सुधीर भाऊंच्या जिल्ह्यात देवेंद्र फडणवीसांचा दौरा; विजय वडेट्टीवारांना मानाचे स्थान; गैरहजेरीवर मुनगंटीवारांची स्पष्टोक्ती, म्हणाले...
Sudhir Mungantiwar : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पहिल्यांदाच चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. अशातच या कार्यक्रमाला गैरहजर असलेल्या भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टोक्ती दिली आहे.
Chandrapur News : कुठलाही राजकीय नेता हा काय अमर पट्टा घेऊन जन्माला येत नाही. त्यामुळं हे तर निश्चित होतं की शिवसेना आणि काँग्रेस या दोन विचारांमध्ये कुठेही साम्यता नाही. त्याप्रमाणे रेल्वेच्या दोन पटरी कधीही एकत्र येत नाही आणि आल्या तर अपघात झाल्या शिवाय राहत नाही. त्याचप्रमाणे दोन वैचारिक प्रवाह एकत्र येण्यासारखं यांच्यात काहीही नाही. एक हिंदुत्वासाठी लढणारा पक्ष तर दुसरा सादारणतः हिंदुत्वावर कायम टीका करत आलेला पक्ष आहे. त्यामुळे केवळ सत्तेसाठी हे दोन वेगळे पक्ष एकत्र आले होते. आपल्याला आठवत असेल 24 ऑक्टोंबर 2019 चा अशुभ वेळ, वेळी मनात इच्छा झाली. कधीकधी तात्कालीक फायद्यासाठी दूर जाणे हे त्रासदायक ठरत असते. अशी प्रतिक्रिया देत माजी मंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीच्या नाराजी नाट्यावर भाष्य केले आहे.
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी चंद्रपूर येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात आपल्या गैरहजेरीवर ही भाष्य केलं आहे. या गैरहजेरी बाबत माझा मुख्यमंत्र्यांशी सकाळीच चर्चा झाली. मुख्यमंत्री जात असतानाच मी त्यांना याबाबत कल्पना दिली. काल मला निमंत्रण आलं तसेच दुर्गेवार यांचा कॉलही आला. मात्र काही वैयक्तिक कारणासाठी मुंबईत असल्याने आज या कार्यक्रमाला इन शक्य होणार नाही. किंबहुना माझ्या शिफ्टिंग चा आज शेवटचा दिवस असल्याने माझी गैरहजेरी असणार याची कल्पना दिली असल्याची स्पष्टोक्ती ही मुनगंटीवार यांनी दिली आहे.
शिवसेना-काँग्रेस या दोन रेल्वेचे ट्रॅक, एकत्र आले की अपघात निश्चित
राज्याचे माजी मुख्यमंत्री मा.सा. कन्नमवार यांची आज 125 वी जयंती आहे. या निमित्त चंद्रपुरात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मात्र या कार्यक्रमाला चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहणार नाही. त्यांच्या या अनुपस्थितीवर स्वात: मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मी सांगितलं कारण काय आहे, मी का आज इकडे आहे. कन्नमवारांचा सन्मान मी केला, त्यांचे स्मारक मीच केलं आहे. त्याचे कोणीही राजकारण करु नये. निवडणूक यश व अपयशावर चिंतन करायचे असते. त्यावर चर्चा करून काय मत मांडतात, यावर जनतेचे लक्ष असते. गेलेले क्षण विजयात बदलता येत नाहीत. शांततेत विश्लेषण करायला हवे. पराभवानंतर विजयाकडे जाता येतं. शिवसेना व काँग्रेस या दोन्ही रेल्वे पटरींप्रमाणे होते. एकत्र येण्यासारखे काहीच नव्हते. एकत्र आल्या कर अपघात निश्चित असतो असेही भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
सुधीर मुनगंटीवारांच्या अनुपस्थितिवर आमदार किशोर जोरगेवारांची प्रतिक्रिया
राज्याचे माजी मुख्यमंत्री मा.सा. कन्नमवार यांची आज 125 वी जयंती आहे. या निमित्त चंद्रपुरात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मात्र या कार्यक्रमाला चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहणार नाही. त्यांच्या या अनुपस्थितीवर आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जोरगेवार यांच्या मते या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या यादीत सुधीर मुनगंटीवार यांना स्थान देण्याचा निर्णय हा आयोजन समितीचा आहे. आयोजन समितीनेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष पद विजय वडेट्टीवार यांना दिलं आहे. त्यामुळे कुणाला अध्यक्ष करावं आणि कोणाला प्रमुख पाहुणे करावं याबाबतचा निर्णय सर्वस्वी आयोजन समितीचा होता. मात्र स्वागताध्यक्ष म्हणून त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांना फोनवर संपर्क केला, मात्र मुनगंटीवार यांनी त्यांचा फोन रिसीव केला नसल्याची ही माहिती देखील जोरगेवार यांनी दिली आहे.
हे ही वाचा