Chiplun Nilesh Rane vs Bhaskar Jadhav : चिपळूण राड्याप्रकरणी तिघांना अटक, ठाकरे गटाच्या शाखाप्रमुखांचा समावेश
Chiplun Nilesh Rane vs Bhaskar Jadhav : भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) आणि ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये शुक्रवारी (दि.17) चिपळूणमध्ये राडा झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे
Chiplun Nilesh Rane vs Bhaskar Jadhav : भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) आणि ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये शुक्रवारी (दि.17) चिपळूणमध्ये राडा झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. यामध्ये ठाकरे गटाच्या शाखाप्रमुख आणि उपविभाग प्रमुखांचा समावेश आहे. शहनवाज शिरळकर, फैयाज शिरळकर, हेमंत मोरे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी यासंदर्भात फिर्याद नोंदवली आहे. प्रशांत वामन चव्हाण पोलीस हवालदार यांनी तक्रार दिलीये.
भाजप पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी दिल्या होत्या नोटीसा
चिपळूण राड्याप्रकरणी शुक्रवारी (दि.17) नोटीसा बजावल्या होत्या. पोलिसांनी कायदा सुव्यवस्था राखण्यात यावी यासाठी नोटीसा दिल्या होता. यामध्ये भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. तालुका प्रमुख वसंत ताम्हणकर, शहर प्रमुख परिमल भोसले अशी भाजप पदाधिकाऱ्यांची नावे आहेत.
300 ते 400 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल
निलेश राणे आणि भास्कर जाधव यांच्या कार्यकर्त्यांमध्ये शुक्रवारी राडा झाला होता. चिपळूणमध्ये राणेंच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली होती. त्याप्रकरणी दगडफेक प्रकरणी ठाकरे गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही बाजूचे मिळून जवळपास 300 ते 400 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शुक्रवारी रात्री उशिरा चिपळूण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा, दोन गटात हाणामारी शिवीगाळ आणि शारीरिक दुखापत संदर्भात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. Ipc 143, 145, 147,149,160,337,353,504,506 या कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
भास्कर जाधव आणि राणेंच्या राड्याची पार्श्वभूमी
आमदार भास्कर जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्या कणकवली दोऱ्याप्रसंगी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. नारायण राणे नेपाळी असल्याचे भास्कर जाधव म्हणाले होते. तर त्याला प्रत्युत्तर देताना मी भास्कर जाधवला चोप देणार मी असं कोणाला सोडत नाही, असे राणे म्हणाले होते. शुक्रवारी राणे कुटुंबिय आणि भास्कर जाधव यांच्यातील वाद चिघळला. राणेंवर दगडफेकही झाली होती. त्यानंतर राणे आणि जाधव यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झालेला पाहायला मिळाला.
इतर महत्वाच्या बातम्या