एक्स्प्लोर

Dasara Melava 2024: शिंदे, ठाकरे, मुंडे, जरांगे..., आज 4 दसरा मेळावे; 'आव्वाज' कोणाचा घुमणार?; राज्याचं लागलं लक्ष

Dasara Melava 2024: आज गर्दीचा उच्चांक कोण मोडणार, याकडे देखील सर्वांच्या नजरा लागल्या आहे. 

मुंबई: विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं असून आज एकनाथ शिंदे गट (Eknath Shinde), उद्धव ठाकरे गट (Uddhav Thackeray) या दोन पक्षांच्या दसरा मेळाव्यासह बीडमध्ये पंकजा मुंडे (Pankaja Munde)-धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) यांचे स्वतंत्र मेळावे होणार आहे. त्यामुळे आज दसरा मेळाव्यांमध्ये (Dasara Melava 2024) आवाज कोणाचा घुमणार?, याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. 

ठाकरे गटाचे दसरा मेळावा छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर सायंकाळी 5 वाजता, तर शिंदे गटाचा दसरा मेळावा आझाद मैदानावर सायंकाळी 5 वाजता होणार आहे. ठाकरे गटाकडून दीड ते दोन लाख लोक बसतील अशी आसन व्यवस्था करण्यात आली असून शिंदे गटाकडून एक ते दीड लाख लोक बसतील अशी आसन व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे आज गर्दीचा उच्चांक कोण मोडणार, याकडे देखील सर्वांच्या नजरा लागल्या आहे. 

बीडमध्ये दोन दसरा मेळावे- 

बीडमध्ये मुंडे भाऊ-बहिणीचा मेळावा सकाळी 11 च्या आसपास आणि मनोज जरांगेंचा दसरा मेळावा सकाळी 11.30 च्या जवळपास सुरु होणार असल्याची माहिती मिळत आहे.  दरम्यान मनोज जरांगेंचा पहिल्यांदाच दसरा मेळावा होणार आहे. तर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या दसरा मेळाव्यात ओबीसी आंदोलक नेते लक्ष्मण हाके देखील उपस्थित राहणार आहे.  मी येतोय, तुम्हीही या, असं म्हणत लक्ष्मण हाके यांनी सर्वांना या मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. 

मनोज जरांगेंचा पहिला दसरा मेळावा- 

मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात पहिल्यांदाच मराठ्यांचा दसरा मेळावा होत असून त्याची जय्यत तयारी सुरू आहे. बीड जवळील नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा होणार आहे. या दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून भाषणाचे व्यासपीठ तयार झाले आहे. नारायण गडावरील तब्बल 900 एकरवर हा दसरा मेळावा होत असून जवळपास 200 एकरवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली. 10 वैद्यकीय कक्ष उभारण्यात आले असून ज्या सुविधा आयसीयु विभागात दिल्या जातात, त्याच सुविधा या ठिकाणी दिल्या जाणार आहेत. 100 पेक्षा जास्त रुग्णवाहिका तैनात असणार आहेत. येणाऱ्यांची संख्या लक्षात घेता, तब्बल 200 एकरवर पार्किंकची व्यवस्था असणार आहे. मनोज जरांगेंचा दसरा मेळावा दुपारी 1 वाजताच्या सुमारास होणार आहे.  

संबंधित बातमी:

