राहुल गांधींच्या हस्ते संविधानाच्या एक लाख प्रती वाटपाला सुरुवात, कुठे पोहोचली भारत जोडो यात्रा?
Bharat Jodo Yatra: काँग्रेसकडून संविधानाच्या एक लाख प्रती वाटण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
Bharat Jodo Yatra: काँग्रेसकडून (congress) संविधानाच्या (Indian Constitution) एक लाख प्रती वाटण्याचा संकल्प करण्यात आला आहे. पक्षाचं म्हणणं आहे की, केंद्रात भाजपाचे (BJP) सरकार आल्यापासून मागील 8 वर्षात लोकशाही व संविधान (Indian Constitution) धोक्यात आले आहे. लोकशाही व संविधानाचे रक्षण व्हावे यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या एस. सी. विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तिअंबिरे यांच्या पुढाकाराने संविधानाच्या एक लाख प्रती वाटण्याचा संकल्प केला असून या अभियानाची सुरूवात राहुल गांधी यांच्या हस्ते आज करण्यात आली. भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) आज 73 वा दिवस आहे. ही यात्रा आता बुलढाणा जिल्ह्यातून पुढे वाढत शेगावहून जळगावच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे.
काँग्रेसने एक निवेदन जारी करत म्हटलं आहे की, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्वश्रेष्ठ संविधान भारताला दिले. या संविधानाच्या अधिन राहून लोकशाही व्यवस्थेचा कारभार देश स्वतंत्र झाल्यापासून सूरु आहे. संविधानाने सर्व जाती धर्मांच्या लोकांचे हक्क अबाधित ठेवले आहेत. विविधतेत एकता ही आपल्या देशाची ओळख कालपर्यंत अबाधित होती. पण मागील 8 वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराचे सरकार केंद्रात आल्यापासून संविधान व लोकशाही मोडीत काढण्याचे काम सुरू आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले हे संविधान अबाधित रहावे व लोकशाहीचे रक्षण व्हावे यासाठी जनजागृती करण्यासठी संविधानाच्या एक लाख प्रती वाटण्याचे अभियान काँग्रेसच्या एस. सी. विभागाने हाती घेतले आहे.
LIVE: #BharatJodoYatra | Shegaon to Jalgaon Jamod | Buldhana | Maharashtra https://t.co/CkX2b2XGrM
— Bharat Jodo (@bharatjodo) November 19, 2022
दरम्यान, आज जलंब येथे दहा वाजता मोठ्या उत्साहात भारत जोडो यात्रेचे स्वागत झाले. येथील शाळेच्या मुलांनी शाळेच्या बाहेर मैदानात स्वागतासाठी मोठी रांग लावली होती. काही ठिकाणी इंदिरा गांधी, महात्मा गांधी, पंडित नेहरू यांची वेशभूषा केलेली मुले इतिहासाची आठवण करून देत होते. अभिरा अभय गोंड या तीन वर्षांच्या मुलगी बालशिवाजी वेशभूषा करून तलवारीसह घोड्यावर बसली होती. बाजूला सहा मावळे होते.
इतर महत्वाच्या बातम्या: