एक्स्प्लोर

Eknath Shinde & Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा एकनाथ शिंदेंना पुन्हा धक्का, आणखी एक निर्णय रद्द

Eknath Shinde & Devendra Fadnavis: एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील अंतर्गत संघर्ष वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. फडणवीस शिंदेंच्या काळातील अनेक निर्णय फिरवत आहेत.

Eknath Shinde & Devendra Fadnavis: एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात सरकारने घेतलेला आणखी एक निर्णय देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारकडून रद्द करण्यात आला आहे. बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्या प्रहार जनशक्ती कार्यालयासाठी एकनाथ शिंदे यांनी जनता दल सेक्युलर पक्षाची (JDU) मंत्रालयाजवळ असलेल्या कार्यालयाची जागा कमी करून प्रहार जनशक्ती कार्यालयाला उपलब्ध करून दिली होती. मंत्रालयाजवळ जीवन बिमा मार्ग येथे 909  चौ फूट जागा जनता दल सेक्युलर पक्षासाठी राज्य सरकारकडून देण्यात आली होती. त्यातील केवळ 200 चौरस फूट जागा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सरकारने जनता दल सेक्युलर पक्षासाठी ठेवून बाकी 700 चौरस फूट जागा प्रहार जनशक्ती कार्यालयाला उपलब्ध करून दिली होती. मात्र, आता बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारकडून (Devendra Fadnavis) या निर्णयात बदल करण्यात आला आहे. 

देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात मात्र एकनाथ शिंदे यांचा निर्णय बदलण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड करुन महायुतीसोबत जाणाऱ्या एकनाथ शिंदे यांना साथ देणाऱ्या बच्चू कडू यांना दणका देण्यात आला आहे. तर बिहारमध्ये भाजपसोबत मित्र पक्ष म्हणून राहिलेल्या जनता दल सेक्युलरला पुन्हा संपूर्ण जागा देण्यात आली आहे. यावरुन आता महायुतीत अंतर्गत तणाव निर्माण होण्याची चिन्हं दिसत आहेत. 

Devendra Fadnavis: शिंदे सरकारच्या काळातील योजना बंद झाल्याच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले...

गेल्या काही दिवसांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात सुरु केलेल्या अनेक योजना नव्या सरकारकडून बंद करण्यात आल्याची ओरड सुरु आहे. यामध्ये शिवभोजन थाळी, आनंदाचा शिधा यासारख्या योजनांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली बाजू स्पष्ट केली आहे. त्यांनी म्हटले की, कुठल्याही योजना बंद करण्याचा आमचा विचार नाही, सर्व योजना आम्ही चालवणार आहोत.  नैसर्गिक आपत्तीच्या संकटामुळे एक मोठा भार राज्यावर पडला आहे. मात्र तरीही आम्ही कुठलीही योजना थांबवलेली नाही. फ्लॅगशिप योजनांपैकी कुठलीही योजना बंद होणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Eknath Shinde: आनंदाच्या शिधा'नंतर एकनाथ शिंदेंची आणखी एक योजना बंद?

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री असताना सुरू केलेली 'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजना'सुद्धा बंद (CM Majhi Shala, Sundar Shala Scheme) करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. यापूर्वी शिक्षण विभागातील स्वच्छता मॉनिटर, एक राज्य एक गणवेश, पुस्तकाला वह्यांची पान हे निर्णय सुद्धा मागे घेण्यात आले होते. एकाच शैक्षणिक वर्षात राबविण्यात आलेली ही योजना नोव्हेंबर उजाडला तरी राबवण्यात आलेली नाही.  त्यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सुरू करण्यात आलेल्या आनंदाच्या शिधा या योजनेनंतर शिक्षण विभागातील माझी शाळा सुंदर शाळा ही योजना सध्या बंद करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

राज्यातील शाळांचा सर्वांगीण विकास करणे, त्यांचे आधुनिकीकरण आणि सौंदर्यीकरण करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा ही योजना 5 डिसेंबर 2023 रोजी सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत 2023 शैक्षणिक वर्षात राज्यातील शाळांमध्ये स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते. राज्य, जिल्हा आणि तालुकास्तरावर स्पर्धा घेण्यात आल्या. लाखो रुपयांची पारितोषिके देण्यात आली होती. मात्र, आता फडणवीस सरकारने आर्थिक चणचण असल्याचे कारण पुढे करत या योजनांसाठीची निधीपुरवठा बंद केला आहे.

आणखी वाचा

एकनाथ शिंदेंच्या 3 लोकप्रिय योजनांना मुख्यमंत्री फडणवीसांचा ब्रेक? 'आनंदाचा शिधा', 'शिवभोजन थाळी' बंद होणार

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगे बिनडोक माणूस, तेली आणि ओबीसी समाज रस्तावर उतरणार, बावनकुळेंवरील टीकेनंतर भाजप नेत्याचा इशारा
मनोज जरांगे बिनडोक माणूस, तेली आणि ओबीसी समाज रस्तावर उतरणार, बावनकुळेंवरील टीकेनंतर भाजप नेत्याचा इशारा
आआथातू अरअरअर... करत जरांगेंनी बाहुबलीमधील कल्की स्टाईलने उडवली बावनकुळेंची खिल्ली, महसूलमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया समोर  
आआथातू अरअरअर... करत जरांगेंनी बाहुबलीमधील कल्की स्टाईलने उडवली बावनकुळेंची खिल्ली, महसूलमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया समोर  
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
संजय राऊत नोटा मोजायला गेले होते का? तुमच्याकडं फोटो पुरावा आहे का? राऊतांच्या आरोपावर रामदास कदमांचा पलटवार
संजय राऊत नोटा मोजायला गेले होते का? तुमच्याकडं फोटो पुरावा आहे का? राऊतांच्या आरोपावर रामदास कदमांचा पलटवार

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget