आम्हाला योग्य मंत्रीपदं मिळतील, सगळा निर्णय एकनाथ शिंदे घेतील, मंत्रीपदाबाबत नेमकं काय म्हणाले उदय सामंत?
आम्हाला हवी असणारी योग्य ती मंत्रीपद मिळतील, त्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) घेतील असं वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे आमदार उदय सामंत (Uday Samant) यांनी केलं.
Uday Samant : आम्हाला हवी असणारी योग्य ती मंत्रीपद मिळतील, त्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Deputy Chief Minister Eknath Shinde) घेतील असं वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे आमदार उदय सामंत (Uday Samant) यांनी केलं. दरम्यान, कोणाला कोणतं मंत्रीपद द्यायचं याबाबतचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील असे सामंत म्हणाले. एकनाथ शिंदे कुठेही नाराज नाहीत, फक्त आमच्या विरोधकांनी तयार केलेल्या बातम्या असल्याचे उदय सामंत म्हणाले.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मागच्या पाच दिवसांमध्ये दोनदा पत्रकार परिषद घेऊन सांगितले की भाजप जो कोणी चेहरा देईल त्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याला आमचा पाठिंबा असेल. त्यामुळं एकनाथ शिंदे नाराज आहेत, अशा बातम्या नुसत्या पसरवल्या जात असल्याचे उदय सामंत म्हणाले. आमच्या पक्षाला कुठले मंत्रीपद हवे आहे, त्या संदर्भात सुद्धा एकनाथ शिंदेच ठरवतील असं सामंत यांनी सांगितलं. मी जरी पक्षाच्या बैठकांमध्ये उपस्थित असतो तरी मंत्रीपदाबाबत निर्णय हे एकनाथ शिंदेच घेतात. कुणाला कोणते मंत्रिपद हवे त्या सगळ्या संदर्भात चर्चा सुरू आहे. लवकरच याबाबत आणखी निर्णय होऊन समोर येईल असं सामंत यांनी सांगितलं.
सकाळच्या पत्रकार परिषदेला मी रोज उत्तर देईल पण आज...संजय राऊतांना टोला
मी ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम केलं आहे, त्या जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे गाव आहे. मी त्यांना अभिवादन करण्यासाठी इथे आलो असल्याचे सामंत म्हणाले. इंदू मिल स्मारकाच्या संदर्भात देखील सामंत यांना प्रश्न विचारम्यात आले. यावेळी सामंत म्हणाले की, काही तांत्रिक बाबी असू शकतील मात्र निधीची कमतरता पडू देणार नाही, ही दक्षता शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी पण कमी पडू दिला नाही आता देवेंद्र फडणवीस ते देखील दक्षता घेतील असे सामंत म्हणाले. यावेळी सामंत यांनी संजय राऊतांनी देखील टोला लगावला. त्या सकाळच्या पत्रकार परिषदेला मी रोज उत्तर देईल पण आजचा दिवस बाबासाहेबांना अभिवादन करण्याचा आहे. यादिवशी तरी कोणी वाईट बोलू नये अशी अपेक्षा असल्याचे सामंत म्हणाले. निलेश राणे-नितेश राणे आणि उदय सामंत - किरण सामंत या दोन्ही सख्ख्या भावांची जोडी सभागृहात गेली आहेत. यावर बोलताना उदय सामंत म्हणाले की, सेवा करण्यासाठी जातोय, याबाबत आम्ही नक्कीच समाधानी असल्याचे उदय सामंत यावेळी म्हणाले.