एक्स्प्लोर

Devendra Fadnavis Meet Amit Shah : इमोशनल होऊन नाही, स्ट्रक्चरल काम करण्यासाठी निर्णय घेतोय, देवेंद्र फडणवीसांनी अमित शहांना सविस्तर समजावलं

Devendra Fadnavis Delhi Visit: देवेंद्र फडणवीसांनी सरकारमधून मला मोकळं करा, अशी विनंती दिल्लीतील पक्षश्रेष्ठींना केल्याची माहिती मिळतेय. अशातच आता फडणवीस आणि अमित शहांची भेट झाल्याची माहिती समोर येत आहे.

Devendra Fadnavis Meet Amit Shah : नवी दिल्ली : लोकसभा निकालांमध्ये (Lok Sabha Election Result 2024) भाजपला (BJP) महाराष्ट्रात (Maharashtra Elections 2024) मोठा धक्का बसला. राज्यातील लोकसभा निकालांमध्ये महायुतीला मिळालेल्या अपयशाची संपूर्ण जबाबदारी स्विकारत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपल्या खांद्यावर घेतली. तसेच, आगामी विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी राज्य सरकारमधून मोकळं करा, अशी विनंती पक्षश्रेष्ठींकडे करणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस दिल्लीला अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी पोहोचले. अशातच आता देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांची भेट झाल्याची माहिती समोर येत आहे. 

एबीपी माझाला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतली असून या भेटीत फडणवीसांच्या भूमिकेबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच, या भेटीदरम्यान, राज्यातील पराभवाच्या कारणांवर झाली सविस्तर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच, देवेंद्र फडणवीस यांनी रचनात्मक काम करण्याची इच्छा अमित शाह यांना बोलून दाखवली. पण, राजीनाम्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नसल्याची माहिती मिळत आहे. 

भेटीदरम्यान काय झालं? 

देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांची आज दिल्लीत भेट झाली. सरकारमधून बाहेर पडण्याच्या फडणवीसांच्या भूमिकेवर सविस्तर चर्चा झाली. मात्र, फडणवीसांच्या राजीनाम्याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याची माहिती मिळत आहे. राजीनामा देण्याच्या निर्णयावर देवेंद्र फडणवीस ठाम असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी माझाला दिली आहे. फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा मानस असल्याचं बोलून दाखवलं होतं. त्यावर दिल्लीतल्या बैठकीत चर्चा झाली. दिल्लीला जाण्याआधी फडणवीसांनी नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अधिकाऱ्यांनी चर्चा केली.  

महत्त्वाच्या बातम्या

गावाची ओढ लहानपणापासूनच, मला सरपंच व्हायचं होतं पण... अभिजीत दिपकेंनी माझा कट्ट्यावर सांगितला किस्सा
गावाची ओढ लहानपणापासूनच, मला सरपंच व्हायचं होतं पण... अभिजीत दिपकेंनी माझा कट्ट्यावर सांगितला किस्सा
धाराशिवमध्ये महायुतीत मैत्रीचा नवा अध्याय, भाजपा आमदाराच्या कार्यक्रमात ओमराजेंना मानाचं पान, राणाजगजितसिंहांना डावललं  
धाराशिवमध्ये महायुतीत मैत्रीचा नवा अध्याय, भाजपा आमदाराच्या कार्यक्रमात ओमराजेंना मानाचं पान, राणाजगजितसिंहांना डावललं  
संजय राऊतांविरोधात सोलापुरात गुन्हा दाखल, मंत्री जयकुमार गोरेंविरोधात केलं होतं अवमानकारक वक्तव्य
संजय राऊतांविरोधात सोलापुरात गुन्हा दाखल, मंत्री जयकुमार गोरेंविरोधात केलं होतं अवमानकारक वक्तव्य
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?

व्हिडीओ

Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Embed widget