एक्स्प्लोर

Raj Thackeray meets Devendra Fadnavis: महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठ्या फँटसीचा फडणवीसांमुळे विचका, शिवसेना-मनसे युतीचं फुल उमलण्यापूर्वीच अलगद खुडलं?

Raj Thackeray & Devendra Fadnavis: ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा, मात्र देवेंद्र फडणवीसांनी गेम फिरवला, राज ठाकरेंसोबत ताज लँड्स हॉटेलमध्ये भेट. फडणवीस राज ठाकरेंची समजूत काढणार?

Uddhav Thackeray & Raj Thackeray Alliance: गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येणार, अशा जोरदार चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु होत्या. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या एका खेळीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील या सर्वात मोठ्या फँटसीचा विचका होण्याची शक्यता आहे. कारण ठाकरे गट आणि मनसे (MNS) यांच्यातील युतीसाठी चांगली राजकीय वातावरणनिर्मिती  झाली असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली आहे. मुंबईच्या वांद्रे परिसरातील ताज लँडस एन्ड या पंचतारांकित हॉटेलमध्ये राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. गेल्या अर्ध्या तासापासून या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरु आहे. त्यामुळे ही भेट म्हणजे ठाकरे गट आणि मनसे यांच्याती युतीला कायमचा ब्रेक लावणारी ठरणार का, याकडे सर्वांच लक्ष लागले आहे.

विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या कलानगर येथील मातोश्री या निवासस्थानापासून काही अंतरावरच राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट पार पडली. कलानगर ते ताज लँडस एन्ड या हॉटेलपर्यंतेच अंतर जेमतेम साडेसहा किलोमीटर इतके आहे. गेल्या काही दिवसांपासून ग्राऊंड लेव्हलला ठाकरे गट आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलनाचे अनेक प्रसंग पाहायला मिळाले होते. दोन्ही पक्षांचे प्रमुख नेतेही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याविषयी सकारात्मक बोलताना दिसत होते. त्यामुळे ठाकरे गट आणि मनसे एकत्र येण्याची शक्यता कधी नव्हे इतकी वाढली होती. त्यामुळे आता मनसे-ठाकरे गटाची युती होणारच या आनंदात दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आणि नेते मश्गुल होते. हे सर्वजण गाफील असताना चाणाक्ष देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगले राजकीय संबंध निर्माण झाले आहेत. गेल्या काही काळात या दोन्ही नेत्यांच्या अनेक भेटीगाठी झाल्या आहेत. मात्र, राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी हातमिळवणी केली असती तर मुंबईतील राजकारणात मोठे बदल झाले असते. या दोन्ही नेत्यांना मानणारा मोठा वर्ग मुंबई, नाशिक, ठाणे या शहरी भागांमध्ये आहे. या एकत्रित ताकदीचा परिणाम आगामी महानगरपालिका निवडणुकीवर होऊ शकतो. ही गोष्ट ओळखूनच देवेंद्र फडणवीस यांनी आता राज ठाकरे यांना आपल्या बाजूने वळवण्याचे प्रयत्न सुरु केल्याची चर्चा आहे.

आणखी वाचा

ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा, मात्र देवेंद्र फडणवीसांनी गेम फिरवला, राज ठाकरेंसोबत ताज लँड्स हॉटेलमध्ये भेट!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
NCP: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं म्हणजे बिर्याणीत गुळवणी मिसळण्यासारखं; दादांना सत्तेतून बाहेर यावे लागेल, शरद पवारांच्या आमदाराचा एकत्र येण्याला विरोध
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं म्हणजे बिर्याणीत गुळवणी मिसळण्यासारखं; दादांना सत्तेतून बाहेर यावे लागेल, शरद पवारांच्या आमदाराचा एकत्र येण्याला विरोध
Devendra Fadnavis Maharashtra Jobs: दावोसमध्ये महाराष्ट्राला गुंतवणुकीचं घबाड गवसलं, 15 लाख नोकऱ्या मिळणार, पहिल्याच दिवशी मोठे करार
दावोसमध्ये महाराष्ट्राला गुंतवणुकीचं घबाड गवसलं, 15 लाख नोकऱ्या मिळणार, पहिल्याच दिवशी मोठे करार
Eknath Shinde: मुंबईचं महापौरपद मिळालं नाही तर 'या' दोन महानगरपालिकांमध्ये शिंदे सेनेकडून भाजपला शह देण्याच्या हालचाली
मुंबईचं महापौरपद मिळालं नाही तर 'या' दोन महानगरपालिकांमध्ये शिंदे सेनेकडून भाजपला शह देण्याच्या हालचाली

व्हिडीओ

KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
NCP: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं म्हणजे बिर्याणीत गुळवणी मिसळण्यासारखं; दादांना सत्तेतून बाहेर यावे लागेल, शरद पवारांच्या आमदाराचा एकत्र येण्याला विरोध
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं म्हणजे बिर्याणीत गुळवणी मिसळण्यासारखं; दादांना सत्तेतून बाहेर यावे लागेल, शरद पवारांच्या आमदाराचा एकत्र येण्याला विरोध
Devendra Fadnavis Maharashtra Jobs: दावोसमध्ये महाराष्ट्राला गुंतवणुकीचं घबाड गवसलं, 15 लाख नोकऱ्या मिळणार, पहिल्याच दिवशी मोठे करार
दावोसमध्ये महाराष्ट्राला गुंतवणुकीचं घबाड गवसलं, 15 लाख नोकऱ्या मिळणार, पहिल्याच दिवशी मोठे करार
Eknath Shinde: मुंबईचं महापौरपद मिळालं नाही तर 'या' दोन महानगरपालिकांमध्ये शिंदे सेनेकडून भाजपला शह देण्याच्या हालचाली
मुंबईचं महापौरपद मिळालं नाही तर 'या' दोन महानगरपालिकांमध्ये शिंदे सेनेकडून भाजपला शह देण्याच्या हालचाली
Avinash Jadhav: 'भाजप जिंकत नाही, तर तिथले पारंपारिक उमेदवार जिंकतायत', भाजप फक्त स्टॅम्प मारतेय; मनसे नेते अविनाश जाधवांचा भाजपवर हल्लाबोल
'भाजप जिंकत नाही, तर तिथले पारंपारिक उमेदवार जिंकतायत', भाजप फक्त स्टॅम्प मारतेय; मनसे नेते अविनाश जाधवांचा भाजपवर हल्लाबोल
Mohit Kamboj on Raj Thackeray : राज ठाकरे मर्द माणूस, आमचे संबंध खूप चांगले, मोहित कंबोज यांनी केलं कौतुक
राज ठाकरे मर्द माणूस, आमचे संबंध खूप चांगले, मोहित कंबोज यांनी केलं कौतुक
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
BMC Election 2026 Mumbai Mayor: मुंबईत भाजपचा महापौर बसण्याचा मुहूर्त ठरला, दिल्लीतून महत्त्वाची अपडेट
मुंबईत भाजपचा महापौर बसण्याचा मुहूर्त ठरला, दिल्लीतून महत्त्वाची अपडेट
Embed widget