एक्स्प्लोर

Deepak Kesarkar On Maharashtra School Uniform: बदल करण्याआधी निदान मला विचारायला हवे; दीपक केसरकर संतापले, म्हणाले देवेंद्र फडणवीसांना...

Deepak Kesarkar On Maharashtra School Uniform: मोफत गणवेश योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीकडे देण्यात येणार आहे.

Deepak Kesarkar On Maharashtra School Uniform: महाराष्ट्र सरकारच्या 'एक राज्य, एक गणवेश'  (Maharashtra School Uniform) या योजनेमध्ये सुधारणा करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.  एक राज्य, एक गणवेश योजना फसल्याने या योजनेत बदल केल्याचं म्हटलं जात आहे. 

मोफत गणवेश योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीकडे देण्यात येणार आहे. थेट लाभार्थी योजनेअंतर्गत शाळा समितीकडे निधी दिला जाणार असून यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक सत्र सुरू होताच योग्य मापाचे गणवेश दिले जातील, असं म्हटलं जात आहे. एक राज्य एक गणवेश योजनेवर माजी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

दीपक केसरकर नेमकं काय म्हणाले?

दीपक केसरकर यांनी एक राज्य एक गणवेश या योजनेत केलेल्या बदलावर टीका केली आहे. मी त्या खात्याचा माजी मंत्री होतो. निदान बदल करण्याच्या आधी मला विचारायला हवे, मी आता मंत्री नसलो म्हणून काय झाले?, असा सवाल दीपक केसरकरांनी उपस्थित केला. इतक्या मोठ्या प्रमाणात एखादी योजना राबवायची असेल तर त्यासाठी एखाद वर्ष जावे लागते, आता त्या महिलांनी घेतलेल्या मशिनरी आणि केलेल्या इन्व्हेस्टमेंटचे काय होणार?, निधान त्यांचा तरी विचार करायला हवा होता. सध्या या खात्याचे मंत्री नसल्यामुळे कोणाला विचारणार, म्हणूनच मी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटणार आणि हे बदल करू नका असे सांगणार आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी देखील यासंदर्भात चर्चा करणार असल्याची माहिती दीपक केसरकरांनी दिली. 

एक राज्य एक गणवेश योजनेत बदल काय आहे ?

1. गणवेश पुरवठ्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीकडे.

2. थेट लाभार्थी योजनेअंतर्गत शाळा व्यवस्थापनाला निधीचे वाटप.

3. विद्यार्थ्यांना वेळेवर व नियमित गणवेश पुरवठा होणार.

4. स्थानिक पातळीवर खरेदी व शिलाईमुळे रोजगार मिळणार...

दीपक केसरकरांनी 'एक राज्य एक गणवेश' योजना केली होती सुरु-

राज्याचे माजी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी 'एक राज्य एक गणवेश' ही योजना सुरु करण्यात आली होती. या योजनेतंर्गत सुरुवातीला राज्यातील बचतगटांना गणवेश तयार करण्याचे काम देण्यात आले होते. मात्र, या गणवेशांचा निकृष्ट दर्जा आणि कमी-जास्त मोजमाप यामुळे प्रचंड वाद निर्माण झाला होता. पाहिल्याची बाही दुसऱ्याच्या शर्टाला, दुसऱ्याचा खिसा तिसऱ्याच्या पॅन्टला, अशी परिस्थिती पाहायला मिळाली होती. त्यामुळे ही योजना वादात सापडली होती. एक राज्य एक गणवेश या जुन्या योजनेवर निकृष्ट दर्जाचे कापड आणि शिलाईवरून राज्य सरकारवर टीका केली जात होती. तसंच वेळेत गणवेशही उपलब्ध होत नव्हते. अर्धे वर्षे उलटूनही अनेक विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले नव्हते.  या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने 'एक राज्य एक गणवेश' योजनेत काही बदल केले आहेत. 

संबंधित बातमी:

Maharashtra School Uniform: धड खिसा नाही, एकाचा हात दुसऱ्या शर्टाला; सरकारने विद्यार्थ्यांना दिलेले गणवेश पाहून विरोधक संतापले

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे

Read More

महत्त्वाच्या बातम्या

अजितदादांचा जसा घात झाला तसाच एकनाथ शिंदेंचांही घात झाल्याशिवाय राहणार नाही, शिवसनेच्या पदाधिकाऱ्याच्या वक्तव्यानं खळबळ 
अजितदादांचा जसा घात झाला तसाच एकनाथ शिंदेंचांही घात झाल्याशिवाय राहणार नाही, शिवसनेच्या पदाधिकाऱ्याच्या वक्तव्यानं खळबळ 
देवेंद्र फडणवीस म्हणाले, फोटोची गरज नाही, आम्ही त्यांना प्रपोजल दिलंय; पुण्यातील राजकीय वर्तुळात चर्चा
देवेंद्र फडणवीस म्हणाले, फोटोची गरज नाही, आम्ही त्यांना प्रपोजल दिलंय; पुण्यातील राजकीय वर्तुळात चर्चा
ठाकरेंच्या शिवसेनेत पदाधिकाऱ्यांचा राडा, गडचिरोली जिल्हाध्यक्षांकडूनच कार्यालयाची तोडफोड; लातूरमध्येही गोंधळ
ठाकरेंच्या शिवसेनेत पदाधिकाऱ्यांचा राडा, गडचिरोली जिल्हाध्यक्षांकडूनच कार्यालयाची तोडफोड; लातूरमध्येही गोंधळ
Siddharth Jadhav: काँग्रेस गटनेत्या वेटिंगवर अन् सिद्धार्थ जाधवला थेट एन्ट्री; महापालिकेच्या दालनाबाहेर हायव्होल्टेज ड्रामा
काँग्रेस गटनेत्या वेटिंगवर अन् सिद्धार्थ जाधवला थेट एन्ट्री; महापालिकेच्या दालनाबाहेर हायव्होल्टेज ड्रामा

