाव्यात बोलत होते. या मेळाव्याला राष्ट्रवादीच्या (NCP) कार्यकर्त्यांसह मुस्लिम समाज बांधवांनी उपस्थिती लावली होती. बीड शहरातील आशीर्वाद लॉन्स येथे हा मेळावा पार पडला.

यावेळी धनंजय मुंडे यांनी उपस्थितांना संबोधित करताना बीड लोकसभेत झालेल्या पंकजा मुंडे यांच्या पराभवाची सल अद्यापही मनात असल्याचे सांगितले. सहा हजार मतांनी आमची इज्जत गेली. ही जखम खोलवर झालेली आहे. ती अद्याप भरुन निघालेली नाही, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले.  मविआ सरकारच्या काळात मौलाना महामंडळासाठी दीड हजार कोटी रुपये मागणी केली होती. मात्र, तत्कालीन सरकारने दमडीही दिली नाही. अजितदादा या सरकारमध्ये आले आणि निधी मंजूर करण्यात आला, असा दावाही यावेळी धनंजय मुंडे यांनी केला.

सामनाच्या अग्रलेखातील टीकेला धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर

भाजपने गोपीनाथ मुंडे यांच्या काळापासून शिवसेनेच्या जागा पाडण्यासाठी प्रयत्न केले, त्यासाठी खतपाणी घातले, अशी टिप्पणी दैनिक 'सामना'तील अग्रलेखातून करण्यात आली होती. यावरुन धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर देताना म्हटले की, मला बोलायला अतिशय दुर्दैव वाटत आहे. स्वर्गीय बाळासाहेब असले असते तर त्यांना वाईट वाटले असते. स्वर्गीय मुंडे साहेब नसताना त्यांचं नाव घेऊन बदनाम केले जात आहे. गोपीनाथ मुंडे हे शिलेदार राहिले आहेत. मुंडे साहेब यांची बदनामी करणे हे उद्धव ठाकरे यांना शोभत नाही. संजय राऊत शिवसेना पूर्णपणे पाण्यात घातल्याशिवाय राहणार नाहीत. मुंडे साहेब असताना काहीही बोलले नाहीत. ते नसताना त्यांच्याबद्दल बोलताना संजय राऊतांना लाज वाटली पाहिजे.

संभाजी राजे यांना उशिरा का होईना शेतकरी समजले आहेत. तुम्ही राजे आहात. संभाजी राजे हे आरोप करतात हे शोभानीय नाहीत. संभाजी राजे यांना सरसकट या शब्दाचा अर्थ कळलं तर बरे होईल. मी असा कृषी मंत्री आहे, जो दिवसरात्र शेतकऱ्यांच्या बांधावर आहे, असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले.

आणखी वाचा

बीडमध्ये मोठा उलटफेर! कृषीमंत्री धनंजय मुंडे भल्या पहाटे मनोज जरांगेंच्या भेटीला; मराठवाड्यात राजकीय भूकंप

