Fadnavis-Patole Meet : भंडाऱ्यात फडणवीस आणि पटोले यांची भेट, बंद दाराआड पाच मिनिटं खलबतं
Fadnavis-Patole Meet : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची काल भंडाऱ्यात भेट झाली. बंद दाराआड देवेंद्र फडणवीस आणि नाना पटोले यांच्यात पाच मिनिटं खलबतं झालं.
![Fadnavis-Patole Meet : भंडाऱ्यात फडणवीस आणि पटोले यांची भेट, बंद दाराआड पाच मिनिटं खलबतं Deputy CM Devendra Fadnavis and Maharashtra Congress President Nana Patole meets at Bhandara Fadnavis-Patole Meet : भंडाऱ्यात फडणवीस आणि पटोले यांची भेट, बंद दाराआड पाच मिनिटं खलबतं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/04/8c947707dcbd029eb2004144366aca2d166485878458883_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Fadnavis-Patole Meet : भंडारा (Bhandara) जिल्ह्यात काल (3 ऑक्टोबर) अवघ्या काही मिनिटांची मात्र राजकीय दृष्टिकोनातून अनेकांच्या भुवया उंचावणारी एक घटना घडली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांची काल भेट झाली. बंद दाराआड देवेंद्र फडणवीस आणि नाना पटोले यांच्यात पाच मिनिटं खलबतं झालं. या बैठकीचा तपशील कळू शकलेला नाही. परंतु या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.
भंडारा जिल्हा नियोजन समितीची बैठक काल भंडाऱ्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पार पडली. फडणवीस पालकमंत्री म्हणून पहिल्यांदाच बैठकीला आले होते. या बैठकीसाठी भंडारा जिल्ह्यातून आमदार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले काहीसा उशिरा पोहोचले. बैठकीमध्ये नाना पटोले यांनी प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले. त्याला अधिकारी आणि देवेंद्र फडणवीस यांनी देखील उत्तरं दिली. सुमारे दीड तास ते पावणे दोन तास चाललेल्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद घेणार होते. मात्र बैठक आणि पत्रकार परिषदेदरम्यानच्या पाच-सात मिनिटांच्या कालावधीत देवेंद्र फडणवीस आणि नाना पटोले यांची अवघ्या काही मिनिटांसाठी नियोजन अधिकाऱ्याच्या चेंबरमध्ये भेट झाली. यावेळी फडणवीस यांनी त्यांच्यासोबतचे राजकीय कार्यकर्ते आणि त्यांचे सुरक्षा पथकाला बाहेर ठेवले होते. सुमारे पाच मिनिट भेट घेतल्यानंतर फडणवीस लगेच पुन्हा बैठकीचे हॉलमध्ये पत्रकार परिषद घेण्यासाठी पोहोचले.
फडणवीस-पटोले भेटीची चर्चा
दरम्यान देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषदेच्या या पाच मिनिटांच्या बैठकीमध्ये फडणवीस आणि पटोले यांच्यामध्ये काय चर्चा झाली हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. नाना पटोले यांनी जेव्हा भाजप सोडली होती तेव्हा त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यानंतरही ते सातत्याने फडणवीस यांच्यावर टीका करत राहिले. मात्र जेव्हा पालकमंत्री म्हणून फडणवीस हे पटोले यांच्या भंडारा जिल्ह्यात आले तेव्हा पटोले यांनी भेट घेत काय चर्चा केली यासंदर्भात आता चर्चा रंगू लागल्या आहेत.
भेटीत स्थानिक प्रश्नांवर चर्चा झाल्याची शक्यता
भेटीमागचं कारण काय हे समजू शकलेलं नाही. स्थानिक कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, भंडारा जिल्ह्यातील स्थानिक प्रश्न आहेत, त्याबाबत नाना पटोले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली. एकमेकांचे विरोधक असणारे नेते भेटतात आणि बंद दाराआड त्यांच्याच चर्चा होते. त्यामुळे राजकीय विश्वात या भेटीमुळे भुवया उंचावल्याशिवाय रा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)