एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

मोठी बातमी : माकड म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीसांचं जशास तसं उत्तर, म्हणाले, त्यांना चांगल्या डॉक्टरची गरज!

Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना जशास तसं उत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडलं आहे, त्यांना आता डॉक्टरांची गरज आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.  

Devendra Fadnvis on Uddhav Thackrey : नागपूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackrey) मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर टीका करताना त्यांना माकड म्हणून संबोधलं होतं. त्यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackrey) जोरदार टीका केली आहे. देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना जशास तसं उत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडलं आहे, त्यांना आता डॉक्टरांची गरज आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.  

ठाकरेंनी माकड म्हणून संबोधल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी जोरदार हल्ला चढवला आहे. "उद्धव ठाकरे यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यांना आता डॉक्टरची गरज आहे. ते रोज काहीतरी बदलतायेत. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करावे.", असा सणसणीत टोला देवेंद्र फडणवीसांनी लगावला आहे. पुढे बोलताना त्यांना शिव्या देण्याशिवाय दुसरं सध्या काहीही सुचत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. जनतेनं त्यांना रिजेक्ट केलेलं आहे, त्यामुळे ते शिवीगाळ करण्यावर उतरले आहेत, असंही देवेंद् फडणवीस म्हणाले आहेत.  

सध्या उद्धवजींचे गाईड पवारसाहेब, ते सांगणार तेच ठाकरे करणार : देवेंद्र फडणवीस 

पवार साहेबांसोबत पक्ष अजित दादा ने उभा केला. पण त्यांना पक्षात स्थान मिळणार नाही, स्थान पवार साहेब सुप्रियांना देतील म्हणून ते बाहेर पडले. अजित पवार उद्धवजींना किती ओळखतात माहीत नाही. मी त्यांना चांगला ओळखतो, सध्या उद्धव साहेबांचे गाईड पवार साहेब आहेत. ते जे बोलतील ते उद्धव करतील, असंही फडणवीस म्हणाले.

काय म्हणाले उद्धव ठाकरे ? 

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला होता. शरद पवारांनी लोकसभेनंतर काही प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असं वक्तव्य केलं होतं. त्यावर बोलताना शिंदे आणि फडणवीसांनी उद्धव ठाकरेंचा पक्ष विलीन होणार असल्याचं भाकीत बोलून दाखवलं होतं. त्यावरच बोलताना उद्धव ठाकरेंनी जोरदार पलटवार केला आहे. 

ते म्हणालेले की, "दिल्लीश्वरांची दोन चावीची माकडं, त्यांच्या हातात कोलीत सापडलंय, एक माकड आहे दाढीवालं... त्यांना धड उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नावंच उच्चारता येत नाही. माझं नाव घेताना त्यांच्या घशात बाठा अडकतो. त्यांच्या वडिलांचं आणि पक्षाचं ना एशंशि आणि दुसरे उपमुख्यमंत्री आहे ते देगंफ... ज्याला तुम्ही काय म्हणता? ते भांग प्यायलेल्या माकडांसारखं बोलतायत... शिवसेना हा छोटा पक्ष आहे का? माझं त्या दोन्ही माकडांना सांगणं आहे की, बाप बदलण्याची गरज मला नाही, बाप बदलण्याची गरज तुम्हाला आहे." 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dombivli Ravindra Chavan CCTV :मंत्र्याच्या कारमधून उतरला अन् थेट अंगावर धावला,भाजप नेत्याचा प्रताप!Thar Car Accident : ताबा सुटला,स्टॅन्डवरील तिघांना उडवलं, श्रीगोंद्यात थारच्या अपघाताचा थरारा!Buldhana Python | लोणार सरोवर परिसरात सर्पमित्रांनी रेस्क्यू करत दहा फूटी अजगराला दिलं जीवदानKiran Samant on Vidhan Sabha : विजयाचं श्रेय थेट लेकीला दिलं, किरण सामंतांकडून घरच्यांचं कौतूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Sharad Pawar : नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
Embed widget