एक्स्प्लोर

Konkan Sea Bridge: विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी कोकणातील 7 पूलांचे भूमिपूजन, 8000 कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

Konkan creek bridges: रेवस- कांरजा भागातील धरमतर खाडी वरील पुल. या पुलाची लांबी 10.20 किमी असेल. या पुलासाठी 3057 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

मुंबई: सायन -पनवेल महामार्गावरील ठाणे खाडी पुल क्र. 3 च्या मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या उत्तर वाहिनी मार्गिकेचे उद्घाटन व रेवस ( रायगड ) ते रेडी (सिंधुदुर्ग) या सागरी महामार्गावरील 7 खाडी पुलांच्या कामाचे भूमिपूजन  13 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 11 वा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे होणार आहे.

सदर कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री अजित पवार हे मुख्य अतिथी तर सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम ), मंत्री दादाजी भुसे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. उद्‌घाटनानंतर ठाणे खाडी पुलाची मुंबईहून पुण्याला जाणारी उत्तर वाहिनी वाहतुकीसाठी सोमवारपासून सुरु होईल.

प्रकल्पांची माहिती 
 
1)सायन पनवेल महामार्गावरील ठाणे खाडी पुल क्र.3
प्रकल्पामधील कामाचा वाव:

प्रत्येकी 3 मार्गिकांचे 2 पुल बांधणे . (मुंबईहुन पुण्याकडे जाणाऱ्या उत्तर वाहिनीचे काम पूर्ण व पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या दक्षिण वाहिनीचे काम प्रगतीपथावर ) 
* प्रकल्पाची एकूण किंमत : रु. 559 कोटी.
* पुलाची लांबी : 3180 मी. ( पोच रस्त्यासह ) 
* सद्यास्थितीत उत्तर वाहिनी पुलाचे काम पूर्ण करुन ती वाहतुकीसाठी खुली करण्यात येत आहे. पुण्याहून मुंबईकडे जाणा-या दक्षिण वाहिनीचे काम ८० % पूर्ण झाले आहे
* रेवस ते रेडी (सिंधुदुर्ग) सागरी महामार्गाची एकूण लांबी : 498 किमी.
* पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा महामार्ग, कोकण किनारपट्टीवरील सर्व सागरी किनाऱ्यांना कॉलिफोर्नियाच्या धर्तीवर गतिमान महामार्गाने जोडणारा प्रकल्प.
* सागरी महामार्गावरील पुढील सात पुलांचे भूमिपूजन होत आहे.
* सर्व 7 पुलांची एकूण लांबी 26.70 किमी आणि एकूण प्रशासकीय मान्यता रु. 7851 कोटी इतकी आहे.

1)रेवस- कांरजा भागातील धरमतर खाडी वरील पुल 
* एकूण लांबी : 10.20 किमी.
* प्रशासकीय मान्यता : रु. 3057 कोटी
* पुलाचा प्रकार : स्टिल ब्रिज (लोखंडी पुल)
* कामाची मुदत : 3 वर्ष 

2)रेवदांडा- साळाव भागातील कुंडलिका खाडी वरील पुल:
* एकूण लांबी : 3.82 कि मी 
* प्रशासकीय मान्यता रक्कम : 1736 कोटी
* पुलाचा प्रकार : केबल स्टे
* कामाची मुदत : 3 वर्ष

3) दिघी आगरदांडा भागातील आगरदांडा खाडी वरील पुल:
* एकूण लांबी : 4.31 किमी.
* प्रशासकीय मान्यता रक्कम : 1315 कोटी.
* पुलाचा प्रकार : केबल स्टे 
* कामाची मुदत : 3 वर्ष

4) बागमांडला वेश्वी भागातील बाणकोट खाडीवरील पुल :
* एकूण लांबी : 1.711 किमी.
* प्रशासकीय मान्यता रक्कम : रु. 408 कोटी
* पुलाचा प्रकार : केबल स्टे
* कामाची मुदत : 3 वर्ष

5) केळशी भागातील केळशी खाडीवरील पुल :
* एकूण लांबी : 670 मी.
* प्रशासकीय मान्यता रक्कम : रु. 148 कोटी
* पुलाचा प्रकार: बॉक्स गर्डर
* कामाची मुदत : 3 वर्ष

6) जयगड खाडीवरील पुल:
* एकूण लांबी : 4.40 किमी.
* प्रशासकीय मान्यता रक्कम : रु. 930 कोटी
* पुलाचा प्रकार : केबल स्टे
* कामाची मुदत : 3 वर्ष 

7) कुणकेश्वर येथील पुलाचे बांधकाम 
* एकूण लांबी : 1580 मी.
* प्रशासकीय मान्यता रक्कम : रु. 257 कोटी
* पुलाचा प्रकार :  केबल स्टे 

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे

Read More

महत्त्वाच्या बातम्या

जयकुमार गोरे कॉप्या करुन पास झालेले मंत्री, सुषमा अंधारेंनी शेलक्या शब्दात घेतला समाचार, आरोप प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापलं
जयकुमार गोरे कॉप्या करुन पास झालेले मंत्री, सुषमा अंधारेंनी शेलक्या शब्दात घेतला समाचार, आरोप प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापलं
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
खासदार ओमराजेंच्या निवासस्थानी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, मंत्री प्रताप सरनाईक आल्यानंतर घडली घटना, वादाचं नेमकं कारण काय?
खासदार ओमराजेंच्या निवासस्थानी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, मंत्री प्रताप सरनाईक आल्यानंतर घडली घटना, वादाचं नेमकं कारण काय?

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget