एक्स्प्लोर

Dadar Kabutar Khana: दादर कबुतरखान्यासाठी अडून बसणाऱ्या जैन समुदायाला आता मराठी एकीकरण समिती प्रत्युत्तर देणार, आंदोलनाचा इशारा

Dadar Kabutar Khana: मराठी एकीकरण समितीने जैन समुदायाच्याविरोधात दंड थोपटून मैदानात उतरायचे ठरवले आहे. येत्या बुधवारी दादरमध्ये मराठी एकीकरण समितीकडून आंदोलनाची हाक

Dadar Kabutar Khana: मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर बंद करण्यात आलेल्या दादर कबुतरखान्याच्या मुद्द्यावरुन सध्या वातावरण प्रचंड तापले आहे. यापूर्वी मुंबई महानगरपालिकेने ताडपत्री टाकून दादर कबुतरखाना (Dadar Kabutar Khana) झाकून बंद केला होता. मात्र, 6 ऑगस्टला जैनधर्मीयांनी (Jain Community) अचानक हल्लाबोल करत कबुतरखान्यावरील ही ताडपत्री फाडून टाकली होती. यावेळी दादर (Dadar News) कबुतरखान्याच्या परिसरात जमलेला जैन समुदाय प्रचंड आक्रमक झाला होता. पालिकेने ताडपत्री टाकण्यासाठी वापरलेले बांबू मोडून टाकण्यात आले होते. तसेच जैन समाजातील काही महिला सुतळी आणि दोऱ्या कापण्यासाठी चाकू घेऊन आल्या होत्या. या सगळ्यानंतर रविवारी जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी जहाल भाषा वापरत आम्ही आमच्या धर्मासमोर न्यायालयालाही मानत नाही, असे म्हटले होते. त्यांच्या या धमकीनंतर संताप व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर आता जैन समाजातील काही लोकांच्या या अरेरावीविरुद्ध मराठी एकीकरण समिती मैदानात उतरणार आहे.

मराठी एकीकरण समितीने जैन समुदायाच्या आंदोलनाला प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे. कायदा न मानणारे, पोलिसांना धक्काबुक्की करणारे, शासकीय नुकसान करणारे आणि न्यायालयाच्या आदेशानंतरही कबुतरांना खायला घालणाऱ्या लोकांवर कारवाी झालीच पाहिजे. कबुतरखाना हा कायमचा बंद झाला पाहिजे. त्यासाठी बुधवारी दादरमध्ये आंदोलन करण्याचा इशारा मराठी एकीकरण समितीने दिला आहे. त्यामुळे आता पोलीस मराठी एकीकरण समितीच्या या आंदोलनाला परवानगी देणार का, हे पाहावे लागेल. मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते आंदोलनासाठी रस्त्यावर उतरल्यास मनसे आणि ठाकरे गट यांच्यासारखे राजकीय पक्ष त्यांच्या पाठीशी आपली ताकद उभी करु शकतात. 

Mumbai News: मुंबई महानगरपालिकेने दादरचा कबुतरखाना पुन्हा ताडपत्रीने झाकला

जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी सरकार आणि न्यायालयाला आव्हान दिल्यानंतर पुढील काही तासांतच चक्रं फिरली आणि मुंबई महानगरपालिकेने दादरचा कबुतरखाना पुन्हा एकदा ताडपत्रीने झाकून टाकला. पालिकेने गेल्यावेळीपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने चारही बाजूने ताडपत्री लावून एकही कबुतर आतमध्ये शिरणार नाही, याची व्यवस्था केली आहे.  कबुतरखान्याच्या चारही बाजूंनी गोलाकार बॅरिकेटिंग करण्यात आले आहे. तसेच परिसरात दंगल नियंत्रण पथकासह प्रचंड मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे आता गेल्यावेळप्रमाणे जैन समाजाला याठिकाणी आंदोलन करणे शक्य होणार नाही. जैनधर्मीयांनी आंदोलन करत 6 ऑगस्ट रोजी ताडपत्री हटविण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणावर न्यायालयाने ही ताशेरे ओढले. कबुतरखाना बंद की सुरू याची पुढील सुनावणी १३ ऑगस्ट ला पार पडणार आहे . तोपर्यंत न्यायालयाचा आदेश असल्याने कबुतरखाने बंद ठेवण्यात येणार आहेत. 

आणखी वाचा

दादरच्या कबुतरखान्यावर रात्रीतून पुन्हा ताडपत्री टाकली, चारही बाजूने पोलीस तैनात, दंगल नियंत्रण पथकही हजर

गरज पडली तर शस्त्रंही उचलू, आमच्या धर्माविरोधात जाणार असाल तर न्यायालयाला मानत नाही; जैन मुनींची धमकी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
Embed widget