एक्स्प्लोर

Yamini Jadhav : दक्षिण मुंबईत दोन शिवसैनिक भिडणार, ठाकरेंच्या अरविंद सावंतांना आव्हान देणाऱ्या यामिनी जाधव कोण?

Yamini Jadhav Vs Arvind Sawant : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर यामिनी जाधव यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदेंना साथ दिली होती. आता दक्षिण मुंबईतून त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. 

मुंबई : राज्यातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या लढतीपैकी एक असलेल्या दक्षिण मुंबईचा (South Mumbai Lok Sabha Election) तिढा आता सुटला असून महायुतीकडून शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव (Yamini Jadhav) यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामुळे आता यामिनी जाधव विरुद्ध अरविंद सावंत असे एकेकाळचे सहकारी आणि सध्या वेगवगेळ्या पक्षात असलेले दोन शिवसैनिक  एकमेकांना भिडणार आहेत. त्यामुळे दक्षिण मुंबईतील (Dakshin Mumbai) लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मुंबईत 20 मे रोजी मतदान होणार आहे.

दक्षिण मुंबईची जागा शिवसेना शिंदे गटाला जाणार की भाजपला जाणार यावर बरीच चर्चा झाली. या जागेसाठी भाजपचा आग्रह होता. त्यामुळेच भाजपचे राहुल नार्वेकर आणि मंगल प्रभात लोढा यांच्या नावाची चर्चा सुरू होती. त्यातच गेल्या काही दिवसांपासून राहुल नार्वेकरांनी प्रचाराला सुरूवात केल्याने ही जागा भाजपलाच जाणार अशी चर्चा होती. पण आता शिवसेना शिंदे गटाने ही जागा आपल्याकडे ठेवण्यात यश मिळवल्याचं दिसतंय. 

एकेकाळचे ठाकरेंचे विश्वासू आणि आता शिंदे गटात असलेल्या यशवंत जाधव यांच्या पत्नी, यामिनी जाधव यांना दक्षिण मुंबईतून तिकीट मिळालं आहे. महायुतीने दाखवलेला विश्वास सार्थ करू अशी प्रतिक्रिया यामिनी जाधव यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना दिली. 

कोण आहेत यामिनी जाधव? (Who Is Yamini Jadhav)

सध्या शिंदे गटात असलेल्या यामिनी जाधव या भायखळा मतदारसंघाच्या  (Byculla MLA Yamini Jadhav) आमदार आहेत. एकेकाळी ठाकरेंचे विश्वासू अशी ओळख असलेल्या यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या त्या पत्नी आहेत. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव यांच्यावर आरोप केल्यानंतर त्यांची ईडी चौकशी सुरू झाली होती. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर यशवंत जाधव यांनी शिंदेंची साथ देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांच्यामागे असलेला ईडीचा ससेमिरा काही प्रमाणात थांबल्याचं सध्याचं चित्र आहे.  

नगरसेविका ते आमदार असा प्रवास (Byculla Assembly Election Results 2019)

यामिनी जाधव या 2012 साली मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या तिकिटावर नगरसेविका म्हणून निवडून आल्या. त्यांनी महापालिकेत विविध समित्यांवर काम केलं आणि आपली छाप उमटवली. भायखळा विधानसभा मतदारसंघ हा तसा मुस्लिमबहुल मतदारसंघ आहे. 2014 सालच्या निवडणुकीत या ठिकाणाहून एमआयएमच्या वारिस पठाण यांनी बाजी मारली होती. त्यामुळे 2019 सालच्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत ही जागा जिंकायचीच असा चंग बांधलेल्या शिवसेनेने यामिनी जाधव यांना तिकीट दिलं. पक्षाचा विश्वास सार्थ ठरवत यामिनी जाधव यांनी वारिस पठाण यांना पराभूत करत विधानसभेत प्रवेश केला. 

एकनाथ शिंदेंना साथ, गुवाहाटीवरून ठाकरेंवर टीका

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत फुट पडली. त्यावेळी यामिनी जाधव आणि त्यांचे पती यशवंत जाधव यांनी एकनाथ शिंदे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. गुवाहाटीला जाणाऱ्या आमदारांच्या पहिल्या यादीत यामिनी जाधव यांचं नाव होतं. 

यामिनी जाधव यांनी गुवाहाटीतून उद्धव ठाकरेंच्या कार्यशैलीवर टीका केली. आपण आजारी असताना उद्धव ठाकरे वा ठाकरे परिवारातील कुणीही आपली विचारपूर केला नसल्याचा आरोप त्यांनी केला होता. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

BIg Fight West Maharashtra : पश्चिम महाराष्ट्रातील प्रचारानंतरचा विचार, प्रचारानंतर कोणता मु्द्दा गजला?ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 18 November 2024Maharashtra Assembly Update :विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्याBig Fight Vidarbh : प्रचारानंतरचा विचार काय? पश्चिम विदर्भात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
Embed widget