एक्स्प्लोर

Chhatrapati Sambhajiraje : बाबा बुवांनी अधात्म सांगावं, मनाला वाटेल तसा इतिहास सांगू नये; छत्रपती संभाजीराजेंचा धीरेंद्र शास्त्रींना इशारा

Dhirendra Shastri Statement : धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांचे संबंध गुरूशिष्याचा असल्याचा दावा केला होता. त्यावर छत्रपती संभाजीराजे यांनी टीका केली आहे. 

कोल्हापूर : बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri) यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदासांसंबंधी केलेल्या वक्तव्यावरुन चांगलाच वाद रंगल्याचं चित्र आहे. माजी खासदार  छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhajiraje) यांनी धीरेंद्र शास्त्री यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला. बाबा बुवांनी अध्यात्म सांगावं, मनाला वाटेल तसा इतिहास सांगू नये असं संभाजीराजे म्हणाले. तसचे अध्यात्म आणि इतिहास यांची सरमिसळ करून त्याची अहवेलना करू नये असंही ते म्हणाले. 

Chhatrapati Sambhajiraje Post : काय म्हटलंय संभाजीराजेंनी? 

बुवा बाबांनी अध्यात्म सांगावे. मनाला वाटेल तसा इतिहास सांगत बसू नये. हिंदू धर्माच्या अध्यात्माची आणि इतिहासाची उंची अत्युच्च आहे. त्याची वाटेल तशी आणि चुकीच्या पद्धतीची सरमिसळ करून अध्यात्माची आणि इतिहासाची अवहेलना करू नये.

Dhirendra Shastri Statement : नेमकं काय म्हटलेलं धीरेंद्र शास्त्रींनी?

नागपुरात जामठा इथे एका कार्यक्रमात बोलताना बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांचे संबंध गुरूशिष्याचा असल्याचा दावा करत त्यांच्या नात्याचा एक किस्सा सांगितला. शिवाजी महाराज युद्ध करून थकले तेव्हा एक दिवस ते समर्थ रामदास स्वामींकडे गेले आणि आपला मुकूट उतरवून रामदास स्वामींना दिला. आता हे राज्य तुम्ही सांभाळा अशी विनंती केली. त्यावर रामदास स्वामींनी हसून मी राज्य चालवतो, तुम्ही अंमलबजावणी करा असं म्हटलं असा दावा धीरेंद्र शास्त्रींनी केला. 

तसंच हिंदूंनी चार मुलं जन्माला घालावी आणि एकाला आरएसएसचा स्वयंसेवक करावा असं आवाहनही हिंदू समाजाला केलं. जगातील पहिले भारतदुर्गा मंदिरा  भव्य शिलान्यास सोहळा शुक्रवारी पार पडला. या कार्यक्रमात धीरेंद्र शास्त्रींनी हे वक्तव्य केलं.

काँग्रेसचा आक्रमक पवित्रा

धीरेंद्र शास्त्रींच्या वक्तव्यानंतर काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावर पत्रकार परिषद घेतली. त्यांनी धीरेंद्र शास्त्रींच्या वक्तव्याचा समाचार घेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही निशाणा साधला. सोबतच मुख्यमंत्री फडणवीस आणि संघाने जाहीर माफी मागावी, अशी मागणीही केली. तर भाजपकडून छत्रपती शिवरायांचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न होत आहे आणि हा मनुवादी विचारसरणीचा कट असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला. 

शिवराय थकले आणि राजपाट समर्थांकडं दिला, हे धीरेंद्र शास्त्री यांचं विधान अत्यंत संतापजनक आहे. अशी विधानं करून महाराष्ट्राच्या संत परंपरेला आणि विचारांना गालबोट लावण्याचा प्रयत्न असल्याची टीका आमदार रोहित पवारांनी केली. तर धीरेंद्र शास्त्रींच्या वक्तव्यावरून आमदार अमोल मिटकरींनी हल्लाबोल केला. धीरेंद्र शास्त्रींच्या तोंडून वदवून घेतलेला चुकीचा इतिहास खपवून घेणार नाही असं त्यांनी सुनावलं. धीरेंद्र शास्त्रींना खरात बाबाच्या सोबत ट्रिटमेंटला पाठवायला हवा असं त्यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Vijay Chaudhari: भाजपच्या माजी महामंत्र्यांना ऑडिओ क्लिप प्रकरण भोवले; नंदुरबारच्या विजय चौधरींची पक्षातून हकालपट्टी
भाजपच्या माजी महामंत्र्यांना ऑडिओ क्लिप प्रकरण भोवले; नंदुरबारच्या विजय चौधरींची पक्षातून हकालपट्टी
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Nashik And Raigad Guardian Minister Name: रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला; अखेर 2 जणांची नावं जाहीर
रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला; अखेर 2 जणांची नावं जाहीर
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस

व्हिडीओ

Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
Embed widget