व्हिडीओ

Mountaineer Umesh Zirpe On Majha Katta : यावेळीची मोहीम कशी होती? झिरपेंनी सांगितला थरारक अनुभव
Women Power : महिलांनी घेतला निर्धार अन् बदललं गावाचं चित्र; 'महिला शक्ती कमांडो'ची यशोगाथा | Special Report
Jamun & Drought : जांभळाचा सडा आणि दुष्काळाचा इशारा? निसर्ग काय सांगतोय? | Special Report
Crime Patrol Style Theft Special Report : 'क्राईम पेट्रोल' पाहून रचला चेन स्नॅचिंगचा कट; पोलिसांनी मुसक्या आवळल्या
Jalgaon MLC Election Special Report : नाशकातील बंडखोरी मिटली, पण जळगावचा पेच कायम! शिवसेनेच्या रेश्मा काळे 'नॉट रिचेबल'!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India vs Afghanistan, 1st ODI: टीम इंडियाची अफगाणिस्तानविरुद्ध शानदार विजयी सलामी, गिलची 'कॅप्टन' इनिंग, केएल राहुलने कळस चढवला; गुरबाजचे विक्रमी शतक व्यर्थ
टीम इंडियाची अफगाणिस्तानविरुद्ध शानदार विजयी सलामी, गिलची 'कॅप्टन' इनिंग, केएल राहुलने कळस चढवला; गुरबाजचे विक्रमी शतक व्यर्थ
Rohit Sharma Video: रोहित शर्माचा दुर्दैवाचा फेरा सुरुच, दुखापतीतून सावरून आला, पहिल्याच ओव्हरमध्ये मनगटाच्या वेदनेनं तळमळला, पुन्हा उभा राहिला, पण जम बसण्यापूर्वीच रन आऊटने घात केला
Video: रोहित शर्माचा दुर्दैवाचा फेरा सुरुच, दुखापतीतून सावरून परतला, पहिल्याच ओव्हरमध्ये मनगटाच्या वेदनेनं तळमळला, पुन्हा उभा राहिला, पण जम बसण्यापूर्वीच रन आऊटने घात केला
होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांचे आदेशांचे पालन करा, नाकेबंदी तोडल्यास कारवाई केली जाईल; आंतरराष्ट्रीय पाण्यातही अमेरिकेचा भारताला सज्जड दम, तीन दिवसात अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यात तीन भारतीयांचा मृत्यू
होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांचे आदेशांचे पालन करा, नाकेबंदी तोडल्यास कारवाई केली जाईल; आंतरराष्ट्रीय पाण्यातही अमेरिकेचा भारताला सज्जड दम, तीन दिवसात अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यात तीन भारतीयांचा मृत्यू
लातूरमध्ये तीन गाड्यांचा भीषण अपघात; दुचाकीवर पत्नी-पत्नीचा मृत्यू, वॅगनॉरमधील 1 ठार, 2 जखमी
लातूरमध्ये तीन गाड्यांचा भीषण अपघात; दुचाकीवर पत्नी-पत्नीचा मृत्यू, वॅगनॉरमधील 1 ठार, 2 जखमी
India vs Afghanistan, 1st ODI: अफगाणिस्तानचे टीम इंडियासमोर 195 धावांचे आव्हान; गुरनूर ब्रार अन् हर्ष दुबे पदार्पणातच 3-3 विकेट घेत चमकले; गुरबाजने 48 चेंडूत शतक ठोकत 21 वर्षांचा विक्रम मोडला
अफगाणिस्तानचे टीम इंडियासमोर 195 धावांचे आव्हान; गुरनूर ब्रार अन् हर्ष दुबे पदार्पणातच 3-3 विकेट घेत चमकले; गुरबाजने 48 चेंडूत शतक ठोकत 21 वर्षांचा विक्रम मोडला
देवेंद्र फडणवीस म्हणाले, फोटोची गरज नाही, आम्ही त्यांना प्रपोजल दिलंय; पुण्यातील राजकीय वर्तुळात चर्चा
देवेंद्र फडणवीस म्हणाले, फोटोची गरज नाही, आम्ही त्यांना प्रपोजल दिलंय; पुण्यातील राजकीय वर्तुळात चर्चा
मन हेलावणारी घटना, घरातून सांगून निघाले, दूधसागर नदीपात्रात बुडून चार जणांचा मृत्यू; तीन सख्ख्या भावांचा समावेश
मन हेलावणारी घटना, घरातून सांगून निघाले, दूधसागर नदीपात्रात बुडून चार जणांचा मृत्यू; तीन सख्ख्या भावांचा समावेश
Rahmanullah Gurbaz: अफगाणिस्तानचा रहमानुल्ला गुरबाज धर्मशालात पावसानंतर टीम इंडियावर धो धो कोसळला! अवघ्या 48 चेंडूत शतक ठोकत केला भीम पराक्रम, भारताविरुद्ध शाहीद आफ्रिदीनंतर दुसरं वेगवान शतक
अफगाणिस्तानचा रहमानुल्ला गुरबाज धर्मशालात पावसानंतर टीम इंडियावर धो धो कोसळला! अवघ्या 48 चेंडूत शतक ठोकत केला भीम पराक्रम, भारताविरुद्ध शाहीद आफ्रिदीनंतर दुसरं वेगवान शतक
Embed widget