Dasara Melava 2024 Live : उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी, प्रचाराचं रणशिंग फुंकणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amruta Fadnavis : बहिणींसाठी, शहरांच्या विकासासाठी, शेतकऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीस पुन्हा आलेत : अमृता फडणवीस
देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार, अमृता फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या खूप आनंद....
Bhanu Pania : फक्त 20 चेंडूत 110 धावांची बरसात, कोण आहे भानू पनिया? मैदानात चौकार अन् षटकारांचीच आतषबाजी
फक्त 20 चेंडूत 110 धावांची बरसात, कोण आहे भानू पनिया? मैदानात चौकार अन् षटकारांचीच आतषबाजी
IND vs AUS 2nd Test : ॲडलेड कसोटीत टीम इंडियासमोर दुहेरी संकट, खेळपट्टीनंतर हवामान खात्याने वाढली डोकेदुखी
ॲडलेड कसोटीत टीम इंडियासमोर दुहेरी संकट, खेळपट्टीनंतर हवामान खात्याने वाढली डोकेदुखी
'ती' चूक दोघांच्या जीवावर बेतली; पुण्याच्या पवना धरणातील घटना कॅमेऱ्यात कैद, दोन मित्रांचा मृत्यू
'ती' चूक दोघांच्या जीवावर बेतली; पुण्याच्या पवना धरणातील घटना कॅमेऱ्यात कैद, दोन मित्रांचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pavna Lake Youth Drowned : मित्रांना वाटलं मस्ती करतायत, डोळ्यासमोर दोन मित्र बुडाले!ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 05 December 2024Azad Maidan Oath Ceremony : आझाद मैदनावरुन थेट आढावा, लोकांची प्रचंड गर्दी #abpमाझाOath Ceremony Seating Arrangement : कुणाची खुर्ची कुणाच्या शेजारी? कोण पुढच्या रांगेत? कोण मागे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amruta Fadnavis : बहिणींसाठी, शहरांच्या विकासासाठी, शेतकऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीस पुन्हा आलेत : अमृता फडणवीस
देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार, अमृता फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या खूप आनंद....
Bhanu Pania : फक्त 20 चेंडूत 110 धावांची बरसात, कोण आहे भानू पनिया? मैदानात चौकार अन् षटकारांचीच आतषबाजी
फक्त 20 चेंडूत 110 धावांची बरसात, कोण आहे भानू पनिया? मैदानात चौकार अन् षटकारांचीच आतषबाजी
IND vs AUS 2nd Test : ॲडलेड कसोटीत टीम इंडियासमोर दुहेरी संकट, खेळपट्टीनंतर हवामान खात्याने वाढली डोकेदुखी
ॲडलेड कसोटीत टीम इंडियासमोर दुहेरी संकट, खेळपट्टीनंतर हवामान खात्याने वाढली डोकेदुखी
'ती' चूक दोघांच्या जीवावर बेतली; पुण्याच्या पवना धरणातील घटना कॅमेऱ्यात कैद, दोन मित्रांचा मृत्यू
'ती' चूक दोघांच्या जीवावर बेतली; पुण्याच्या पवना धरणातील घटना कॅमेऱ्यात कैद, दोन मित्रांचा मृत्यू
Oath Ceremony Seating Arrangement : महायुतीचा शपथविधी, सलमान - शाहरुखसाठी बाजूबाजूला खुर्ची
Oath Ceremony Seating Arrangement : महायुतीचा शपथविधी, सलमान - शाहरुखसाठी बाजूबाजूला खुर्ची
Priyanka Gandhi Meets Amit Shah : काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी संसद भवनात थेट अमित शाहांच्या भेटीला! नेमक्या कोणत्या कारणासाठी भेट झाली?
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी संसद भवनात थेट अमित शाहांच्या भेटीला! नेमक्या कोणत्या कारणासाठी भेट झाली?
मोदी-शाह ते सलमान-शाहरुख, मुकेश अंबानी ते सचिन तेंडुलकर; मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला कोण-कोण उपस्थित?
मोदी-शाह ते सलमान-शाहरुख, मुकेश अंबानी ते सचिन तेंडुलकर; मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला कोण-कोण उपस्थित?
Eknath Shinde: बाळासाहेबांचा निष्ठावंत सेवक चंपासिंह थापाची शपथविधीपूर्वी मोठी भूमिका, म्हणाले, एकनाथ शिंदेंनी...
बाळासाहेबांचा निष्ठावंत सेवक चंपासिंह थापाची शपथविधीपूर्वी मोठी भूमिका, म्हणाले, एकनाथ शिंदेंनी...
Embed widget