एक्स्प्लोर

Eknath Shinde: राजन विचारे पैसे द्यायचा नाही ना वडापाव खाऊ घालायचा, पण माझ्या सांगण्यावर कार्यकर्ते काम करायचे: एकनाथ शिंदे

Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खूप कामं केली. अमित शाह मला स्वत: बोलले, मी बंद दरवाज्याआड काही बोलत नाही, सगळं समोरासमोर बोलतो. पण उद्धव ठाकरेंना फक्त मुख्यमंत्री व्हायचे होते.

ठाणे: आजपर्यंत ठाणे लोकसभा मतदारसंघात राजन विचारे हा सामान्य कार्यकर्त्यांमुळे निवडून यायचा. यामध्ये राजन विचारेंचं कर्तृत्व काय होतं? खासदारकीला मोदी साहेबांच्या नावावर तुम्हाला मतं मिळाली, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ते सोमवारी ठाण्यातील महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारसभेत बोलत होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे उमेदवार आणि विद्यमान खासदार राजन विचारे यांच्यावर टीकास्त्र डागले.

निवडणुकीच्या काळात राजन विचारे कार्यकर्त्यांना पैसे द्यायचा नाही ना वडापाव खाऊ घालायचा. तरीही मी सांगायचो म्हणून सगळे काम करायचे. आता राजनचा सीझन संपला, नरेशचा विजय आता पक्का आहे. पण संजय केळकरांची विनंती आहे की, नरेश तुला थोडं बदलावं लागेल, असे शिंदे यांनी म्हटले. ज्यांना तिकीट मिळालं नाही त्यांनी चिंता करु नका. मला काही जणांना तिकडे पाठवायचे आहे, काहीजणांना इकडे ठेवायचे आहे, असेही शिंदे यांनी सांगितले. 

एकनाथ शिंदेंचा नगरसेवकांना इशारा

या सभेत एकनाथ शिंदे यांनी आपल्या नगरसेवकांना आणि कार्यकर्त्यांना एक महत्त्वाचा इशारा आणि काही सूचना दिल्या. 20 तारखेपर्यंत कोणीही सुट्टी घेऊ नका. मोदीजींनी एकही सुट्टी घेतली नाही. एकनाथ शिंदेही एक दिवसही सुट्टी घेत नाही. घराघरात जा आणि लोकांना मतदान करायला सांगा. सकाळी सकाळी जाऊन लोकांना भेटा. सुट्टीत गावी जाणाऱ्या लोकांना मतदान करायला सांगा. मतदार बाहेर गेले असतील तर त्यांना इकडे आणण्याची प्रक्रिया आपण करु. नगरसेवकांची ही ट्रायल निवडणूक आहे. काम केलं तर तिकीट नाहीतर मग?, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले. 

उद्धव ठाकरे मला आनंद दिघेंवर सिनेमा काढून देत नव्हते: एकनाथ शिंदे

आनंद दिघे यांचे निधन झाल्यानंतर मी उद्धव ठाकरे यांना भेटायला गेलो तेव्हा त्यांचा पहिला प्रश्न होता की, दिघे यांची प्रॉपर्टी कुठे कुठे आहे? ते ऐकून मला वाटलं की, आपण चुकीच्या जागी आलो. उद्धव ठाकरे मला दिघे साहेबांचा सिनेमाही काढून देत नव्हते. बाळासाहेब ठाकरे यांचा सिनेमा निघाल्यानंतर दिघे साहेबांचा सिनेमा काढला म्हणून वेळ लागला. त्यातही अर्धा सिनेमा पाहून उद्धव ठाकरे निघून गेले. आता पार्ट २ येतोय, आता कळेल जे काय खरं खरं आहे ते या सिनेमामध्ये दिसेल, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

आणखी वाचा

नरेश म्हस्के यांच्याविरोधात भाजप कार्यकर्त्यांचे राजीनामे, ठाण्याच्या जागावाटपावरून भाजप कार्यकर्त्याचे नाराजीनाट्य

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Bajrang Sonawane : माझ्या मुलाचा हात असेल तर स्वतः पोलीस ठाण्यात घेऊन येतो; खा. बजरंग सोनवणेंची भूमिका, पोलीस महासंचालकांच्या निर्णयावर शंका
माझ्या मुलाचा हात असेल तर स्वतः पोलीस ठाण्यात घेऊन येतो; खा. बजरंग सोनवणेंची भूमिका, पोलीस महासंचालकांच्या निर्णयावर शंका
Bharati Pawar : आता नव्या उमेदीनं काम करता येईल, युवकांच्या प्रश्नांसाठी मोठा आग्रह असेल, राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड होताच भारती पवार यांची पहिली प्रतिक्रिया
आता नव्या उमेदीनं काम करता येईल, युवकांच्या प्रश्नांसाठी मोठा आग्रह असेल : भारती पवार

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; 108 बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; 108 बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
Embed widget