Chhatrapati Sambhajinagar : मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम, महायुतीने उमेदवारी नाकारली, संभाजीनगरमध्ये चौरंगी लढत होण्याची शक्यता
Chhatrapati Sambhajinagar, Loksabha : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेने छत्रपती संभाजीनगरमधून संदीपान भुमरे यांना उमेदवारी जाहीर केलीये.
Chhatrapati Sambhajinagar, Loksabha : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेने छत्रपती संभाजीनगरमधून संदीपान भुमरे यांना उमेदवारी जाहीर केलीये. दरम्यान, महायुतीने उमेदवार जाहीर केला असला तरी मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. विनोद पाटील (Vinod Patil) यांना महायुतीकडून उमेदवारी मिळणार होती. मात्र, माझ्या उमेदवारीला विरोध केला गेला, असं पाटील (Vinod Patil) यांनी म्हटलय. विनोद पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर शिवसेनेची अडचण होण्याची शक्यता आहे. दोन दिवसांत पाटील अर्ज दाखल करती अशी शक्यता वर्तवली जात आहे.
काय म्हणाले विनोद पाटील?
छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात आताच महायुतीच्या उमेदवाराची घोषणा झाल्याचे मला कळाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांचीही मला उमेदवारी देण्याची इच्छा होती. परंतु मला कल्पना आहे, त्यांच्या पक्षातील दोन आमदारांनी आणि एका राज्यसभेच्या सदस्याने यांनी माझ्या उमेदववारीला तीव्र विरोध केला. का केला मला माहिती नाही. परंतु प्रश्न असा आहे की, ज्यावेळेस छत्रपती संभाजीनगरच्या जनतेने शिवजयंती साजरी करत असताना सत्कार समारंभात माझ्याकडे आग्रह धरला की, विकासासाठी तू निवडणूक लढली पाहिजे. त्या मतावर मी आज ठाम आहे. मी पुन्हा एकदा जनतेमध्ये जाईल. सर्वांशी चर्चा करेन आणि जो निर्णय होईल. छत्रपती संभाजीनगरमधून विजय मिळवण्याचे सूत्र माझ्या हाती आहे, असं विनोद पाटील (Vinod Patil) यांनी स्पष्ट केलं आहे.
छत्रपती संभाजीनगरमधून संदिपान भूमरेंना उमेदवारी
छत्रपती संभाजीनगरची जागा महायुतीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला सुटली. त्यानंतर शिंदेंनी संदीपान भुमरेंना उमेदवारी जाहीर केली आहे. संदीपान भुमरे यांची लढत ठाकरेंच्या चंद्रकांत खैरे यांच्याशी असणार आहे. याशिवाय एमआयएमचे इम्तियाज जलीलही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 2019 मध्ये इम्तियाज जलील यांनी विजय मिळवला होता. हर्षवर्धन जाधव यांच्यामुळे संभाजीनगरमध्ये मतविभाजन झाले होते. याचा फटका चंद्रकांत खैरेंना बसला होता. दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सध्या एमआयएम पक्षाचे इम्तियाज जलील हे येथील विद्यमान खासदार आहे. या निवडणुकीत एमआयएमनेही आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. दरम्यान, विनोद पाटील यांनी निवडणूक लढवल्यास चौरंगी लढत पाहायला मिळू शकते.
इतर महत्वाच्या बातम्या