Vijay Wadettiwar News : "10 तारखेच्या निकालानंतर नवा नवरदेव महाराष्ट्राच्या बाहुल्यावर बसणार"; विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
Vijay Wadettiwar News : मुख्यमंत्री बदलणार अशी जोरदार चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्रीपदासाठी अनेक जण बाशिंग बांधून बसले आहेत. अनेकांनी कपडे शिवून ठेवले आहेत," असा दावा त्यांनी केला आहे.
![Vijay Wadettiwar News : Chief Minister will change after 10th January claimed Vidhansabha opposition leader Vijay Wadettiwar in Nagpur Maharashtra Marathi News Vijay Wadettiwar News :](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/28/04064e22ae056cc4282e2823adf4687a170374829729294_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Vijay Wadettiwar News नागपूर : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा (Shivsena MLA Disqualification Case) निकाल मागील दीड वर्षांपासून प्रलंबित आहे. 20 डिसेंबरला याप्रकरणावर अंतिम सुनावणी झाली. त्यानंतर आता या प्रकरणाचा निकाल 10 जानेवारी 2024 रोजी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बदलाच्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. अशातच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मुख्यमंत्री बदलाबाबत मोठा दावा केला आहे.
नागपूर (Nagpur) येथे विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, "10 तारखेच्या निकालानंतर नवीन नवरदेव महाराष्ट्राच्या बाहुल्यावर बसेल, मुख्यमंत्री बदलणार अशी जोरदार चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्रीपदासाठी अनेक जण बाशिंग बांधून बसले आहेत. अनेकांनी कपडे शिवून ठेवले आहेत," असा दावा त्यांनी केला आहे.
लोकसभा निवडणुकीत 30 पेक्षा अधिक जागा जिंकणार
आम्ही निवडणुकीची तयारी करत आहोत. जागावाटपासाठी उद्या दिल्लीत महाराष्ट्र राज्याची बैठक आहे. आमच्या सर्व्हे मध्ये दिसत आहे की, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात आम्ही 30 पेक्षा अधिक जागा जिंकू. विदर्भात आज स्थापना दिवस होत आहे. विदर्भातून काँग्रेसला साथ मिळेल. विदर्भातून आम्ही दहा पैकी सात जागा आम्ही जिंकू, असा विश्वास विजय वडेट्टीवार यांनी यावेळी व्यक्त केला.
स्थापना दिवस सगळ्यांच्याच लक्षात राहील
काँग्रेसचा आज स्थापना दिवस असून त्यानिमित्त आज नागपूर येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत वडेट्टीवार म्हणाले की, गेले दहा दिवस आम्ही कार्यकर्ते ही सभा यशस्वी होण्यासाठी काम करत आहोत. तयारी बघून दिसतच असेल. हा स्थापना दिवस सगळ्यांच्याच लक्षात राहील.
शरद पवार-बच्चू कडू यांच्यात चर्चा (Bachchu Kadu meet Sharad Pawar)
दरम्यान, एकीकडे कॉंग्रेस आणि इंडिया आघाडीची जोरदार तयारी सुरु असताना तिकडे महाविकास आघाडी आणखी मजबूत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यातच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि आमदार बच्चू कडू (Sharad Pawar and Bachchu Kadu) यांच्यात आज अमरावतीमध्ये चर्चा झाली. त्यानंतर बच्चू कडू यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे. जोपर्यंत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत आहोत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नसतील तर आम्ही वेगळा निर्णय घेण्याबद्दल बघू, असे सुतोवाच त्यांनी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
बच्चू कडूंचे स्वागत
बच्चू कडूंबाबत विजय वडेट्टीवार यांना विचारले असता ते म्हणाले की, बच्चू कडूंचे स्वागत आहे. त्यांनी निर्णय घ्यावा, आम्ही हायकमांड पुढे चर्चा करू. हायकमांड निर्णय घेईल. त्यांचा सत्तेतून भ्रमनिरास झाला असावा, राजकारणात जे कोणी भूमिका मांडतात त्यावर निश्चितच चर्चा होते. त्यांचा जर कल असेल तर चर्चा करायला हरकत नाही, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.
आणखी वाचा
जगातील सर्वात महाग बटाटे कुठे? सोने-चांदीपेक्षाही महाग असणाऱ्या बटाट्याची किंमत एकूण व्हाल थक्क
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)