एक्स्प्लोर

काल म्हणाले मला मोकळं करा, आज संघाच्या वरिष्ठांशी 2 तास चर्चा; देवेंद्र फडणवीस थेट नागपुरात

नागपुरात देवेंद्र फडणवीसांच्या स्वागताला विमानतळावर मोठी गर्दी झाली होती. महायुतीच्या पराभवानंतर फडणवीसांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.

नागपूर : लोकसभा निवडणुकांच्या निकालात देशात एनडीए आघाडीने बहुमताचा आकडा गाठला आहे. मात्र, अब की बार 400 पारचा नारा देणाऱ्या भाजपला 240 जागांवरच समाधान मानावे लागले. तर, इंडिया आघाडीनेही 230 पर्यंतचं संख्याबळ गाठलं आहे. त्यामुळे, मोदींच्या नेतृत्वात तिसऱ्यांदा देशात एनडीए आघाडीच्या (NDA) सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दुसरीकडे महाराष्ट्रात महायुतीला मोठा पराभव पत्कारावा लागल्याने महायुतीचे सर्वच नेते निराश असल्याचे दिसून येते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी पत्रकार परिषद घेऊन, लोकसभा निवडणुकांतील पराभव मान्य करतो, या पराभवाची जबाबदारी मी स्वीकारतो, असे म्हटले. त्यानंतर, फडणवीस आज संघाची राजधानी आणि त्यांचं होम टाऊन असलेल्या नागपुरात दाखल झाले आहेत. 

नागपुरात देवेंद्र फडणवीसांच्या स्वागताला विमानतळावर मोठी गर्दी झाली होती. महायुतीच्या पराभवानंतर फडणवीसांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. यावेळी, आपण उपमुख्यमंत्री पदावरुन मुक्त होण्याची विनंती आपण वरिष्ठ नेतृत्वाकडे करणार आहे. आगामी काळात मला पक्षासाठी पूर्णवेळ काम करायचं आहे. त्यामुळे, सत्तेच्या जबाबदारीतून मला मोकळं करावं, असेही फडणवीस यांनी म्हटले. त्यानंतर, भाजपच्या प्रदेशाध्यक्षांस सर्वांनीच फडणवीसांच्या या मागणीला विरोध केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत राहूनच पक्षाचं काम केलं पाहिजे, असेही म्हटले. तर, महायुतीमधील घटक पक्षांनीही फडणवीस हे सत्तेत असले पाहिजे, अशीच भूमिका घेतली. मात्र, फडणवीस आपल्या निर्णयावर अद्याप तरी ठाम असून आज ते नागपुरात पोहोचले आहेत. 

नागपूर हा फडणवीसांचा बालेकिल्ला असून स्वगृही त्यांच्या स्वागताला विमानतळावरच मोठी गर्दी पाहायला मिळाली. नागपुरात आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा झाली. फडणवीसांच्या धरमपेठ येथील निवासस्थानी सुमारे 2 तास ही चर्चा झाल्याची माहिती आहे. आज सकाळी नागपुरात दाखल झाल्यानंतर फडणवीस थेट आपल्या धरमपेठेतील निवासस्थानी गेले होते. नागपुरात संघ शिक्षा वर्ग सुरु असल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्व प्रमुख अधिकारी सध्या नागपुरात आहेत. त्यामुळे काही वरिष्ठ अधिकारी फडणवीसांच्या घरी आले, आणि तेथे सुमारे दीड तास चर्चा झाली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याची माहिती नाही. मात्र, काल देवेंद्र फडणवीस यांनी अचानकच महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांच्या निकालांची जबाबदारी स्वतःवर घेत सरकारमधून मुक्त करण्याची विनंती पक्षश्रेष्ठींकडे केली. त्यानंतर, संघ ही सक्रिय झाल्याचं आजच्या बैठकीतून दिसून येत आहे. 

१) देवेंद्र फडणवीस स्वतः स्वयंसेवक असून ते सत्ताकारणात गेल्यानंतरही त्यांचे संघाशी जवळचे वैयक्तिक संबंध आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी एकदम सरकारमध्ये न राहण्याची आणि संघटनेचा काम करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर नेमकं काय झालंय हे आजच्या बैठकीतून संघाकडून जाणून घेण्यात आलं असावं.

२) तसेच अशा स्थितीत काय करता येऊ शकेल या संदर्भात संघाकडून काही सूचना आणि सल्ला देण्यात आलं असावं अशीच शक्यता आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस हे आज दिल्लीत जाणार असल्याने त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या निवासस्थानी संघाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी झालेली ही चर्चा अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे. त्यामुळे, पुढील काही दिवसांत राज्याच्या राजकारणात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.  

लोकसभा निवडणुकीत कोणाला किती  जागांवर विजय मिळाला?

देशपातळीवरील समीकरणं

एनडीए आघाडी- 294
इंडिया आघाडी- 232
इतर-17

महाराष्ट्रातील खासदारांचे पक्षीय बलाबल

महाविकास आघाडी- 30
महायुती- 17
अपक्ष- 1

महायुतीमधील पक्षीय बलाबल

भाजप- 9
शिवसेना (शिंदे गट)-7
राष्ट्रवादी काँग्रेस-1

महाविकास आघाडीत कोणाला किती जागा?