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Visarjan Spl Local : अनंत चतुर्थीनिमित्त मध्य रेल्वेच्या 22 विशेष गाड्या
Ganesh Visarjan Spl Local : अनंत चतुर्थीनिमित्त मध्य रेल्वेच्या 22 विशेष गाड्या
Nashik Ganpati Visarjan 2024 : बाप्पा निघाले गावाला... विसर्जनासाठी 40 नैसर्गिक, 41 ठिकाणी कृत्रिम तलाव, मिरवणूक मार्गावर सीसीटीव्हीची करडी नजर
बाप्पा निघाले गावाला... नाशकात विसर्जनासाठी 40 नैसर्गिक, 41 ठिकाणी कृत्रिम तलाव, मिरवणूक मार्गावर सीसीटीव्हीची करडी नजर
Pune Ganesh Visarjan: पुण्यातील मानाचे गणपती थोड्याच वेळात विसर्जनाला निघणार, दगडूशेठ हलवाई गणपतीची ४ वाजता मिरवणूक
पुण्यातील मानाचे गणपती थोड्याच वेळात विसर्जनाला निघणार, दगडूशेठ हलवाई गणपतीची ४ वाजता मिरवणूक
Vidhansabha Election 2024: विधानसभेला भाजपसाठी 85 जागा महत्त्वाच्या, विनिंग मेरिटवर ए,बी,सी कॅटेगरीत विभागणी, 2019 मध्ये जिंकलेल्या काही जागा धोक्यात
विधानसभेला भाजपसाठी 85 जागा महत्त्वाच्या, विनिंग मेरिटवर ए,बी,सी कॅटेगरीत विभागणी, 2019 मध्ये जिंकलेल्या काही जागा धोक्यात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbaicha Raja Aarti : मुंबईच्या राजाची शेवटची आरती; विसर्जन मिरवणुकीला सुरुवातManoj Jarange Jalna : मनोज जरांगे यांच्या उपोषणाला आजपासून सुरूवातसकाळी ८ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 08 AM TOP Headlines 8AM 17 September 2024Ganesh Visarjan Spl Local : अनंत चतुर्थीनिमित्त मध्य रेल्वेच्या 22 विशेष गाड्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganesh Visarjan Spl Local : अनंत चतुर्थीनिमित्त मध्य रेल्वेच्या 22 विशेष गाड्या
Ganesh Visarjan Spl Local : अनंत चतुर्थीनिमित्त मध्य रेल्वेच्या 22 विशेष गाड्या
Nashik Ganpati Visarjan 2024 : बाप्पा निघाले गावाला... विसर्जनासाठी 40 नैसर्गिक, 41 ठिकाणी कृत्रिम तलाव, मिरवणूक मार्गावर सीसीटीव्हीची करडी नजर
बाप्पा निघाले गावाला... नाशकात विसर्जनासाठी 40 नैसर्गिक, 41 ठिकाणी कृत्रिम तलाव, मिरवणूक मार्गावर सीसीटीव्हीची करडी नजर
Pune Ganesh Visarjan: पुण्यातील मानाचे गणपती थोड्याच वेळात विसर्जनाला निघणार, दगडूशेठ हलवाई गणपतीची ४ वाजता मिरवणूक
पुण्यातील मानाचे गणपती थोड्याच वेळात विसर्जनाला निघणार, दगडूशेठ हलवाई गणपतीची ४ वाजता मिरवणूक
Vidhansabha Election 2024: विधानसभेला भाजपसाठी 85 जागा महत्त्वाच्या, विनिंग मेरिटवर ए,बी,सी कॅटेगरीत विभागणी, 2019 मध्ये जिंकलेल्या काही जागा धोक्यात
विधानसभेला भाजपसाठी 85 जागा महत्त्वाच्या, विनिंग मेरिटवर ए,बी,सी कॅटेगरीत विभागणी, 2019 मध्ये जिंकलेल्या काही जागा धोक्यात
चिंचपोकळीचा चिंतामणीच्या मंडपात आवराआवर सुरु असताना अनंत अंबानी दर्शनाला पोहोचतात तेव्हा...
चिंचपोकळीचा चिंतामणीच्या मंडपात आवराआवर सुरु असताना अनंत अंबानी दर्शनाला पोहोचतात तेव्हा...
बाप्पा चालले गावाला! लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीची तयारी पूर्ण; मुंबईचा राजा थोड्याच वेळात होणार मार्गस्थ
लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीची तयारी पूर्ण; मुंबईचा राजा थोड्याच वेळात होणार मार्गस्थ
Baramati Anonymous Letter: कोणाच्या खांद्यावर कोणाचं ओझं, बारामतीत पुन्हा निनावी पत्र व्हायरल; थोरल्या पवारांवर गंभीर आरोप
कोणाच्या खांद्यावर कोणाचं ओझं, बारामतीत पुन्हा निनावी पत्र व्हायरल; थोरल्या पवारांवर गंभीर आरोप
Numerology : अत्यंत साधेभोळे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; कोणीही यांना पटकन फसवतं, यांच्या साध्या स्वभावाचा लोक नेहमीच घेतात फायदा
अत्यंत साधेभोळे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; कोणीही यांना पटकन फसवतं, यांच्या साध्या स्वभावाचा लोक नेहमीच घेतात फायदा
Embed widget