Dasara Melava Uddhav Thackeray Eknath Shinde: यंदा राज्यात पाच दसरा मेळावे; उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदेंच्या भाषणाकडे लक्ष
Dasara Melava Uddhav Thackeray Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मंत्री पंकजा मुंडे, मराठा आंदोलक मनोज जरांगे आज दसरा मेळावा घेणार आहे.
LIVE

Background
Dasara Melava Uddhav Thackeray Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde), मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) आज दसरा मेळावा घेणार आहे. तर यंदा बंजारा समाजाकडूनही दसरा मेळावा घेण्यात येणार आहे. शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोन्ही गट दसरा मेळावे आयोजित करतात. त्याप्रमाणे आज ठाकरेंच्या सेनेचा दसरा मेळावा (Shivsena Dasara Melava) दादर येथील शिवाजी पार्क येथे होणार आहे. य़ावेळी उद्धव ठाकरे काय बोलतात आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणती घोषणा करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोन्ही ठाकरे बंधूंची जवळीक वाढल्यानंतर होणारा हा पारंपरिक दसरा मेळावा आहे.. दोन्ही भावांची जवळीक वाढली मात्र राजकीय युतीही होणार का? यासंदर्भात उद्धव ठाकरे काय भूमिका मांडणार याकडे लक्ष लागलंय. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा हा मुंबईतील नेस्को एग्झिबिशन सेंटर, गोरेगाव येथे होणार आहे. या मेळाव्याची वेळ सायंकाळी 6 वाजता असल्याचे सांगण्यात आले आहे. यंदाचा दसरा शेतकऱ्यांच्या बांधावर, स्थळ बदललंय परंपरा नाही…अशी पोस्ट एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्याच्या ठिकाणाबद्दल माहिती देताना केली आहे. या मेळाव्यातून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे इतर नेते काय घोषणा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याआधी मेळाव्याचं ठिकाणी आझाद मैदान ठरलेलं मात्र पावसामुळे मैदानात चिखल झाल्याने ठिकाण बदलण्यात आलं.
मनोज जरांगे यांनी आंदोलनाची दिशा बदलली ? आता शेतकऱ्यांसाठी लढणार
Choupal - मनोज जरांगे यांनी आंदोलनाची दिशा बदलली ? आता शेतकऱ्यांसाठी लढणार
Ac - नारायणगड येथील मेळाव्यात आज मनोज जरांगे यांनी आपल्या आंदोलनाची दिशा बदलल्याचे दिसून आले.भाषणाच्या सुरुवातीला आधी मनोज जरांगे यांनी आरक्षणाबाबत भाष्य केले.त्यानंतर सध्या बीडसह मराठवाड्यातील बहुतांश भागात अतिवृष्टी आणि पुराने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बाजूने ठामपणे उभे राहणार असल्याचे सांगत त्यांच्या नवीन आंदोलनाची घोषणा केली.दरम्यान मनोज जरांगे यांच्या मेळाव्यानंतर त्यांच्या भाषणाबद्दल आणि नवीन भूमिकेबद्दल समाज बांधवांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी स्वानंद पाटील यांनी....
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल कांग्रेसवाले घाणेरडं बोलतात आणि युबीटीवाले त्यांच्या मांडीवर जाऊन बसतात : उदय सामंत
उदय सामंत
एकनाथ शिंदे साहेबांनी सामाजिक भान ठेवत आझाद मैदानातील मेळावा रद्द केला आणि नेस्को मध्ये केला
विदर्भ, मराठवाडा आणि पूरग्रस्त भागातील लोकांची मदत शिवसैनिकांनी करावी असे निर्देश शिंदे साहेबांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत
शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना पालिकेत अनेक प्रकल्प दिले आहेत
अशात महापालिकेत नागरिक आमच्याच पारड्यात मतं टाकतील
आॅन संजय राऊत
गेले साडे तीन वर्ष घाणेरडी चिखलफेक त्यांनी केली
नापास विद्यार्थी आम्हाला शिकवू शकत नाही
शिवसेनेने कांग्रेसच्या मांडीवर जात बाण नेऊन ठेवला होता
आम्ही तो ओढून आणला आहे
नवीन ते काही बोलत आहेत असं वाटत नाही
शिंदे साहेब काय कोणाची बदनामी बिलो द बेल्ट बोलणार नाही
केलेली सामाजिक कामं आणि विकास कामं समोर ठेवत शिंदे साहेब बोलतील
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल कांग्रेसवाले घाणेरडं बोलतात आणि युबीटीवाले त्यांच्या मांडीवर जाऊन बसतात
राज साहेब ठाकरे कधी तरी उद्धव ठाकरेंना याबद्दल विचारतील तेव्हा काय उत्तर देणार
लोकशाही कोणी एकत्र यायचं आणि नाही यायचं हे नेते ठरवत असतात मात्र काही लोकं उतावळे झाले आहेत
