काँग्रेस- 13
ठाकरे गट-9
शरद पवार गट-8

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लातूरमधील नीट पेपरफुटीतील आरोपी गंगाधरला पोलिसांनी अटक केलीय; पत्नीचा दावा
लातूरमधील नीट पेपरफुटीतील आरोपी गंगाधरला पोलिसांनी अटक केलीय; पत्नीचा दावा
Pune Drug Case:  अहो, तुमच्या अब्रुनुकसानीच्या नोटीसा आम्ही डायपर म्हणून वापरतो; सुषमा अंधारेंचं शंभुराज देसाईंना सणसणीत प्रत्युत्तर
अहो, तुमच्या अब्रुनुकसानीच्या नोटीसा आम्ही डायपर म्हणून वापरतो; सुषमा अंधारेंचं शंभुराज देसाईंना सणसणीत प्रत्युत्तर
मी पहिल्यांदाच पंकजा मुंडेंना धोका दिला; शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची ऑडिओ क्लिप व्हायरल, बीडमध्ये गोंधळ
मी पहिल्यांदाच पंकजा मुंडेंना धोका दिला; शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची ऑडिओ क्लिप व्हायरल, बीडमध्ये गोंधळ
Uddhav Thackeray meets Devendra Fadnavis: तुम्हा दोघांना एकत्र पाहून बरं वाटतं, उद्धव ठाकरे दरेकरांकडे पाहून म्हणाले, याला लिफ्टमधून पहिले बाहेर काढा!
तुम्हा दोघांना एकत्र पाहून बरं वाटतं, उद्धव ठाकरे दरेकरांकडे पाहून म्हणाले, याला लिफ्टमधून पहिले बाहेर काढा!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Vidhan Sabha : अधिवेशनातील खडाजंगी :ठाकरे-फडणवीस भेट,शिंदेंचे आमदार भिडले, काय काय घडलं?ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 27 June 2024Pravin Darekar On Uddhav Thackeray Devendra Fadanvis : देवेंद्र फडणवीस- उद्धव ठाकरे यांच्यात काय चर्चा झाली? दरेकर काय म्हणाले?Uddhav Thackeray PC : उद्धव ठाकरे - देवेंद्र फडणवीसांची लिफ्टमध्ये भेट; 3 मिनिटांच्या भेटीत काय चर्चा झाली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लातूरमधील नीट पेपरफुटीतील आरोपी गंगाधरला पोलिसांनी अटक केलीय; पत्नीचा दावा
लातूरमधील नीट पेपरफुटीतील आरोपी गंगाधरला पोलिसांनी अटक केलीय; पत्नीचा दावा
Pune Drug Case:  अहो, तुमच्या अब्रुनुकसानीच्या नोटीसा आम्ही डायपर म्हणून वापरतो; सुषमा अंधारेंचं शंभुराज देसाईंना सणसणीत प्रत्युत्तर
अहो, तुमच्या अब्रुनुकसानीच्या नोटीसा आम्ही डायपर म्हणून वापरतो; सुषमा अंधारेंचं शंभुराज देसाईंना सणसणीत प्रत्युत्तर
मी पहिल्यांदाच पंकजा मुंडेंना धोका दिला; शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची ऑडिओ क्लिप व्हायरल, बीडमध्ये गोंधळ
मी पहिल्यांदाच पंकजा मुंडेंना धोका दिला; शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची ऑडिओ क्लिप व्हायरल, बीडमध्ये गोंधळ
Uddhav Thackeray meets Devendra Fadnavis: तुम्हा दोघांना एकत्र पाहून बरं वाटतं, उद्धव ठाकरे दरेकरांकडे पाहून म्हणाले, याला लिफ्टमधून पहिले बाहेर काढा!
तुम्हा दोघांना एकत्र पाहून बरं वाटतं, उद्धव ठाकरे दरेकरांकडे पाहून म्हणाले, याला लिफ्टमधून पहिले बाहेर काढा!
Nashik Teachers Constituency Election 2024 : मी शपथ घेतो की...! निकालाआधीच झळकले विवेक कोल्हेंच्या विजयाचे बॅनर
मी शपथ घेतो की...! निकालाआधीच झळकले अपक्ष उमेदवार विवेक कोल्हेंच्या विजयाचे बॅनर, राजकीय चर्चांना उधाण
Eknath Khadse : 'मागून येणाऱ्यांना आधी संधी मिळते हे वाईट'; एकनाथ खडसेंची भाजप नेत्यांसमोर खदखद!
'मागून येणाऱ्यांना आधी संधी मिळते हे वाईट'; एकनाथ खडसेंची भाजप नेत्यांसमोर खदखद!
Ashwini bhave : लिंबू कलरची साडी अन्..., अश्विनी भावेंसाठी सिनेमाचा दिग्दर्शकच झाला व्हिडीओग्राफर
लिंबू कलरची साडी अन्..., अश्विनी भावेंसाठी सिनेमाचा दिग्दर्शकच झाला व्हिडीओग्राफर
Sushma Andhare:
"विषय संपला", ठाकरे-फडणवीस भेटीवर सुषमा अंधारेंची मोठी प्रतिक्रिया!
Embed widget