Devendra Fadnavis : प्राजक्ता माळीने सहकुटुंब भेट घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचा मोठा शब्द
Devendra Fadnavis on Prajakta Mali, Mumbai : अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत सुरेश धस यांची तक्रार केली.
Devendra Fadnavis on Prajakta Mali, Mumbai : भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर टीका करताना अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali), रश्मिका मांदना आणि सपना चौधरी यांचा उल्लेख केला होता. त्यानंतर अभिनेत्री प्राजक्ता माळी चांगलीच संतापलेली पाहायला मिळाली. तिने राज्य महिला आयोगाकडे धस यांची तक्रार केली. शिवाय, आज प्राजक्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सहकुटुंब भेट घेत तक्रारींचा पाढा वाचला आणि निवेदन देखील दिले. दरम्यान, अभिनेत्री प्राजक्ता माळीने भेट घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
प्राजक्ता माळी यांच्या सन्मानाला बाधा येईल, असे कृत्य खपवून घेणार नाही ; देवेंद्र फडणवीस
अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर निवासस्थानी भेट घेतली आणि निवेदन दिले. त्यांच्या सन्मानाला बाधा येईल, असे कुठलेही कृत्य खपवून घेणार नाही आणि त्यावर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आश्वस्त केले. त्यांच्याविरोधात यूट्यूबवर काही लोक आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करतात, अशीही तक्रार त्यांनी यावेळी केली. त्या सर्वांवर सुद्धा कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना दिले.
महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या, अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची तक्रार आयोग कार्यालयास प्राप्त झाली आहे. त्याचा अभ्यास करून, कायदेशीर बाबी तपासून आवश्यक ती कार्यवाही नियमानुसार आयोग करेल. महिलांबाबत समाज माध्यमांसमोर बोलताना सर्वांनी भान ठेवलं पाहिजे,कारण संविधानाने दिलेल्या अधिकारामुळे सर्व क्षेत्रांमध्ये महिला स्वतःच्या कर्तुत्वावर काम करत आहेत आणि काम करत असताना समाज माध्यमांद्वारे केवळ त्या महिला आहेत म्हणून कोणताही पुरावा नसताना माध्यमांमध्ये त्यांच्या बाबतीत बदनामी करणारे वक्तव्य व त्याआधारे समाज माध्यमात सर्व घटकांनी शहानिशा न करता अतिशय घाणेरड्या पद्धतीने ट्रोल करणे याबाबत शासनाकडून कठोर कारवाई करणे बाबत आयोग पुढाकार घेईल.
अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर निवासस्थानी भेट घेतली आणि निवेदन दिले.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 29, 2024
त्यांच्या सन्मानाला बाधा येईल, असे कुठलेही कृत्य खपवून घेणार नाही आणि त्यावर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आश्र्वस्त केले.… pic.twitter.com/52M7I8lowk
इतर महत्त्वाच्या बातम्या
सुरेश धस यांची तक्रार करण्यासाठी प्राजक्ता माळी थेट सागर बंगल्यावर, देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट