एक्स्प्लोर

मोठी बातमी : तुमच्या मनात काहीही असेल, पण कुणाचाही बाप काढणं योग्य नाही, मुख्यमंत्र्यांनी नितेश राणेंना खडसावलं!

नितेश राणेंच्या वक्तव्याचे पडसाद मंत्रिमंडळ बैठकीत पाहायला मिळाले. आमचा बाप बाळासाहेब ठाकरे आहेत, तुमचा कोण?, असा सवाल शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत केला

मुंबई : भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन मुख्यमंत्र्‍यांना अडचणीत आणत असल्याचं वारंवार दिसून येतं. यापूर्वी, सातत्याने धार्मिक तेढ निर्माण होणारी वक्तव्य केल्यामुळे, तसेच नागपूर येथील हिंसाचारानंतर मुख्यमंत्र्‍यांनी नितेश राणेंना (Nitesh Rane) समज दिली होती. त्यानंतर, आता महायुतीत तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य नितेश राणेंनी केल्याने पुन्हा एकदा मुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नितेश राणेंना खडसावलं आहे. धाराशिव येथील संवाद मेळाव्यात भाषण करताना, नितेश राणेंनी तेथील स्थानिक शिवसेना नेत्यांना उद्देशून बोलताना भाजपचा मुख्यमंत्री सगळ्यांचा बाप बसलेला आहे, असे वक्तव्य केलं होतं. त्यानंतर, त्यांच्यावर शिवसेना (Shivsena) नेते व महाविकास आघाडीतील नेत्यांकडूनही टीका झाली. तर, मंत्रिमंडळ बैठकीतही आज तो विषय निघाला, तेव्हा मुख्यमंत्र्‍यांनी राणेंना समज दिली.  

नितेश राणेंच्या वक्तव्याचे पडसाद मंत्रिमंडळ बैठकीत पाहायला मिळाले. आमचा बाप बाळासाहेब ठाकरे आहेत, तुमचा कोण?, असा सवाल शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत केला. त्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नितेश राणे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. या प्रकारचे बोलणे टाळले पाहिजे, असा सल्लाही देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणेंना दिला. तसेच, कुणाचाही बाप काढणं योग्य नाही, संबंधित मंत्र्यांशी मी बोललो, ते म्हणाले माझा बोलण्याचा तसा अर्थ नव्हता, पण मी त्यांना सांगितलं, तुमच्या मनात जो काही अर्थ असेल त्यापेक्षा जे परसेप्शन जातं ते राजकारणात महत्त्वाचं असतं, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली. 

नितेश राणे नेमकं काय म्हणाले?

धाराशिव जिल्हा नियोजन समितीमधील निधीवाटपाच्या स्थगितीवर बोलताना नितेश राणे यांनी घटक पक्षांना गर्भित इशारा दिला. कुणी कितीही ताकद दाखवली, कसेही नाचलं तरी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री बसलाय हे लक्षात ठेवा असा दमच नितेश राणेंनी दिला होता. सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री बसलाय सगळ्यांनी लक्षात ठेवा, अशी धमकीच नितेश राणेंनी स्थानिक शिवसेनेच्या नेत्यांना दिली. कुणी कितीही ताकद दाखवली , कोणीही कसेही नाचले तरी देशात भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्याचं लक्षात ठेवा, असेही नितेश राणे म्हणाले होते. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री असले तरी धाराशिवच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाहीत. म्हणूनच, जिल्हा नियोजन समितीच्या कामांना स्थगिती मिळाल्याचं नितेश राणेंनी म्हटलं होतं.

हेही वाचा

देशी दारु 80, महाराष्ट्र मेड दारु 148, राज्य मंत्रिमंडळाकडून उत्पादन शुल्कात वाढ, मद्यांच्या किंमती किती?

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगे बिनडोक माणूस, तेली आणि ओबीसी समाज रस्तावर उतरणार, बावनकुळेंवरील टीकेनंतर भाजप नेत्याचा इशारा
मनोज जरांगे बिनडोक माणूस, तेली आणि ओबीसी समाज रस्तावर उतरणार, बावनकुळेंवरील टीकेनंतर भाजप नेत्याचा इशारा
आआथातू अरअरअर... करत जरांगेंनी बाहुबलीमधील कल्की स्टाईलने उडवली बावनकुळेंची खिल्ली, महसूलमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया समोर  
आआथातू अरअरअर... करत जरांगेंनी बाहुबलीमधील कल्की स्टाईलने उडवली बावनकुळेंची खिल्ली, महसूलमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया समोर  
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
संजय राऊत नोटा मोजायला गेले होते का? तुमच्याकडं फोटो पुरावा आहे का? राऊतांच्या आरोपावर रामदास कदमांचा पलटवार
संजय राऊत नोटा मोजायला गेले होते का? तुमच्याकडं फोटो पुरावा आहे का? राऊतांच्या आरोपावर रामदास कदमांचा पलटवार

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Embed widget