उद्धव ठाकरेंनी आमची मनं दुखावली, आता त्यांच्यासोबत कधीच युती नाही : देवेंद्र फडणवीस
जिथे मन दुखावतात तिथे युती होणे शक्य नाही. पॉलिटिकली डीफरन्स असतील तर युती होऊ शकते पण येथे पण आमची दुखावली आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासोबत कोणत्या स्थितीमध्ये युती होणार नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते लोकमतच्या एका कार्यक्रमात बोलत होते.
Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे यांनी (Uddhav Thackeray) आता सोबत येण्याची दारं बंद केली आहेत, आमची मन दुखावली आहेत. ज्या प्रकारे पंतप्रधान मोदींवर (PM Modi) बोलतात, खालच्या पातळीवर बोलतात. मनं दुखावली आहेत. जिथे मन दुखावतात तिथे युती होणे शक्य नाही. पॉलिटिकली डीफरन्स असतील तर युती होऊ शकते पण येथे पण आमची दुखावली आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासोबत कोणत्या स्थितीमध्ये युती होणार नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते लोकमतच्या एका कार्यक्रमात बोलत होते.
आगे आगे देखो होता है क्या -
मतदाराला काही किंमत आहे की नाही? आपल्याकडे अनेक नेते येत आहेत, असा प्रश्न यावेळी त्यांना विचारण्यात आला. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, याचं श्रेय नरेंद्र मोदी यांच्या कामांना द्यावं आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला द्यावं. हीच स्थिती राहुल गांधी, शरद पवार यांची आहे. उद्धव ठाकरे हे तर आतां सगळीकडे जातंय आणि आमच्या नावाने शिमगा करताय. आगे आगे देखो होता है क्या... बरेच चांगला लोक आहेत जे इच्छुक आहेत आमच्यासोबत यायला... वेवलेन्थ जुळली तर त्यांना सोबत घेऊ, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. जर लोक आमच्या सोबत जय श्री रामचा नारा देत असेल तर आम्ही का सोबत घेऊ नये, असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
लोक तुम्हाला घाबरतात, तुमच्या मनात काय चालत कळतं नाही. हे कुठून शिकलात?
या प्रश्नाचं उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, मी सरळ साधा माणूस आहे.चमत्कार होतात पण ते ठरवून माझ्याकडून होत नाहीत. माझा अजेंडा हा विकासाचा आहे, आता पॉलिटिक्स १० टक्के कराव लागतात, नाहीतर लोकशाहीमध्ये आपण टिकणार नाही. काही नेते कोकणात मराठवाड्यात फिरताय आता मागील अनेक वर्षांची भाषणं ऐका. त्यात एकदा तरी विकासाबद्दल बोलले आहेत का? ते तपासा. माझं फक्त पद बदल आहे, मिशन एकाच आहे विकासाचं, आमचं आणि एकनाथ शिंदे यांचं अंडरस्टँडिंग खूप चांगलं आहे. त्यामुळे हवं तसा घडतंय.
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल?
महाराष्ट्रचा पुढचा मुख्यमंत्री हा महायुतीचाचं असेल. संख्याबळावर तो निर्णय होणार नाही.संख्यबळतर आमचंच जास्त असणार. पण निर्णय हे आमचे वरिष्ठ नेते घेतील, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
राज ठाकरे मनसे तुमच्यासोबत असणार का?
राज ठाकरे मनसेसोबत येतील की नाही हे तुम्हला लवकरच कळेल, आमचे ते चांगले मित्र आहेत. ते आमच्यावर टीकासुद्धा करतात पण ते सोबत येतील का? हे लवकरच कळेल. उद्धव ठाकरे यांनी आता सोबत येण्याची दार बंद केली आहेत, आमची मनं दुखावली आहेत. ज्या प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बोलतात, खालच्या पातळीवर बोलतात. त्यामुळे मनं दुखावली आहेत. जिथे मनं दुखावतात तिथे युती होणे शक्य नाही. पॉलिटिकली डीफरन्स असतील तर युती होऊ शकते पण येथे पण आमची मनं दुखावली आहेत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
अजित पवार यांच्यासोबत काही तासांचं सरकार तुम्ही स्थापन केलं. काय झालं होत?
