एक्स्प्लोर

काँग्रेस नेते कैलास गोरंट्यालसह सुरेश वरपूडकर यांचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश

Congress : काँग्रेसच्या गोटातून एका महत्वाची बातमी समोर आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून काँग्रेसला मोठा धक्का देत पक्षात खिंडार पाडल्याचे समोर आले आहे.

जालना : काँग्रेसच्या (Congress) गोटातून एका महत्वाची बातमी समोर आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून (BJP) काँग्रेसला मोठा धक्का देत पक्षात खिंडार पाडल्याचे समोर आले आहे. जालना जिल्ह्यातील जालना मतदारसंघातील काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार कैलास गोरंट्याल (Kailas gorantyal) भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती आहे. भाजपच्या बड्या नेत्याच्या ते संपर्कात असून गेल्या अनेक दिवसांपासून नाराज असलेले गोरंट्याल आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वीच ते भाजपचे कमळ हाती घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. तीन वेळा आमदार राहिलेले काँग्रेस नेते कैलास गोरंट्याल आणि ज्येष्ठ नेते सुरेश वरपूडकर (Suresh Varpudkar) हे उद्या म्हणजेच मंगळवारी (29 जुलै ) भाजपमध्ये दाखल होणार आहे. या दोन्ही नेत्यांचा पक्षप्रवेश मंगळवारी दुपारी 3 वाजता मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार असल्याचे पुढे आले आहे.

प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश

पुढे आलेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर कैलास गोरंट्याल यांनी काँग्रेस नेतृत्वा विरोधात उघड भूमिका घेतली होती. त्यामुळे, लवकरच ते काँग्रेसला (Congress) बाय-बाय करतील, अशी चर्चा मतदारसंघात रंगली होती. मात्र, ते कुठल्या पक्षात जाणार याबाबत गुप्तता होती, अखेर त्यांनीही भाजपात (BJP) जाण्याचा निर्णय घेतल्याचे जवळ जवळ आता निश्चित झाले आहे. या पक्ष प्रवेशामुळे मराठवाड्यात भाजपची संघटनात्मक ताकद वाढवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये मोठी फूट पडण्याचीहि शक्यता आता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.

मराठवाड्यात भाजपची ताकद वाढणार

दरम्यान या पक्षप्रवेशामुळे जालना, नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. भाजपने स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला हा मोठा राजकीय झटका दिल्याचेही बोलले जात आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील राजकारणात घडत असलेली ही मोठी घडामोड असून या मुळे मराठवाड्यात भाजपची ताकद वाढणार आहे. तर याचा कितपत फायदा भाजपला निक निवडणुकांमध्ये होतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तर दुसरीकडे मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेला देखील आव्हान निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेच्या 9 जागांसाठी पुढील आठवड्यात निवडणूक जाहीर होणार; कुणाला किती जागा मिळणार?
विधान परिषदेच्या 9 जागांसाठी पुढील आठवड्यात निवडणूक जाहीर होणार; कुणाला किती जागा मिळणार?
Live Blog Updates: महिला आरक्षण लागू करण्यासाठी आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात
Live Blog Updates: महिला आरक्षण लागू करण्यासाठी आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात
Nari Shakti Vandan Act Women Reservation Bill: महिला आरक्षण लागू करण्यासाठी आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात; 'नारी शक्ती वंदन अधिनियम' विधेयकाची A टू Z माहिती
महिला आरक्षण लागू करण्यासाठी आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात; 'नारी शक्ती वंदन अधिनियम' विधेयकाची A टू Z माहिती
Raj Thackeray: अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..

व्हिडीओ

Sandeep Deshpande On Pratap Sarnaik : मंत्रिपद धोक्यात, प्रताप सरनाईक सारखा कुंभकर्ण जागा झालाय
Anjali Damania On Ashok Kharat : अशोक खरातला कॉल, राजकीय बवाल Special Report
Nashik TCS Issue : 'कॉर्पोरेट जिहाद' नाशकात म्होरक्या मलेशियात? Special Report
Amravati Paratwada Case : बुलडोझर घरावर, राजकारण धर्मावर Special Report
Sunetra Pawar Prachar : काकींचा प्रचार, विलिनीकरणाची किनार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nida Khan Nashik Physical Harassment Case: नाशिकमधील महिला अत्याचार धर्मांतर प्रकरणात मोठा ट्वि्स्ट, निदा खान मुख्य सूत्रधार, हादरवणारी माहिती समोर
नाशिकमधील महिला अत्याचार धर्मांतर प्रकरणात मोठा ट्वि्स्ट, निदा खान मुख्य सूत्रधार, हादरवणारी माहिती समोर
Nari Shakti Vandan Act Women Reservation Bill: महिला आरक्षण लागू करण्यासाठी आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात; 'नारी शक्ती वंदन अधिनियम' विधेयकाची A टू Z माहिती
महिला आरक्षण लागू करण्यासाठी आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात; 'नारी शक्ती वंदन अधिनियम' विधेयकाची A टू Z माहिती
RCB vs LSG :  विराट कोहलीच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर बंगळुरुचा मोठा विजय, रिषभ पंतच्या लखनौला पराभवाचा धक्का, गुणतालिकेत कोण टॉपवर?
बंगळुरुनं घरच्या मैदानावर लखनौला पराभवाचं पाणी पाजलं, रिषभ पंतच्या टीमचा दारुण पराभव
Mumbai Water Cut : मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण, भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
Pooja Sawant On Women Safety: '...तर कोणत्याही स्त्रीला हात लावण्यापूर्वी तो दहावेळा विचार करेल'; मराठी अभिनेत्रीनं बोलून दाखवली कायदे कडक करण्याची गरज, ॲनिमल क्रुएल्टीबाबत म्हणाली...
'...तर कोणत्याही स्त्रीला हात लावण्यापूर्वी तो दहावेळा विचार करेल'; मराठी अभिनेत्रीनं बोलून दाखवली कायदे कडक करण्याची गरज
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
Rohit Sharma: आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
Embed widget