एक्स्प्लोर

मुंबई, ठाण्यातील सीएनजी तुटवड्याचा प्रश्न गंभीर, मुख्यमंत्र्यांनी सत्कार थांबवून प्रश्नांकडे लक्ष द्यावे: अजित पवार

Ajit Pawar On Eknath Shinde: मुंबई, ठाण्यात दोन दिवसांपासून सुरु असलेली सीएनजीचा तुटवड्याची समस्या राज्य सरकारने गांभीर्यानं घ्यावी आणि नागरिकांचा त्रास तात्काळ थांबवावा, असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे.

Ajit Pawar On Eknath Shinde: मुंबई, ठाण्यात दोन दिवसांपासून सुरु असलेली सीएनजीचा तुटवड्याची समस्या राज्य सरकारने गांभीर्यानं घ्यावी आणि नागरिकांचा त्रास तात्काळ थांबवावा, असं आवाहन विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केलं आहे.

मुंबई, ठाण्यातल्या पेट्रोलपंपावर रिक्शा, टेम्पो, कार आदी वाहनचालकांना सीएनजी भरण्यासाठी कित्येक तास अधिक वेळ रांगेत थांबावं लागत आहे. त्यातून अनेकांचा रोजगार बुडत आहे. बहुतांश पेट्रोलपंपांवरचा सीएनजी साठा संपला आहे. जिथं साठा आहे तिथं कमी दाबानं पुरवठा होत आहे, स्वत:च्या ठाणे शहरातील ही समस्या सोडवण्यात मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे सपशेल अपयशी ठरले असल्याची टीकाही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांना सूत्रे हाती घेऊन दीड महिना झाला आहे, त्यांनी आतातरी स्वत:चे स्‌वागत, सत्काराचे कार्यक्रम थांबवावेत आणि राज्यातल्या जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे, असा टोलाही अजित पवार यांनी लगावला आहे. पेट्रोल, डिझेलसह सीएनजीच्या दरात सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे आधीच नागरिक त्रस्त असताना सीएनजीचा तुटवड्यामुळे रिक्शा, टॅक्सी, टेम्पो आदी प्रवासी वाहनचालकांचा रोजगार बुडत आहे, याकडे राज्य सरकारने गांभीर्यान बघावं. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्धापनदिन साजरा होत असताना मुंबई, ठाण्यातील सीएनजी टंचाई आणि खड्यांमुळे प्रवाशांचे जात असलेले बळी हे राज्य सरकारसाठी लाजीरवाणी बाब असल्याचेही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटले आहे.

शिंदे आणि फडणवीस या दोघांचा 'लवकरच' हा शब्द आवडीचा झाला आहे: अजित पवार 

तत्पूर्वी पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत असताना अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं होतं. ते म्हणाले होते की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांचा 'लवकरच' हा शब्द आवडीचा झाला आहे. त्यांना मंत्रिमंडळाबाबत कधीही विचारा ते लवकरच असंच उत्तर देत होते आता खातेवाटपाबाबत विचारलं तरी तेच उत्तर देत आहेत. अधिवेशनात संबंधित खात्याच्या मंत्र्यांना सही करावी लागते. त्यामुळे त्यांनी अधिवेशनापुर्वी खातेवाटप केलं पाहिजे.  स्वातंत्र्य दिनाला प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री ध्वजारोहण करतात. मात्र यंदा पालकमंत्रीच नाहीत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना पालकमंत्री नाही अशी अवस्था निर्माण झाली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या: 

jalgaon : माझा तिसरा डोळा उघडला तर...; गुलाबराव पाटलांचा विरोधकांना इशारा
काहींना शिवसेना उघड्यावर पडली आहे असं वाटतं, उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Prithviraj Chavan : कराड दक्षिण मतदारसंघात 58 हजार दुबार नावं, निवडणुकीपूर्वी नावं काढली असती तर कदाचित निकाल वेगळा असता: पृथ्वीराज चव्हाण
कराड दक्षिण मतदारसंघात 58 हजार दुबार नावं, निवडणुकीपूर्वी लेखी निवेदन दिलेलं पण... : पृथ्वीराज चव्हाण
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Embed widget