शरद पवार यांच्यासोबत चर्चा होऊनच बैठक होऊनचं त्यावेळी अजित पवार आणि मी तयारी करून शपथ घेतली, आणि ऐनवेळी शरद पवार मागे गेले. शरद पवार यांनी विश्वासघात केला. पण अजित पवार यांना हे पटलं नव्हतं. शरद पवार यांना विश्वासात घेऊनच निर्णय झाला होता.मला अनेक लोकांना एक्सपोज करायचा नाहीये.यावर २-४ वर्षांत पुस्तक लिहिलं मग स्पष्ट होईल.आतले घटनाक्रम सांगेल. अजित पवार यांना तोंडघाशी पाडण्याचा काम त्यावेळी या सगळ्यांनी केलं होतं, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
उद्धव ठाकरे यांच्यासोबतचे आमदार आमच्यासोबत त्यावेळीच यायला तयार होते, ते मला स्वतः बोलायचे. उद्धव ठाकरे यांनी जे जे काही केलं, जी वागणूक नेत्यांना दिली त्यामुळे ते लोक आमच्यासोबत शिवसेना आमदार आले. आम्हाला काही करावं लागलं नाही. जसा शिवसेनेत झालं तसं अजित पवार आणि त्यांच्या आमदारांचा सफ़ोकेशन त्यांच्या पक्षात होतं. पक्षात अजित पवार यांना नंबर 2 वरच राहावं लागलं असतं, कधीच शरद पवार यांनी त्यांना नेतृत्व दिलं नसतं. उमेदवार आता निवडणुकीत इकडे तिकडे जाऊ शकतो. पण सगळे उमेदवार त्या त्या त्यांच्या पक्षावर त्यांच्या चिन्हवर निवडणूक लढावतील, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आम्ही मराठा आरक्षण देणार, जरांगेनाही पटेल आणि मराठा समाजालाही पटेल : देवेंद्र फडणवीस
सध्या मराठा आंदोलन सुरु आहे, त्याला काउंटर ओबीसी आंदोलन सुरु आहे. याला पॉलिटिकल अँगलने मी पाहत नाही. प्रत्येकला जातीतून पाहायचं आहे, हे महाराष्ट्र साठी दुर्दैवी आहे. आम्ही आंदोलनाला सकारात्मक पाहत आहोत. आम्ही मराठा समजला आरक्षण देणार आहोत, ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही. आरक्षण देणं हे राज्याच्या हातात आहे, केंद्र सकाराने सुद्धा सांगितलं आहे की राज्य आरक्षण देऊ शकतो. मनोज जरांगे यांना आरक्षण पटेल की नाही माहित नाही पण मराठा समजाला आरक्षण पटेल मान्य होईल. आरक्षण मिळावं यासाठी डेटा आम्ही गोळा करत आहोत, सर्वोच्च न्यायालयने आधी जो निर्णय दिला त्यानंतर आम्ही यावर काम करतोय, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मोदी म्हणताय, लोकसभेला 400 पार जाणार हे गणित कसं मांडताय?
पंतप्रधान मोदीच नाही खर्गे सुद्धा म्हणताय 2024 ची निवडणूक ही पॉलिटिकल केमिस्ट्रीची निवडणूक आहे.यामध्ये 1+1 हे 11 होतात.ही केमिस्ट्री तयार झालीये.हे मोदीजींना माहिती आहे. लोकांना वाटतंय की आपला विचार करणारा पंतप्रधान आहे. त्यामुळे हा रिझल्ट येणार आहे. राज्यातून 48 पैकी 42 वर होतो त्यापेक्षा कमी जागा येऊ देणार नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
महायुतीचं राज्यातील जागावाटप -
ज्यांच्या स्टँडिंग जागा असतील त्या जागा तशाच त्या पक्षांकडे महायुतीमध्ये राहतील. त्यापेक्षा कमी जागा कशा देणार.फक्त एक दोन जागी उमेदवार इकडे तिकडे जातील, असेही फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्र मोठा भाऊ -
गुजरात एक सक्षम राज्य आहे, मोठा भाऊ हा मोठा भाऊ राहणार महाराष्ट्र हा मोठा भाऊ आहे. लहान भावाचा विकास होत असेल तर वाईट वाटायचं कारण नाही मोठा भाऊ हा मोठाचं राहील आणि लहान भावाच्या पुढे जाईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.