Congress Bharat Jodo Yatra: काँग्रेसचा 'दिल्ली चलो'चा नारा, भारत जोडो यात्रेची केली घोषणा
Press Conference In Many Cities: काँग्रेस 7 सप्टेंबरपासून भारत जोडो यात्रेला सुरुवात करणार आहे. कन्याकुमारी ते काश्मीर या प्रस्तावित 3500 किलोमीटरच्या भारत जोडो यात्रेबाबत काँग्रेस पक्षाने मंगळवारी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.
Press Conference In Many Cities: काँग्रेस 7 सप्टेंबरपासून भारत जोडो यात्रेला सुरुवात करणार आहे. कन्याकुमारी ते काश्मीर या प्रस्तावित 3500 किलोमीटरच्या भारत जोडो यात्रेबाबत काँग्रेस पक्षाने मंगळवारी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. त्याअंतर्गत 29 ऑगस्ट रोजी एकाच वेळी 22 शहरांमध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात येणार आहे. यावेळी महागाईच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला घेरून 'दिल्ली चलो'चा नारा दिला जाणार आहे. यानंतर 05 सप्टेंबर रोजी 32 शहरांमध्ये पत्रकार परिषद आयोजित केली जाणार आहे. ज्यामध्ये काँग्रेस पक्ष आपल्या विविध रणनीती आणि सर्व मुद्द्यांवर आपली बाजू मांडणार आहे.
याआधी सोमवारी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेपूर्वी राहुल गांधी यांनी सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक घेतली. ज्यामध्ये त्यांनी कार्यकर्त्यांना कोणीही त्याच्यासोबत चालू नये, ते यात एकटेच चालणार असल्याचं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी हेही स्पष्ट केले की, द्वेष पसरवणाऱ्यांव्यतिरिक्त भारत जोडो यात्रेत सर्वांचे स्वागत आहे. यानंतर मंगळवारी काँग्रेस पक्षाने आता यात्रेसंदर्भात होणाऱ्या पत्रकार परिषदेला दुजोरा दिला आहे. 29 ऑगस्ट रोजी काँग्रेसचे वरिष्ठ नेते एकाच वेळी 22 शहरांमध्ये पत्रकार परिषद घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ज्यामध्ये महागाईच्या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याची काँग्रेसची योजना आहे. यासोबतच दिल्ली चलोचा नाराही यावेळी देण्यात येणार आहे. तसेच 5 सप्टेंबर रोजी 32 शहरांमध्ये एकाच वेळी पत्रकार परिषद आयोजित केली जाणार आहे.
सरकारविरोधात काँग्रेसची मोठी मोहीम
काँग्रेस पक्षाने कन्याकुमारी ते काश्मीर अशी सुमारे 3500 किमीची ‘भारत जोडो यात्रा’ जाहीर केली होती. ज्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. यापूर्वी ही यात्रा 2 ऑक्टोबरपासून सुरू होणार होती. ती आता 7 सप्टेंबर रोजी होणार आहे. सुमारे 5 महिने चालणारा हा प्रवास 14 राज्यांमधून जाणार आहे. राहुल गांधींचा हा दौरा म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीचा मोठा जनसंपर्क अभियान आहे. या दौऱ्यात राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या धोरणांवरून लक्ष्य करतील. राहुल गांधी आणि काँग्रेस या दोघांच्याही भविष्यासाठी ही यात्रा अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे पक्ष पूर्ण ताकद पणाला लावणार आहे. विशेष म्हणजे सामाजिक कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या जवळ आणण्याच्या मोहिमेच्या केंद्रस्थानी योगेंद्र यादव आहेत. ज्यांनी एकेकाळी यूपीए सरकारच्या काळात काँग्रेसला कडाडून विरोध केला होता.
इतर महत्वाच्या बातम्या:
Indigo Flight: रन वेवर इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड, नौदलाच्या मदतीने प्रवाशांची सुटका
BJP MLA Arrested : भाजप आमदार टी. राजांना दुहेरी धक्का, आधी अटक आता पक्षातून निलंबन