एक्स्प्लोर

राज ठाकरे काय म्हणतात याला महत्त्व नाही; ऑपरेशन सिंदूरवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

ऑपरेशन सिंदूरसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष आभार मानतो. त्यांनी या घटनेनंतर स्पष्टपणे सांगितलं होत की याचं उत्तर दिलं जाईल.

नवी दिल्ली : भारतीय सैन्य दलाने ऑपरेशन सिंदूर (Operation sindoor) राबवत पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास पाकिस्तानच्या हद्दीत घुसून 9 दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्रांचा मारा केला. त्यामुळे, पाकिस्तानला चांगलीच धडकी भरली असून पाकिस्तानी नेते वल्गना करताना दिसून येतात. या हल्ल्यानंतर देशभरातून समाधान आणि आनंद व्यक्त होत आहे. सरकार आणि भारतीय सैन्य दलाच्या पाठिशी असल्याचं सर्वपक्षीय नेते सांगत आहेत. तसेच, भारतीय सैन्य दलाचे अभिनंदनही केलं जात आहे. मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी युद्ध हे दहशतवादी हल्ल्ल्याचं उत्तर नसल्याचे सांगत मोदी सरकारवर टीकेचे बाण सोडले. आता, राज ठाकरेंच्या वक्तव्याला महत्त्व नाही, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ऑपरेशन सिंदूरवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

ऑपरेशन सिंदूरसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष आभार मानतो. त्यांनी या घटनेनंतर स्पष्टपणे सांगितलं होत की याचं उत्तर दिलं जाईल. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्य दलाने ताकदवर उत्तर दिलं आहे.  विशेषता मुंबईत ज्यांनी हल्ला केला ते हाफिज आणि डेव्हिडचे अड्डे देखील नष्ट करण्यात आले आहेत. हा नवीन भारत अशा प्रकारे हल्ले सहन करणार नाही, हे पुन्हा एखादा भारताने दाखवून दिलं आहे, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी ऑपरेशन सिंदूरवर पहिली प्रतिक्रिया दिली.  

जगभरातील विविध देश आपल्या पाठिशी

भारताने जे ऑपरेशन सिंदूर राबवलं आहे, त्या संदर्भात लष्कराचे मी आभार आणि अभिनंदन  करतो. पाकिस्तानात दहशतवाद्यांचे 9 अड्डे उध्वस्त करण्याचे काम सेनेने केले. ज्या प्रकारे जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न पाकिस्तान करत होता, आणि विशेषता पहलगाममध्ये आमच्या बांधवांना मारण्यात आलं, त्याचा संताप संपूर्ण भारतात होत आहे. भारताने गेल्या 14 दिवसात सगळ्या देशाची संपर्क करून पाकिस्तान कसा दोषी आहे ते सांगितले, त्याची माहिती दिली. त्यामुळेच, विविध देश आपल्या पाठीशी आहेत, असेही फडणवीसांनी म्हटले.  

दरम्यान, भाजप पक्षाने कायमच राष्ट्र प्रथम या भूमिकेतूनच काम केलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा साऱ्या जगाला ते दाखवून दिलं आहे. आपण जर पाहीलं तर उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत अड्डे उध्वस्त करण्याचं काम लष्कराने केलं आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.  

राज ठाकरेंच्या म्हणण्याला महत्त्व नाही

राज ठाकरे काय म्हणतायत याला महत्त्व नाही. संपूर्ण भारत जनता पाठीशी उभी आहे  आणि झालेल्या कारवाईचे कौतुक करत आहेत. संपूर्ण  जग देखील आपल्या पाठीशी उभे आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. 

हल्ल्यानंतर काय म्हणाले राज ठाकरे

पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील अतिरेक्यांना शोधून काढण्यात केंद्र सरकारला अद्याप यश आलेले नाही. दहशतवाद्यांच्या पुढच्या पिढ्यांनाही लक्षात राहील, असा धडा शिकवणे गरजेचे होते. अशावेळी पाकिस्तानशी युद्ध करणे किंवा मॉकड्रील आणि एअरस्ट्राईक या गोष्टी फायद्याच्या नाहीत. पाकिस्तान हा अगोदरच बर्बाद झालेला देश आहे. त्यांना आणखी काय बर्बाद करणार? अमेरिकेत दहशतवाद्यांनी ट्विन टॉवर पाडले आणि पँटागॉनवर हल्ला केला तेव्हा अमेरिकेन त्या दहशतवाद्यांना शोधून ठार मारले. त्यामुळे दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे प्रत्युत्तर नसते. त्यामुळे देशात मॉकड्रील करण्याऐवजी कोम्बिंग ऑपरेशन करा. देशातील आपलेच प्रश्न संपत नाही, अशा परिस्थितीत युद्धाला सामोरे जाणे योग्य गोष्ट नाही, असे परखड मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले.

हेही वाचा

... त्यांचे श्रेय जाते फक्त पवार साहेबांना; ऑपरेशन सिंदूरनंतर श्रेयवादाची लढाई, पण शरद पवारांचा थेट मोदींना फोन

महत्त्वाच्या बातम्या

जयकुमार गोरेंबाबत केलेलं वक्तव्य भाजपच्या जिव्हारी, मोहोळच्या अनगरमध्ये संजय राऊतांचा पुतळा जाळला, विरोधात जोरदार घोषणाबाजी
जयकुमार गोरेंबाबत केलेलं वक्तव्य भाजपच्या जिव्हारी, मोहोळच्या अनगरमध्ये संजय राऊतांचा पुतळा जाळला, विरोधात जोरदार घोषणाबाजी
Pankaja Munde On PM Modi : मोदींनी देशालाच परिवार मानलं, तुम्ही 'विकासाचे फ्रेंड' आहात; पंकजा मुंडेंची भावनिक पोस्ट, मोदींच्या कार्यशैलीचे कौतुक
मोदींनी देशालाच परिवार मानलं, तुम्ही 'विकासाचे फ्रेंड' आहात; पंकजा मुंडेंची भावनिक पोस्ट, मोदींच्या कार्यशैलीचे कौतुक
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
कार्यकर्ते टिकवण्यासाठी आणि पक्ष वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे खोटं बोलतायेत, खासदार नरेश म्हस्केंचा हल्लाबोल  
कार्यकर्ते टिकवण्यासाठी आणि पक्ष वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे खोटं बोलतायेत, खासदार नरेश म्हस्केंचा हल्लाबोल  

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Embed widget