(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Devendra Fadnavis : "आघाडी केली तरी लोकसभेत फायदा होणार नाही" फडणवीसांची मविआवर टीका
आघाडी केली तरी लोकसभेत फायदा होणार नाही. महाविकास आघाडीला कोणत्याही गोष्टीवरून श्रेय घ्यायची सवय लागलीय
Devendra Fadnavis : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (k chandrasekhar rao) यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांची भेट घेतली. या भेटीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आणि केसीआर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर टीका केलीय. आघाडी केली तरी लोकसभेत फायदा होणार नाही असे फडणवीस पत्रकारांशी बोलताना म्हणाले. आणखी काय म्हणाले फडणवीस?
आघाडी केली तरी लोकसभेत फायदा होणार नाही - फडणवीस
आघाडी केली तरी लोकसभेत फायदा होणार नाही. महाविकास आघाडीला कोणत्याही गोष्टीवरून श्रेय घ्यायची सवय लागलीय. उत्तर प्रदेशातही महाविकास आघाडीचा प्रयोग करून झाला, पण त्याचा काहीही फायदा नाही. मागच्या लोकसभेतही हातात हात घालून आघाडी केली. परंतु त्याचा काहीही फायदा झाला नाही. उत्तर प्रदेशासह देशातील विविध राज्यात हा प्रयोग करून पाहिला. मात्र याचा काहीही फायदा झाला नाही. तेलंगणातील परिस्थिती पाहता मागच्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या ४ जागा निवडून आल्या. तर पुढच्या लोकसभेमध्ये तेलंगाणात भाजप नंबर १ चा पक्ष असेल
सरकारला सूडाचं राजकारण करू द्या.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील बंगल्याची पाहणी आणि बेकायदा बांधकामाची मोजणी करण्यासंदर्भात महापालिकेने राणे यांना नोटीस बजावली. नारायण राणेंच्या जुहू बंगल्यावर आज पालिकेचं पथक तपासणीसाठी जाण्याची शक्यता आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, जिथे सरकारला सुडाचं राजकारण करायचं असेल तिथे सरकार करेल, या सर्व गोष्टींना न्याय देण्यासाठी न्यायालय सक्षम आहे.
राणे विरुद्ध शिवसेना हा राजकीय कलगीतुरा
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईतल्या जुहू इथल्या अधीश बंगल्याची पाहणी करण्यासाठी मुंबई महापालिकेचं पथक रवाना झालं आहे. राणे यांच्या बंगल्याची पाहणी करण्यासंदर्भात मुंबई महापालिकेनं याआधीच नोटीस बजावली आहे नारायण राणे विरुद्ध शिवसेना हा राजकीय कलगीतुरा रंगला असताना आता त्यात बंगल्यावरुन सुरु झालेल्या वादाची भर पडलीय. दरम्यान आजच्या पाहणीनंतर मुंबई महापालिकेच्या पथकाला नारायण राणेंच्या बंगल्यात अनियमितता आढळणार का ? आणि आढळली तर अधीश बंगल्यावर कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ही तर फक्त सुरुवात आहे...
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (k chandrasekhar rao) यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांची भेट घेतली. याभेटीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आणि केसीआर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना केसीआर म्हणाले की, ही तर फक्त सुरुवात आहे. आम्ही देशातील इतर नेत्यांशीही चर्चा करणार आहोत, असं म्हणत केसीआर यांनी देशात भाजपविरुद्ध तिसऱ्या आघाडीची मोर्चे बांधणी करणार असल्याचे थेट संकेत दिले आहेत. केसीआर आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर या तिसऱ्या आघाडीची सुरुवात महाराष्ट्रातून झाली आहे, असं म्हणता येईल.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- महाराष्ट्रद्वेषी लोकांना जी भाषा समजते त्याच भाषेतच बोलावं; सकाळच्या प्रहरी बरसले संजय राऊत
- लाव रे तो व्हिडीओ! विनायक राऊतांचा राणेंवर हल्लाबोल; 'फडणवीसांनी राणेंवर केलेल्या आरोपांची चौकशी करा'
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha