Rahul Gandhi : राहुल गांधी अमेठीतून तर प्रियंका गांधी रायबरेलीतून निवडणुकीच्या रिंगणात? काँग्रेसची घोषणा होण्याची शक्यता
Priyanka Gandhi Raebareli : प्रियंका गांधी या पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता असून रायबरेलीतून त्यांच्या नावाची घोषणा होणार असल्याची चर्चा आहे.
![Rahul Gandhi : राहुल गांधी अमेठीतून तर प्रियंका गांधी रायबरेलीतून निवडणुकीच्या रिंगणात? काँग्रेसची घोषणा होण्याची शक्यता congress announcement rahul gandhi to contest from amethi up and priyanka gandhi from raebareli lok sabha election against bjp marathi news Rahul Gandhi : राहुल गांधी अमेठीतून तर प्रियंका गांधी रायबरेलीतून निवडणुकीच्या रिंगणात? काँग्रेसची घोषणा होण्याची शक्यता](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/03/089e1334fed6121ddfafab934b26c0631672758470878575_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली: काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे अमेठीतून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे तर प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) या रायबरेलीतून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. राहुल गांधी हे केरळमधील वायनाडमधून निवडणूक लढवणार आहेत, सोबतच अमेठी या दुसऱ्या मतदारसंघातूनही ते निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
प्रियंका गांधी पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात?
काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी या रायबरेली लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. रायबरेली मतदारसंघ हा गांधी घराण्याचा पारंपरिक मतदारसंघ असून या आधी त्या ठिकाणी सोनिया गांधी निवडून आल्या होत्या. तब्येतीच्या कारणास्तव सोनिया गांधी यानी यावेळी राज्यसभेवर जाण्यास पसंती दिली. त्यामुळे रायबरेलीतून प्रियंका गांधी यांच्या नावाची चर्चा सुरू होती.
राहुल गांधी दोन मतदारसंघातून लढणार?
काँग्रेसचे नेते राहुल गांधीनी या आधी केरळमधील वायनाड या मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचसोबत ते आता त्यांच्या पारंपरिक मतदारसंघ असलेल्या अमेठीतूनही निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. गेल्या निवडणुकीच्या वेळीही त्यांनी याच दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. पण अमेठीतून त्यांना पराभवाचा धक्का बसला होता. भाजपच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधींचा पराभव केला होता.
आताही अमेठीमध्ये राहुल गांधी विरुद्ध स्मृती इराणी अशीच हायप्रोफाईल लढत होण्याची शक्यता आहे. 2014 सालच्या निवडणुकीत राहुल गांधी यांनी स्मृती इराणींचा अमेठीतून पराभव केला होता. त्यानंतरच्या निवडणुकीत, 2019 साली स्मृती इराणींनी त्याचा बदला घेत राहुल गांधी यांचा पराभव केला होता.
राज बब्बर यांना गुरूग्राममधून उमेदवारी
काँग्रेसने त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर केली असून अभिनेते राज बब्बर यांना गुरुग्राम मतदारसंघातून तर आनंद शर्मा यांना हिमाचल प्रदेशमधील कांगडा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राज बब्बर हे भाजपचे दिग्गज नेते आणि केंद्रीय मंत्री राव इंद्रजित सिंग यांच्याविरोधात निवडणूक लढवणार आहेत.
कांग्रेस अध्यक्ष श्री @kharge की अध्यक्षता में आयोजित 'केंद्रीय चुनाव समिति' की बैठक में लोकसभा चुनाव 2024 के लिए हरियाणा, हिमाचल प्रदेश और महाराष्ट्र के कांग्रेस उम्मीदवारों की लिस्ट। pic.twitter.com/ys7tVzC61y
— Congress (@INCIndia) April 30, 2024
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)