Devendra Fadnavis: तुमचा वकील म्हणून मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार; धान उत्पादक शेतकऱ्यांना देवेंद्र फडणवीसांची ग्वाही, म्हणाले...
Devendra Fadnavis: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गोंदिया-भंडारा (Bhandara-Gondia)जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना (Paddy Farmers) मोठा दिलासा दिला आहे.
Devendra Fadnavis गोंदिया : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गोंदिया-भंडारा (Bhandara-Gondia)जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना (Paddy Farmers) मोठा दिलासा दिला आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी हेक्टरी 25 हजार रुपये बोनस मिळवून देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात धानाला बोनस घोषित केलं होतं. मात्र, ते शेतकऱ्यांना मिळत नव्हतं. आमचच सरकार आलं तेंव्हा पासुन आम्ही धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस दिला आहे. यावर्षी 25 हजार रुपये बोनसची मागणी आहे. ती मागणी मी शेतकऱ्यांचा वकील म्हणून मुख्यमंत्र्यांकडे जाईल आणि मागणी पूर्ण करून देईल, अशी ग्वाही यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते गोंदिया (Gondia) येथील विनोद अग्रवाल यांच्या कर्तव्यपूर्ती सभेच्या भाषणादरम्यान बोलत होते.
धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी हेक्टरी 25 हजार बोनस
गोंदिया-भंडारासह पूर्व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात (Bhandara News) धानाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. एकट्या भंडारा जिल्ह्यात सुमारे दीड लाखांहून अधिक शेतकरी धानाचं उत्पादन घेतात. अशातच धान उत्पादक शेतकऱ्यांना महायुती सरकारने मोठा दिलासा दिला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी हेक्टरी 25 हजार रुपये बोनस मिळवून देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तिरोडा मतदारसंघातील 5 हजार 422 कोटींच्या विविध विकास कामांचे आज तिरोडा, गोंदिया येथे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस महाणले की, 15 एप्रिल 2024 ला येथे आलो असताना धापेवाडा उपसा सिंचन योजनेच्या पुढच्या टप्प्याचे भूमिपूजन आणि जलपूजन करण्यासाठी येण्याचे आश्वासन दिले होते, ते आज पूर्ण करू शकलो याचा आनंद आहे. बोदलकसा व चोरखमारा तलावांच्या जुन्या वितरिकांचे पुर्णपणे नूतनीकरण आणि सबलीकरण करण्याच्या दुरूस्ती कामांचे देखील यावेळी भूमिपूजन केले. हे काम झाल्याने एकट्या तिरोड्यामध्ये 75 हजार एकर जमीन ओलीताखाली येणार आहे. यामुळे स्थानिक शेतकर्यांचे जीवन बदलणार असल्याचा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
धापेवाडा उपसा सिंचन योजनेअंतर्गत 2 लाख एकर जमीन ओलीताखाली
आमच्या सरकारने गोंदिया जिल्ह्यासाठी धापेवाडा उपसा सिंचन योजनेअंतर्गत एकूण 5 हजार 217 कोटींच्या विकासकामांना तसेच नगर परिषद क्षेत्रातील 205 कोटींच्या विकासकामांना मान्यता दिली. त्यामुळे येथील 2 लाख एकर जमीन ओलीताखाली येणार आहे. पूर्वी विदर्भात निधी दिला जात नव्हता, परंतु आता विदर्भाच्या जनतेच्या आशीर्वादाने त्यांचे सुपुत्र सत्तेत आहेत, यामुळे आता विदर्भाला विक्रमी निधी मिळतो आहे. सिंचनासोबत मागेल त्याला सौर कृषिपंप, सौर कृषि वाहिनी आणि मोफत वीज अशा अनेक योजनांमार्फत हे शेतकर्यांचे सरकार शेतकर्यांच्या हिताचे निर्णय घेत आहे. येथील पुर किंवा तत्सम नैसर्गिक आपत्तीमध्ये सरकार पाठीशी उभे राहिले होते आणि यापुढेही रहील , असा विश्वास ही देवेंद्र फडणवीस यांनी वेळी व्यक्त केला.
यासोबतच आधी धानाच्या बोनसची केवळ आश्वासणे दिली जात होती. परंतु आम्ही शेतकर्यांना आधी 15000 आणि नंतर 20000 धानाचा बोनस दिला. तसेच तिरोड्यातील शेतकर्यांची, हा बोनस 25000 करण्याची मागणी देखील मान्य करून घेण्याचे यावेळी आश्वासन दिल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.
हे ही वाचा