एक्स्प्लोर

आम्हाला तुमचाही पाठिंबा हवाय; देवेंद्र फडणवीसांचा थेट शरद पवारांना फोन, राजकीय वर्तुळात चर्चा तर होणारच

उपराष्ट्रपती पदासाठी एनडीए उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांना पाठिंबा मागण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे दोघांनाही फोन केला होता.

मुंबई : लोकसभा, विधानसभा निवडणुकांनंतर सध्या राज्याचे लक्ष लागले ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे. मात्र, तत्पूर्वीच उपराष्ट्रपती जगदीश धनकड यांनी आपल्या पदाचा अचानक राजीनामा दिल्याने उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर झाली आहे. भाजप एनडीएकडून उपराष्ट्रपतीपदासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. राधाकृष्णन यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशीच भाजपची इच्छा आहे. मात्र, काँग्रेस इंडिया आघाडीकडूनही आपला उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आजच प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत बी. सुदर्शन रेड्डी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार (Sharad pawar) आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना फोन केला. 

उपराष्ट्रपती पदासाठी एनडीए उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांना पाठिंबा मागण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे दोघांनाही फोन केला होता. उपराष्ट्रपतीपदाचे एनडीएचे उमेदवार राज्यपाल राधाकृष्णन हे महाराष्ट्रातील मतदार असल्याने त्यांना पाठिंबा द्यावा, अशी विनंती फडणवीसांनी दोन्ही नेत्यांकडे केल्याची सूत्रांची माहिती आहे. उपराष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीत आपला तुमचाही पाठिंबा हवाय, असे म्हणत मुख्यमंत्र्‍यांनी विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांना फोन केला. मात्र, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना फोन केल्याचे कुठलेही वृत्त नाही. त्यामुळे, फडणवीसांनी ठाकरे आणि पवारांना फोन करुन पाठिंबा मागितला आहे. 

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांशी देवेंद्र फडणवीस संवाद साधत आहेत. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी फडणवीस मविआतील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करत आहेत. एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याबाबत ही चर्चा होत असून याबाबतची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे, त्याचाच एक भाग म्हणून फडणवीसांनी ठाकरे-पवारांना फोन केले. खासदार संजय राऊत यांनीही यास दुजोरा दिला आहे. 

बी. सुदर्शन रेड्डींच्या अर्ज भरतेवेळी शरद पवार

विरोधी पक्षांनी एकत्र येऊन बी.सुदर्शन रेड्डी यांची उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल केली. संसद भवनातील निवडणूक कार्यालयात एकजुटीचे दर्शन घडले, असे ट्विट खासदार संजय राऊत यांनी केले आहे. लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राज्यसभा विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे व इंडिया आघाडीतील पक्षातील प्रमुख नेत्यांसह 'उपराष्ट्रपती'पदाचे विरोधी पक्षाचे संयुक्त उमेदवार, सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी ह्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित राहिलो. लढाई संविधान अन् लोकशाही बळकटीकरणाची आहे आणि आम्हाला ठाम विश्वास आहे कि, लोकशाही मूल्यांवर गाढा विश्वास असणारे 'उपराष्ट्रपती'पदाचे विरोधी पक्षाचे संयुक्त उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी त्या विश्वासाला सार्थ ठरवतील, असे ट्विट शरद पवार यांनी केले आहे. त्यामुळे, शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवारांनी आपला पाठिंबा इंडिया आघाडीचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांना दिल्याचं स्पष्ट होत आहे. 

हेही वाचा

नितेश राणेंना पूर्वजांची आठवण, वराह अवतारात त्यांनी वराह जयंती साजरी करावी; सुषमा अंधारेंचा खोचक पलटवार

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
Manoj Jarange Patil Health Update: मनोज जरांगे तापाने फणफणले, 102 इतका ताप, टायफॉइडचीही लक्षणं; डॉक्टरांकडून महत्त्वाची अपडेट
मनोज जरांगे तापाने फणफणले, 102 इतका ताप, टायफॉइडचीही लक्षणं; डॉक्टरांकडून महत्त्वाची अपडेट
Abhijit Dipke and Gulabrao Patil: अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
Abhijit Dipke and Gulabrao Patil: अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
Embed widget