अब्दुल सत्तारांची पालकमंत्रीपदी वर्णी लागल्याने आमदार संजय शिरसाट नाराज, राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदासाठी भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा होती.
![अब्दुल सत्तारांची पालकमंत्रीपदी वर्णी लागल्याने आमदार संजय शिरसाट नाराज, राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा Chhatrapati Sambhajinagar Sanjay Shirsat upset on Appointment of Abdul Sattar as Gurdian Minister Maharashtra Politics अब्दुल सत्तारांची पालकमंत्रीपदी वर्णी लागल्याने आमदार संजय शिरसाट नाराज, राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/03/d7ccdd4c8ac42846f61da4f07b5483e217226716095071063_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदी अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांची वर्णी लागल्याने शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) नाराज असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर मध्ये काल मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला शिरसाट यांची गैरहजेरी चर्चेचा विषय ठरली असून पालकमंत्री पदासाठी शिरसाट इच्छुक होते. पण अब्दुल सत्तारांकडे पालकमंत्रीपद गेल्याने ते नाराज असल्याचं म्हटलं जातंय. छत्रपती संभाजीनगरचे सत्तार यांच्या आधी संदिपान भुमरे पालकमंत्री होते. लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर त्यांनी आमदारकीसह मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे जिल्ह्याचं पालकमंत्री पद रिक्त होतं. यासाठी भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा होती.
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला गैरहजेरी
लाडकी बहिण योजनेचा शुभारंभ करण्याच्या कार्यक्रमाला काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगरमध्ये होते. या कार्यक्रमात आमदार संजय शिरसाट गैरहजर होते. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीलाही ते उपस्थित नसल्याने जिल्ह्यात नाराजी नाट्य सुरू असल्याची चर्चा आहे.
अब्दुल सत्तार नवे पालकमंत्री
संदिपान भूमरे यांच्या राजीनाम्यानंतर आता शिंदेंच्या शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांच्याकडे पालकमंत्रिपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. अब्दुल सत्तार यांच्याकडे हिंगोलीचे पालकमंत्रिपदही आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आल्याची चर्चा आहे.दरम्यान पालकमंत्री पदासाठी इच्छूक आमदार संजय शिरसाट यांच्याऐवजी सत्तारांना पालकमंत्रीपद दिल्याने शिरसाट नाराज असल्याची चर्चा सुरु आहे.
अब्दुल सत्तारांनी इम्तियाज जलील यांची भेट
अब्दुल सत्तार, राजू शेट्टी (Raju Shetty), बाबाजानी दुर्राणी या तिघांनी नुकतीच इम्तियाज जलील यांची भेट घेतली. आजपर्यंत अब्दुल सत्तार यांनी इम्तियाज जलील यांची भेट घेणे टाळले होते. परंतु, अब्दुल सत्तार नेमके आताच जलील यांच्या भेटीला का गेले असावेत, या प्रश्नामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याचा तपशील अद्याप समोर येऊ शकलेला नाही. विशेष म्हणजे नुकताच शरद पवार गटात प्रवेश करणाऱ्या बाबाजानी दुर्राणी (Babajani Durrani) आणि जलील यांच्यातही बंद दाराआड चर्चा झाली. त्यांच्या या भेटीचे आणि चर्चेचे नेमके प्रयोजन काय होते, याचा तपशील अद्याप समोर येऊ शकलेला नाही.
हेही वाचा:
‘लाडकी बहीण योजने'चा शुभारंभ, स्वतः मुख्यमंत्र्यांनी भरला भगिनीचा फॉर्म
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)